फिर मिले सुर... च्या निमित्ताने...

Submitted by अँकी नं.१ on 27 January, 2010 - 20:00

परवा प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर झूम चॅनेल आणि टाईम्स ग्रुप नी २३ वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या माध्यमातून जबरदस्त लोकप्रिय झालेलं लोक संचार सेवा परिषदेनी बनवलेलं 'मिले सुर मेरा तुम्हारा' गाणं रीक्रिएट केलं. त्याबद्दल वेगवेगळ्या बीबींवर चर्चा होत असलेली पाहून हा बीबी उघडला...

पहिल्या गाणं म्हणजे देशातल्या संगीत क्षेत्रातल्या आघाडीच्या कलावंतांनी एकत्र येऊन भारताचं घडवलेलं बहुरंगी आणि बहुढंगी दर्शन होतं. त्यात तत्कालीन सेलेब्रिटीज सोबत प्रांतीय कलाकारांचाही बरोबरीचा सहभाग होता. आणि ओव्हर ऑल गाण्यातनं भारतीयत्वाला साद घातली जायची...

त्या काळात लोक संचार सेवा परिषदेनी दूरदर्शनच्या माध्यमातून असे बरेचसे व्हीडिओ सादर केले होते... शास्त्रीय संगीत आणि नृत्यावर आधारलेला देस राग, देशात एकात्मता ठेवण्याचा संदेश देणारा फिल्मी तार्‍यांचा प्यार की गंगा बहे, स्वातंत्र्याची ज्योत नेणार्‍या खेळाडूंचा आणि मिले सुर.. हे व्हीडिओ खूप लोकप्रिय झाले कारण ते थेट भारतीय असण्याचा गौरव करायचे. (celebrate Indianism). आपल्या देशातल्या लोकांना जिथे देशाची आठवण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येते तिथे या व्हीडिओंमुळे देश, संस्कृती, एकता याच्याशी लोकांच्या मनाचे बंध जुळले.

पण पुढे खाजगी वाहिन्यांच्या भडीमारात हे व्हीडिओ आणि दूरदर्शन दोन्ही मागे पडलं. थोडी थोडकी नाही, चक्क वीसेक वर्ष या प्रकारचं काहीच बनत नव्हतं. वर्ल्डकप क्रिकेट च्या वेळी गाणी आली आणि गेली... खाजगी वाहिन्यांच्या उपक्रमांसाठी काही गाणी बनली आणि तेवढ्यापुरती वाजली (फलक पकडके उठो, हवा पकड के चलो : लीड इंडिया)... सरकारी उपक्रमांना प्रमोट करणारीही गाणी आली (स्कूल चले हम)... पण त्यांनी या पूर्वीच्या वीडिओंसारखी पकड घेतली नाही. कारण बहुदा ती फक्त एखादाच मुद्दा पकडून बनवली होती म्हणून असेल, अथवा त्यात मार्केटिंग फंडा असल्यानी ती पूर्ण पाक राहिली नसावीत...

आणि अशा परिस्थितीत हे नवीन गाणं आलं...
या इनिशिएटिव्ह साठी टाईम्स ग्रुप चं अभिनंदन.
पण ह्या गाण्याचा पहिल्या गाण्याच्या तुलनेत खास इम्पॅक्ट होत नाहीये. संथ लय, फिल्मी कलावंतांचा भडीमार, हरवलेला प्रांतीयपणा {राजस्थानशी संबंधीच्या दृष्यात शिल्पा शेट्टी कशाला हवी...??? सिनेमांमधे ती राजस्थानी नर्तकी असते म्हणून? की ती रजस्थानच्या नावच्या आयपीएल टीम ची मालकीण आहे म्हणून...??} आणि भरमसाठ लोकांना संधी देण्याच्या (दाखवण्याच्या) फंदात वाढलेली लांबी.
रीक्रिएशन करताना फिल्मी लोकांचं डेकोरेशन इतकं झालंय की मूळ रंग अधून मधूनच डोकावतोय... तिथे जरा ताबा ठेवायला हवा होता...
तरी बरंय... क्रिकेटवीर आणि सानिया मिर्झा नाहीत...

