बारावीनंतर....

Submitted by शैलजा on 21 January, 2010 - 10:32

बारावी, शास्त्र (Science) घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर घडवण्यासाठी भारतामध्ये कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ह्या विषयावर इथे ठाऊक असलेली माहिती लिहायची माबोकरांना विनंती आहे. ठराविक पर्याय, जसे की मेडीकल, इंजिनिअरींग हे तर झालेच. त्यातही नवीन काही पर्याय निघाले असतील, काही माहिती असेल तर लिहावी. हे सर्व पर्याय एकत्र केलेले पुस्तक वगैरे उपलब्ध आहे का, की जेणेकरुन सर्व माहिती एकत्र स्वरुपात सापडू शकेल?

मेडिकल/ इंजिनियरींगशिवाय इतर पर्याय काय? बीएससी कोणकोणत्या विषयांमधे करता येते? पुढील उच्च शिक्षणाच्या काय संधी/ स्कोप आहे? कोणाला मायक्रोबायॉलॉजी ह्या अभ्यासक्रमाबद्दल ठाऊक असेल तर लिहावे, अशी विनंती. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक वाचलेली माहिती शेअर करत आहे:
यापुढे बी एस सी नंतर अभियांत्रिकीच्या डायरेक्ट सेकंड वर्षाला अ‍ॅडमिशन मिळु शकेल. सध्या पदविकेनंतर (डायरेक्ट) अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळु शकतो. प्रत्येक कॉलेजमधे डायरेक्ट दुसर्‍या वर्षासाठी काही जागा राखीव असतात. त्यात आता बी एस सी पास विद्यार्थ्याना संधी उपलब्ध होणार आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे यात सगळ्या जागा खुल्या असतात. आरक्षण नाही.

वरील पर्यायामुळे आता बी एस सी नंतर अभियांत्रिकीचा पर्याय खुला झाला आहे.

११-१२ वी सायन्सला मॅथेमॅटिक्स वगळता येते का?
डिग्रीसाठी फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर वगैरे विषय हवे असतील तर १२वीला मॅथेमॅटिक्स घेणे जरुरीचे आहे का?

हॉर्टिकल्चर साठी तरी मॅथेमॅटीक्सची गरज नाहीये.. तसे ११-१२वी हॉल्टीकल्चर हाही पर्याय आहे...

११-१२ वी सायन्सला मॅथेमॅटिक्स वगळता येते का?>> थोडा सल्ला देउ मोड आहे ,पण आवडत नसेल तरी किमान ११-१२ वीत गणित वगळु नये. कारण आत्ता १० वीचे गणित खुप सोप्पे करुन टाकले त्यामुळे पुधे बर्‍याच परिक्शांमधे उपयोगी पडेल अशा concepts ११-१२ वीतच शिकवल्या जातात.फार तर काय score कमी होइल , पण हे शिकणे वाया जात नाही.बर गणित वगळले तरी फिजिक्समधे गणिताचे काही भाग शिकावेच लागतात.

arc, तुमचे म्हणणे मला पटले पण मुलीने मात्र वाचुन मोठ्याने गळा काढला Happy तिचे नी गणिताचे अजिबात सख्य नाही, मला त्यामुळे काय करावे सुचत नाही. Sad
आता घाबरुन गणित वगळले तर पुढे कदाचित डिग्रीच्या वेळी केवळ गणित घेतले नाही म्हणुन हवा तो कोर्स घेता येणार नाही असे होईल असे वाटते.

साधना, ११वी ला मॅथ्स ठेऊन नंतर अजिबातच जमत नसेल तर १२वी ला सोडता येते का ते पहा. पूर्वी असे करता यायचे. तिचा नक्की करीअर प्लॅन काय आहे ते लक्षात घेऊन पुढे या मॅथ्सची कुठे किती गरज लागेल ते पहा. arc नी म्हटल्याप्रमाणे फिजिक्सला मॅथ्स लागेल तसेच केमिस्ट्रीलाही लागेल ना?

