स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके

Submitted by हर्ट on 7 January, 2010 - 22:35

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.

१) http://www.new.dli.ernet.in/
2) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html
३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html
४) http://sanskritdocuments.org/scannedbooks/

आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे बी. पण रीड ऑनलाईन च्या लिन्क वर टिचकी मारल्यावर एक खिडकी उघडते ज्यात काहीच दिसत नाही. फक्त डावीकडे चॅप्टर लिस्ट. (तिच्यावर टिचकी मारुनही काही दिसत नाही.)

मी एकच पुस्तक उघडलं दोन दिवसांपूर्वी. वाचण्याकरता काहीतरी डाऊनलोड करावं लागलं त्यानंतर ते पुस्तक दिसायला लागलं पण स्लाईड शो लावूनही पानं काही पुढे सरकत नव्हती. म्हणून मग मी नाद सोडला. सगळ्या पुस्तकांना असा प्रॉब्लेम येतोय का?

तिथे त्यांनी माहिती दिली आहे की कुठले सॉफ्टवेअर ईंस्टॉल करायचे. ते केले की दिसते व्यवस्थित. पण वेग मात्र कमी आहे.

सॉफ्टवेर इन्स्टॉल केल्यावर उघडले की एक पान दिसते, मग खाली > >> अशा लिंकवर टिचकी मारल्यावर पुढचे पान किंवा शेवटचे पान उघडते. असे हळूहळू एकेक पान पहाता येते कारण एक पान म्हणजे त्याचा फोटो आहे. थोडेसे वाचून बंद केले की पुन्हा तिथून सुरुवात करता येत नाही. पण हेही नसे थोडके.
बी छान माहिती.

समर्थ रामदासांचे सर्व साहित्य, त्यांच्या साहित्याबद्दल लिहिले गेलेले असंख्य लेख आणि प्रवचनं (हिंदी, मराठी, इंग्रजी, जर्मन, सिंधी ) http://www.samartharamdas400.in/eng/home.php या संकेतस्थळावर वाचता / ऐकता येतील.

Pages