स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके

Submitted by हर्ट on 7 January, 2010 - 22:35

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.

१) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html
२) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html
३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/

आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावरकरांच्या पुस्तकाच्या लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद !!
वाचल्यावर जाणवतंय कि जीव तोडून एका झोपलेल्या समाजाला जागे करण्याचा प्रयत्न करत होते !!

प्रत्येक पुस्तकाचे नाव ,लेखक, पिडिएफ साइज, थेट लिंक अशी यादी वाढवायला हवी. डाउनलोड करून खात्रीपूर्वक असलेली लिंक असल्यास वेळ वाचेल.
( धागालेखक हर्ट म्हणजेच बी असावेत )

ओस्मानिया युनिवर्सिटीची लायब्ररीची साईट पूर्वी चालत असे. त्यात मराठी पुस्तके आहेत. पण सध्या कनेक्शन टाइम आऊट मेसेज येतो.
साईट
मेन साइट : https://www.osmania.ac.in/oulwebpage/Digital%20Library.htm

लायब्री साइट
http://oudl.osmania.ac.in/

या संमेलनाचे एक पूर्वीचे अध्यक्ष औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी होते. राजेराजवाडे अध्यक्ष कसले? हा सूर पुष्कळदा ऐकू येतो. आणि त्यात वावगं नाही. परंतु त्यातही त्यांच्या कर्तुत्वाची छाननी कधी निसटून जाते. याच राजेसाहेबांनी अखेरच्या काळात आपलं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी राजघराण्यातली मुलं का बिघडतात त्याचं अतिशय उघडंनागडं दर्शन केलं होतं. पंसवीस-तीस वर्षांपूर्वी तर असं लिहिणं म्हणजे परम अश्लील होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यातले असंबद्ध उतारे वृत्तपत्रांत अत्यंत कुटाळकीच्या स्वरूपात इतस्ततः अवतरले. त्याचा परिणाम ते पुस्तक कायमचे जप्त होण्यात झाला.

मी ते पुस्तक वाचलेलं आहे. सत्यस्थितीचं वास्तव व विदारक दर्शन त्यात आहे. परंतु लोकांच्या भावना चाळवण्यासाठीच जी चावट पुस्तकं लिहिली जातात, त्यांत राजेसाहेबांच्या या कृतीची गणना करणं अन्यायाचं होईल. त्या लेखनात लेखनाची शिस्त आणि शैली नसली तरी पोटतिडीक आहे आणि चित्रकला, इतिहास वगैरे विषयांत गती असलेल्या, सामाजिक प्रगतीची जाणीव असलेल्या एका पुरुषानं स्वतःच्या अनुभवांचं व विचारांचं आलेखन करण्यासाठी ते लिहिलेलं आहे. लोकांच्या मनाला उबग आणतील, हादरा देतील व स्वतःची सामाजिक प्रतिष्ठाही उणावेल असं प्रामाणिक लेखन एखाद्या संस्थानिकानं करणं ही मुळातच एक प्रचंड घटना होती. लहान संस्थानिकांच्या जीवनात असणारे ताणतणावे इथं दिग्दर्शित होतात. कला, न्याय, शरीराचं आरोग्य या विषयांत प्राण ओतून काही घडावं यासाठी धडपडणाऱ्या या राजानं स्वतःच्या आयुष्यातलं भलंबुरं न लपवताना आपलं जीवन झाडामाडासारखं जनतेपुढं ठेवलं. बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राजकारणाचे अभ्यासक यांनाही हा वृत्तांत उपयुक्त असाच होता. पण आमचे अपसमज आडवे आले. मानवी सोवळेपणाला तो प्रामाणिक आलेख बळी पडला. अश्लीलतेचा भयंकर बभ्रा झाला. आणि या पुस्तकावर बंदी आली ती अजून उठली नाही.

या लेखातून https://www.maayboli.com/node/57562

मी आज हे पाहिले अन खूप प्रोत्साहित झालो.
परंतु यातील पहिल्या दोन लिंक्स मध्ये कोणत्याही पुस्तकाच्या लिंक्स उघडत नाहीयेत....
Sad Sad

काहीतरी खूपच रोचक सापडले आहे मला Happy विशेषतः ज्यांना जुनी नियतकालिके चाळायला आवडतात त्यांच्यासाठी तर हा खजिनाच....

"माणूस" साप्ताहिक पहिल्या अंकापासून (जून १९६१)

"वऱ्हाड समाचार: अकोला" पहिल्या अंकापासून (जानेवारी १८६९)

डेस्कटॉप वरून पहा. सर्व अंक स्कॅन केलेलं आहेत आणि अगदी जसेच्या तसे. त्या त्या अंकातील तेंव्हाचे लेख, जाहिराती, स्फुटे, छायाचित्रे इत्यादी आज पाहताना फार मौज वाटते. अधूनमधून क्लिक करून कोणतेही पाहता येतात.

उदाहरणार्थ, मी उत्सुकतेपोटी चाळलेले हे काही अंक:

माणूस साप्ताहिक पहिला अंक (जून १९६१)
"वऱ्हाड समाचार: अकोला" पहिला अंक (जानेवारी १८६९)

या व्यतिरिक्त हे अजून काही अध्येमध्ये (randomly) क्लिक केलेले अंक....

माणूस १५ जानेवारी १९७२
माणूस ११ मार्च १९७८
माणूस ३० सप्टेंबर १९७८
माणूस २७ जानेवारी १९७९
माणूस ७ जून १९८०

असे इतरही सारे अंक पाहता येतील. "माणूस" चे १०६१ अंक आणि "वऱ्हाड समाचार (मराठी पाक्षिक)" चे ४६६ अंक दिसत आहेत.

खालीच्या साईटवर पुणे नगरवाचन मंदिरच्या संग्रहातील काही स्कॅन केलेली जुनी पुस्तके विनामूल्य उपलब्ध आहेत. परन्तु पुस्तके बऱ्यापैकी जुनी दिसत आहेत १९५५ पूर्वीची वगैरे.. धार्मिक/ऐतिहासिक/बखरी/ तत्वज्ञान/ पॉलिटी या विषयांवर जास्त दिसत आहेत.... सॉक्रेटीस, राजवाडे, राजारामशास्त्री भागवत, दिनकरराव जवळकर, वामन चोरघडे, रघुनाथराव कर्वे अशी काही नावे उदाहरणार्थ..
http://archive.punenagarvachan.org/collection/10

पाचपाटील ,खूप धन्यवाद !! खूपच चांगली पुस्तक आहेत त्या लिंक वर

अतुल - खूप धन्यवाद ! माणूस चा दर्जा खूप वरचा होता , मी लहान असताना "फर्स्ट आमोनस्ट equal" चा "शर्यत" म्हणून अनुवाद यायचा तो अजूनही आठवतो..
फिरोज रानडे ह्यांचे एक सादर आठवतंय शाम अशी व्यक्ती रेखा होती , मला वाटतंय कि ड्रॅगन जागा झाला सुद्धा माणूस मध्ये यायचे बहुधा ...

Pages