पण पूर्ण गाणं काही अगदीच वाया नाही कारण अनुष्का शंकर, राहुल शर्मा, कविता सुब्रम्हण्यम चा व्हॉयलिन वादक मुलगा, अमान आणि अयान अली बंधु आदि पूर्वीच्या गाण्याशी संबंधित कलावंतांच्या पुढच्या पिढीचा परफॉर्मन्स...

असो... इतक्या कालखंडानंतर कुणालातरी असं काही करावंसं वाटलं ना...
हे ही नसे थोडके...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन वर्जन पाहिले नाही.. पण उत्सुकताही नाही ते बघण्यात..
माझ्याकडे नेटवरुन सेव करुन ठेवलेले हे जुने गाणे.. वाचतानाही त्या गाण्यातली दृश्ये समोर येतात !
-------------
(हिन्दी) मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा …
मिले सुर मेरा तुम्हारा …

(कश्मीरी) चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़
इक-वट बनि यि सॉन्य् तरज़

(पंजाबी) तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल
मिलके बणे एक नवा सुर ताल

(हिन्दी) मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

(सिन्धी) मुहिंजो सुर तुहिंजे साँ प्यारा मिले जडेंह
गीत असाँजो मधुर तरानो बणे तडेंह

(उर्दू) सुर का दरिया बह के सागर में मिले

(पंजाबी) बदलाँ दा रूप लैके बरसन हौले हौले

(तमिल) इसैन्दाल नम इरुवरिन सुरमुम नमदक्कुम
तिसै वॆरु आनालुम आऴि सेर
मुगिलाय मऴैयय पोऴिवदु पोल इसै
नम इसै…

(कन्नड) नन्न ध्वनिगॆ निन्न ध्वनिय,
सेरिदन्तॆ नम्म ध्वनिय

(तेलुगु) ना स्वरमु नी स्वरमु संगम्ममै,
मन स्वरंगा अवतरिंचे .

(मलयालम) निंडॆ स्वरमुम् नींगळुडॆ स्वरमुम्
धट्टुचॆयुम् नमुडॆय स्वरम .

(बाङ्ला) तोमार शुर मोदेर शुर
सृष्टि करूर अइको शुर

(असमिया) सृष्टि हो करून अइको तान

(उड़िया) तोमा मोरा स्वरेर मिलन
सृष्टि करे चालबोचतन

(गुजराती) मिले सुर जो थारो म्हारो
बणे आपणो सुर निरालो

(मराठी) माझ्या तुमच्या जुळत्या तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

(हिन्दी) सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा …
तो सुर बने हमारा
----------
हम सब एक है ! Happy

यो, धन्यवाद Happy जुन्या गाण्याचे सगळ्या भाषांमधले शब्द नवर्‍याला तोंडपाठ आहेत. आता मी पण पाठ करुन त्याला झब्बु देते Proud

जुन्या "मिले सुर" ची चाल आपल्या अशोक पत्कींची आहे.

या भारत भेटीत सिटी प्राइड पुणे येथे नटरंग सिनेमाच्या आधी "जन गण मन" दाखवले. सध्याचे बहुतेक सगळे मराठी कलाकार होते त्यात, अगदी निळू फुलेंपासून नव्यापर्यन्त. तीच चाल, no remix. केवळ अप्रतिम! (असेच बाकीच्या प्रादेशिक भाषांमध्ये तेथील कलाकार घेउन केले आहे काय?) "मिले सुर" जर नवीन करायचेच होते तर मूळ गाण्याला धक्का न लावता नवीन लोक घेउन reshoot करता आले असते. It's hard to remake classics, हेच खरे. Happy

जुन्या "मिले सुर" ची चाल आपल्या अशोक पत्कींची आहे. >>> हो? मी कुठेतरी वाचलं की दोन्ही versions Louis Banks ची आहेत ..