साधना
मलापण थोडसे आर्कसारखे वाटते की ११-१२ वीला गणित विषय असू द्यावा. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी असलेल्या बर्‍याचश्या एन्ट्रन्स परीक्षांमध्ये कळत-नकळत हे गणिताचे ज्ञान उपयोगी पडते. अर्थात जर आधीच पक्के ठरले असेल की फोटोग्राफी/चित्रकार/ इतर कला मध्ये रस आहे आणि त्यातच पुढे जाणार आहे तर एकवेळ नाही घेतले तर चालू शकेल. मी स्वतः शास्त्रशाखेची असल्याने मला नेहमी वाटत आलय की १० वी ऐवजी १२ वी पर्यंत गणित सगळ्यांना अनिवार्य हवे.
तिला भिती वाटत असेल गणिताची तर घरगुती कोणी आहे का बघ (कोचिंग क्लास नाही त्यात १००/१२५ मुले असतात) जो गणितातले कन्सेप्ट सोपे करून तिची भिती कमी करू शकेल. मी तिथे असते तर माझ्याकडे पाठवायला सांगितले असते.

कारण आत्ता १० वीचे गणित खुप सोप्पे करुन टाकले <<<
माझ्या माहितीप्रमाणे आता शाळांमध्ये नववी-दहावीला (आधीच्या इयत्तांबद्दल माहिती नाही.) गणिताच्या दोन तुकड्या असतात. एक साध्या गणिताची आणि एक स्पेशल गणिताची. सध्याच्या दहावीच्या स्पेशल गणितातल्या अभासक्रमातील प्रकरणे माझ्या वेळी मला अकरावीला होती.

सायन्सला जायचे असेल तर (वैद्यकीय शाखेकडे जायचे असेल तरी) गणित वगळू नये असे माझेही मत.

रुनी थँक्स गं. मीही तिला हेच सुचवलेय की घरगुती ट्युशन बघुन पार पाडुया मॅथ्स चा डोंगर..... Happy आणि शिकवणारा एकजण जवळच ओळखीत आहे. पण मॅथ्सची जरा भिती बसलीय तिला.

माझ्या माहितीप्रमाणे आता शाळांमध्ये नववी-दहावीला (आधीच्या इयत्तांबद्दल माहिती नाही.) गणिताच्या दोन तुकड्या असतात. एक साध्या गणिताची आणि एक स्पेशल गणिताची.

हो, आणि जनरल मॅथ्स घेतले असेल तर ११वी सायन्स व कॉमर्सला फक्त जनरल मध्ये अ‍ॅडमिशन घेता येते, बायफोकल मध्ये घेता येत नाही शिवाय जनरल ११-१२ वीमध्ये मॅथ्स घेता येत नाही. (बायफोकल म्हणजे आधी ज्याला व्होकेशनल म्हणायचे साधारण तसे. सायन्समध्ये कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोनिक्स इ. ११ ऑप्शन्स आहेत तर कॉमर्सला बॅंकिंग, ऑफिसमॅनेजमेंट, मार्केटीग इ. ४ ऑप्शन्स आहेत. आर्ट्सला बायफोकल नाही. )

ज्यांची मुले ह्या वर्षी ९वीत महाराष्ट्र स्टेट बोर्डाला आहेत त्यांनी ही काळजी घ्यावी, कारण सगळ्याच शाळांमध्ये जनरल मॅथ्स घेतले तर पुढचा प्रवास कसा असेल ते सांगत नाहीत.

साधना तुमच्या मुलीला astrophyics शिकायचे असेल तर मॅथ्स सोडून चालणार नाही.