मूळ "मिले सुर" ची चाल पत्कींचीच आहे, ते त्यांच्या कार्यक्रमातून आपले गाणे म्हणून सादरही करतात. Happy इतर भाषांतील ओळींना त्यांचीच चाल असेल असे वाटत नाही..

खरय, हे नवे वर्जन बघतांना/ऐकतांना नुसती चीडचीड झाली ... बॉलिवूड स्टार्सचा मारा जास्तयं ...

>>असं केल्यावर भारतातल्या प्रत्येक तरुणाला अ‍ॅक्टरच व्हावसं वाटणार, दुसरं काय?
Lol रूट कॉज अ‍ॅनॅलिसीस जोरदार !

योरॉक्स, शब्द दिल्याबद्दल धन्यवाद. इतकी वर्षे मी माझी व्हर्जन गुणगुणायचो Happy

एक मात्र झाले - अँकीने ही लिन्क उघडल्यापासून गेले २-३ दिवस फक्त हेच गाणे डोक्यात आहे.

अगदी अगदी.. झोपताना पण तेच डोक्यात आणि सकाळी उठल्यावरही तेच..

माझही पूर्ण पाठ असलेल निराळ वर्जन आहे. त्यामुळे यो रॉक्सने दिलेल्या ओळी नीट म्हणताच येत नाहियेत. Proud

ऱोक्या लिरिक्स दिलेस ते बर केलस. कारण ते दुसर्र्‍या भाषेतील शब्द कळत नव्हते. Happy
ते वाचता वाचता डोळ्यासमोर आला व्हिडिओ. ते गाणच अख्ख क्लासिक झाल होत.
त्याची सर येण कठीणच.
मी नवीन मिले सुर नाही पाहिलेल. आणि हा बाफ वाचुन पाहण्याची इच्छादेखील नाहिये.

हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद .जुन अप्रतीम पण नवीन चेंज म्हणून बर आहे .पुढच्या वेळी वेगळ
असू शकत .कला ,पेहेराव ,प्रार्थमीकता यात वीस वर्षात बराच फरक झाला आहे तो स्विकारायलाच
हवा .लताजी ,भीमसेनजी यांच्या योगदानाला तोड नाही पण नवीन पिढीला अगदी टॉलरेट न करण
ही टोकाची भूमिका झाली .नाही सुर जुळला तर जुळवायला पाहिजे ,राष्ट्रीय एकात्मतेच गाण आहे,
मान्यवरानी संगीत दिलेल ,मान्य करून घेतलच पाहिजे .आपल्या घरातल लहान मूल तुटक्या भसाड्या
आवाजात गात तेव्हा आपण कौतुकाने ऐकतोच ना .''वंदे मातरम'' क्लासिकल, लताजीनी गायल होत
तेव्हासुद्धा टीका झाली होती .सर्व जनता या कठीण सुरात गाउ शकत नाही ,हे योग्य नाही वगैरे .
''वंदे मातरम ''समुहात गायल जात होत पण ती प्रार्थमीकता नंतर नाही राहिली .लताजींच
''वंदे मातरम''आपल्या ठिकाणी उत्तम कलाकृती आहे तसाच या गाण्यातला नवा साज .राष्ट्रीय
एकात्मतेच गाण सादर होतय आणि टी .व्ही .बंद करायला धावतो आहोत हे चांगल लक्षण नाही .
आपल्या आई ,बाबानी जे सोसल ते सोसण्याची आज आपल्यात ताकद आहे का ?,तेच नवीन पिढीत.
आपण आपल्यानाच नाही स्विकारल तर कसले सुर जुळणार ?सगळाच आनंद .

हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद , वर सर्व लोकान्नी दिलेल्या मतान्ना १०००% अनुमोदन ,या नवीन मिले सूर मध्ये कुणाचा कुणाला नेमका सूरच मिळत नाही , सर्व महान कलाकारान्नी आपली कला दाखवायच्या नादात त्या अमर ,क्लासिक गाण्याची वाट लावली नुस्ती....
जुने गाणे लागले किन्वा त्याचे लिरिक्स जरी वाचले तरी अन्गावर रोमान्च उभे राहतात...
आता तर नवीन गाणे सुरू झाले तरी चॅनेल बदलावासा वाटतो...

जन गन मन च्या मराठी कलाकारांची फिल्म पाहिली. एकही चेहरा फ्रेश दिसत नाही. बायका फुगलेल्या आणि बहुतेक पुरुष दारू पिऊन सुजलेले चेहरे घेऊन उभे आहेत. याना जरादेखील स्वतःला प्रेझेन्टेबल ठेवावसं वाटत नाही का? अतिशय निराशाजनक फिल्म.

मला जुने जाणे पूर्ण पाठ होते आणि हाव भावासकट मी लहानपणी म्हणायचे. Happy अजूनही शब्द लक्षात आहेतच (अर्थात ते बरोबर आहेत असे नाही)

कला ,पेहेराव ,प्रार्थमीकता यात वीस वर्षात बराच फरक झाला आहे तो स्विकारायलाच
हवा>>> हा बदल जर योग्य रीतीने दाखवला असता तर खूप बरं वाटलं असते. भारताची प्रगती, औद्योगिक क्रांती हे सर्व दिसले असते तर,... विविधतेत एकता दाखवली असती तर..

हे सर्व नाहिये म्हणून डोक्याला ताप होतो हा व्हिडीओ बघताना. भारताच्या विविध प्रांताचे प्रतिनिधित्व हा व्हीडीओ करत नाही म्हणून तर "अपील" होत नाही..

शेवटी "जुनं ते सोनं..." म्हणतात तेचं खरं..
हे असलं काही "नवीन आणि क्रिएटिव्ह" म्हणून खपवण्यापेक्षा आधीचचं एकदम मस्त होतं...
सेंट- पर्सेंट बेस्ट.....

नवीन पिढीला अगदी टॉलरेट न करण
ही टोकाची भूमिका झाली .नाही सुर जुळला तर जुळवायला पाहिजे ,राष्ट्रीय एकात्मतेच गाण आहे,
मान्यवरानी संगीत दिलेल ,मान्य करून घेतलच पाहिजे
>> नवीन जर खरंच चांगलं असेल तर आवडेलच की.. जे चांगलं वाटत नाही ते केवळ कुणी मान्यवरांनी संगीत दिलंय म्हणून कशाला चांगलं म्हणायच? चांगलं ते चांगलं आणि बंडल ते बंडल! मग ते कुणाचं प्रॉडक्ट आहे हे महत्त्वाचं नाही!
(असं मला वाटतं!)

रॉबिनहूड, LOL. मला तरी एवढे मराठी कलाकार एकत्र करून केलेली film सुरू होताच सुखद आश्च्रर्याचा धक्का बसला. youtube वर नाही सापडली link, कुणाला सापडल्यास इथे टाका please.

माझ्या मामे सासर्‍यांशी बोलतांना एकदा मी म्हंटलं "सुंदर सुंदर जुन्या गाण्यांची या रीमिक्सनी वाट लावलीय पार." तर ते म्हणाले " अगं पण त्यामुळे का होईना ही गाणी नव्या पिढीच्या कानावर पडतायत. ते शब्द त्यांच्या कानावरुन जातायत. हे काय कमी आहे?" तसं मला 'फिर मिले सुर' ऐकतांना वाटलं.

बॉलिवुडच्या लोकांना घेऊन 'सारा भारत एक रहे, देश में एका रहे' असं एक गाणं पण होतं. कुणाला आठवतय का? त्यात शेवटी सगळे क्रिकेटर्स आपापल्या राज्याच्या वेशभुषेत दाखवले होते. सचिन आणि कांबळी धोतर, कुडता आणि काळी टोपी असे एकदम पक्के महाराष्ट्रीयन वेषात दाखवलेले.

Pages