ज्यांना मॅथ्सची भिती वाटते किंवा अजिबात जमणार नाही असे "वाटते" त्यांना मॅथ्स सोडून अनेक उत्तम पर्याय आहेत.
जसं १. B. Pharm +M.pharm+Ph.D. (research jobs in pharma companies or SME jobs in IT companies in healthcare domain)
2. B.Tech (Cosmetology)
3. B.Sc. (life sciences) +M.Sc( specialised branches)
4. Hotel mgmt
5. Any graduation(B.Com/B.Sc) + MCA/MCM
6. Any graduation + foreign language courses
७. ज्यांना पुढे MBA करायचेच आहे त्यांनी graduation केवळ स्वतःला अतिशय आवडणार्‍या विषयात करावं. इतर काय करतात किंवा कशात नोकरी मिळण्याची जास्त संधी आहे, ते बघु नये.

साधना, मॅथ्स सोडू नये असे मलाही वाटते. मायकोबॉयॉलॉजी घेतली तर मॅथ्स लागणार नाही पुढे. निदान इथे गरवारे, फर्ग्युसनमध्ये तरी मा.बॉ. च्या कोर्सला नाही आहे, पण बीएससी माबॉ मधे करुन पुढे एमएससीसाठी बायोटेक वगैरे घ्यायचे असेल तर मॅथ्सची गरज लागते का ते ठाऊक नाही. कोणी केले असेल तर त्यांना विचारायला हवे.

रुनी, तुला काही माहिती आहे का गं?

साधना,
११वी ला मॅथ्स ठेऊन नंतर अजिबातच जमत नसेल तर १२वी ला सोडता येते का ते पहा. पूर्वी असे करता यायचे.
मला वाटतं, आता देखील करता येत असेल..!
Happy

डॉ. श्रीकांत जिचकार यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री करियर मार्गदर्शन योजनेअंतर्गत १०-१२वी नंतरच्या पर्यायांची माहिती देणारी एक पुस्तिका तयार केली होती. ती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येथे उपलब्ध आहे.

शैलजा खूप उशीरा बघितला मी तुझा प्रश्न
बायोटेक मध्ये करीयर करायचे असेल तर डायरेक्टली गणित विषय किती लागतो माहित नाही पण बर्‍याचदा रीसर्च लेव्हलला गेल्यावर कळते की गणित-संख्याशास्त्र-भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र या विषयातली बेसिक माहिती कधी ना कधीतरी काम करतांना वापरावीच लागते. निदान कन्सेप्टस् माहिती असावे लागतात. आता हे सगळेच विषय सगळेच जण शिकलेले असतात असे नाही, त्या त्या वेळी वाचून अभ्यास करता येतोच, करावा लागतो. हे सगळे विषय खर तर वेगवेगळे आहेतही आणि नाहीतही. बी एस्सीला असतांना गणित/भौतिक/रसायन/मायक्रो खूप वेगवेगळे वाटू शकतात पण आपण जसे जसे रीसर्चच्या वरच्या पातळीवर जावू तसे तसे हे सगळे एकात एक गुंतलेले आहेत हे जाणवते.
त्यामुळे बेसिक ग्रॅज्युएशनला शक्य तेवढे जनरल विषय घ्यावेत आणि मास्टर्ससाठी हवे ते स्पेशलायझेशन निवडावे.

Ministry of Science and Technology Department बारावी पास झालेल्या व natural/basic sciences मधे करिअर करु इच्छिणार्‍या विद्द्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते. INSPIRE SHE (Scholarship for Higher Education - BSc/BSc (Hons)/ MSc/ MS) ही ती स्कॉलरशिप. इथे डीटेल्स मिळतील.

ह्यासाठी निवड करताना, Eligibility Criteria -
The selection of candidates will be based on a) performance in Board Examinations within the cut off threshold (of top 1 %) for each State or Central Board Examination Class XII level performance in any of the specified Competitive Examinations within stipulated cut off ranks and recipient of various fellowships and medals. Student who passed Class XII Board Examination in 2011 and are in receipt of Eligibility Certificate/Note issued by the respective Board are also eligible to apply. The eligible candidate must be already enrolled into degree level education in natural/basic sciences in any recognized College or University in India.

माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र बोर्डाच्या टॉप १% कट ऑफ threshold चे डीटेल्स कुठे मिळतील? बोर्डाच्या ऑफिसात फोन करुन पाहिले. काही माहीती मिळाली नाही आणि निम्म्याहून अधिक लोक जागेवर नव्हते. असो.

अजून कोणाला काही सुचत असेल तर सांगा, काही माहिती असेल तर तसंही सांगा. धन्यवाद.
शोधली मी माहिती.

ज्या कोणाचे पाल्य पुढे १२ वीला जाणार असतील, त्यांनी हे लक्षात ठेवा. चांगली संधी आहे. Happy

हाय! मी मायबोलीवर नवीन आहे. मला online dataentry शी संबंधित websites ची नावे कोणी सांगू शकाल का? मी खूप search केलेल आहे पण trusted website नाही मिळाली. online dataentry उपयुक्त आहे का? कोणी online dataentry जर करत असाल तर जरुर कळवा. मला parttime job ची खूप गरज आहे.

माझा भाचा या वर्षी १२वी सायन्सला होता. पण आता तो साईड चेंज करायचा विचार करतोय. त्याची अ‍ॅप्टिट्युड टेस्ट केली. त्यांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन टाईपची करीअर करावी असे सुचवले. त्याच्यासाठी काही पर्याय सुचवाल का? तो पुण्याला असतो.

बारावी नंतर अनेक संधी आहेत. कुठेही व्यवसाय मार्गदर्शकाची गरज नाही. ईथे भेट द्यावी. careepath व articles विभाग बघावे. http://ssc2pg.com/
संपूर्ण माहिती मीळेल.

माझ्या भाचीला B.Pharmacy साठी प्रवेश घ्यायचा आहे. अहमदनगर मध्ये तरी मिळाल नाहीये तिला अडमिशन. पुण्यामध्ये कोणते कॉलेज चांगले आहे.

माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. नोटबंदीत माझ्या मालकाचे दिवाळे वाजल्याने मी बेकार झालो होतो. मोठ्या प्रयत्नाने दुसरी एक नोकरी मिळाली पण जीयसटीच्या घिसाडघाईने त्या मालकाचेबी बारा वाजले. शेवटी असाच हताशपणे फिरत असताना एका सद्गृहस्थांनी मला चहाची टपरी टाकण्याचा सल्ला दिला. आणि त्यात नशिबाने मला चांगले यश आले. माझ्या टपरीजवळच प्रभातशाखा भरत असल्याने त्या लोकांची भरपूर वर्दळ असते. त्या लोकांच्या सल्ल्याप्रमाणे मी चहाबरोबरच भज्यांचा ठेला पण सुरु केला आणि कमी काळातच मला चांगली बरकत आलीये. तिथे शाखेला सकाळी काही व्हीआयपी मंडळीही अधूनमधून हजेरी लावतात. हे वेडेवाकडे सुटलेले हाफचड्डी-इन केलेले केसाळू लोक पाहिल्यावर मला तर अस्वलाचीच आठवण यायची. पण फार बिगशॉट मंडळी असतात ही. त्यांना मी चहा-भजी फुकट देतो नेहमी. तेबी खुश होऊन चार कामाचे सल्ले देतात .
तर आता मुळ मुद्यावरच येतो. त्यातल्या एका अस्वलकाकांनी मला अजून शिकण्याचा सल्ला दिलाय, ते म्हणतात "यंटायर पॉलिटिकल सायन्स" ची डिग्री घे मगच पुढचा मार्ग सांगेल. मी बऱ्याच बहिस्थ विद्यापीठांत चौकशी केलीय पण मला अशी डिग्री कुठे सापडली नाही. मला शिक्षणाची खुप आवड आहे. कृपया मला ही डिग्री कुठे मिळेल याबाबत कुणी काही मार्गदर्शन करेल का ?

Pages