स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके

Submitted by हर्ट on 7 January, 2010 - 22:35

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.

१) http://www.new.dli.ernet.in/
2) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html
३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html
४) http://sanskritdocuments.org/scannedbooks/

आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ईथे परदेशात आहे... मला वाचनाचा खुप म्हणजे खुप छंद आहे... पुर्ण मायबोलि वरचे सगळ्या कथा कांदबरी मी वाचुन काढल्या... मला ओनलाईन मराठी पुस्तक . कुठे वाचायला मिळु शकतिल ?

वा, एकदम भारी लिन्कस ! खुपच उपयुक्त !
धन्यवाद बी, इथे शेअर केल्या बद्दल... बघु किती वाचायला जमतेय ते !

याच ठिकाणी महाराष्ट्र शासनाने , scanned PDF old Books ज्या लिंकवर उपलब्ध होतील, ती लिंक दिलेली होती
त्या लिंकवरून मी काही पुस्तके Download सुद्धा केली होती. नंतर ती लिंक मला सापडली नाही.
. ती लिंक कृपया कोणी मला कळवेल का ? माझा व्य नि सहज मिळू शकेल.

मी मागे मायबोलीवर " जुनी मराठी स्कॅन केलेली पुस्तके " ती सुद्धा
महाराष्ट्र शासनातर्फे केलेली , एक लिंक पहिली होती . त्यामध्ये एकूण
४४४ पुस्तके दिलेली होती . PDF प्रकारातील होती त्यापैकी काही पुस्तके
मी download सुद्धा केली होती . ती लिंक मला सापडत नाही .
कृपया ती लिंक कळवाल काय?

जयंत बा शिंपी

भरत मयेकरजी , धन्यवाद.
च्या मारी, काल रात्री पासून शोधत होतो , पन मला काही गावली नव्हती.
पुन्हा एकदा धन्यवाद.

ईथल्या हेडरमधील लिंक गंडल्या आहेत का?
काहीच उघडत नाहीये.
म्हणजे काही लिंक उघडल्या पण आत जे पीडीएफ लिंक दिल्या आहेत त्या गंडल्या आहेत.
कोणाला काही आयडीया...??

प्रताधिकार कायद्यानुसार लेखकाच्या मृत्यूनंतर त्या कृतीवरचा लेखकाच्या वारसाचा आणी पर्यायाने प्रकाशन संस्थेचा त्या लेखकाच्या पुस्तकांवरचा अधिकार संपतो अशी माझी माहिती आहे. ही बरोबर आहे का?
एकदा असा प्रताधिकार संपला की कुणीही ती पुस्तके पिडीएफ किंवा इपब आदी फॉरमॅटमध्ये बनवून मोफत वितरीत करू शकतो का?
तसे असेल तर बर्‍याच लेखकांच्या पुस्तकावरचा प्रताधिकार येत्या २-३ वर्षात संपणार आहे. जसे की, चिं. वि. त्यांच्या पुस्तकांच्या स्कॅन्ड प्रती उपलब्ध करून देता येतील.

प्रताधिकार कायद्यानुसार लेखकाच्या मृत्यूनंतर त्या कृतीवरचा लेखकाच्या वारसाचा आणी पर्यायाने प्रकाशन संस्थेचा त्या लेखकाच्या पुस्तकांवरचा अधिकार संपतो अशी माझी माहिती आहे. ही बरोबर आहे का? >>

नाही. लेखकाच्या मृत्यूच्या वर्षानंतर साठ वर्षांनी असा प्रताधिकार संपतो. (इंडियन कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७, सेक्शन २२)
Term of copyright in published literary, dramatic, musical and artistic works.-
Except as otherwise hereinafter provided, copyright shall subsist in any literary, dramatic, musical or artistic work (other than a photograph) published within the lifetime of the author until sixty years from the beginning of the calendar year next following the year in which the author dies.

Explanation.- In this section the reference to the author shall, in the case of a work of joint authorship,
be construed as a reference to the author who dies last.

http://www.copyright.gov.in/Documents/Copyrightrules1957.pdf

चिं वि जोशी १९६३ साली वारले. ती पुस्तकं १ जानेवारी २०२४ ला प्रताधिकारमुक्त होतील.

आबा, पिडीएफ बद्दल धन्स!
अ‍ॅक्च्युअली, ६० वर्षांनंतर संपतो का अधिकार हेच विचारायचं होतं. '६० वर्षांनंतर' हे मिसलं चुकून.

मला इथे दिलेल्या एकाही लिंक वरून पुस्तके काढता येत नाहीयेत, लिंक वर क्लिक केलं कि 'Can't reach' किंवा 'ERROR Can't retrieve' असा संदेश येतोय. कुणी सुचवू शकते का काय करावे?

DLI received several complaints about copyright violations. So they have taken their website down till they resolve the issue.

छापील आहेत बरीच जवळ.बुकगंगा वरुन पेड डिजीटल पण आहेत.
पण काही पुस्तके सगळीकडे डिजीटल आणी छापील आउट ऑफ प्रिंट आहेत.
एखाद्या लेखकाचे सगळे कलेक्शन डिजीटल मध्ये योग्य मार्गाने लीगली उपलब्ध असणे हा आनंद वेगळाच. जसे सध्या ऑस्कर वाइल्ड आणि आर्थर कॉनन डॉयल आणि मला न आवडणार्‍या इतर भरपूर लेखकांचे आहे.
ही पुस्तके आउट ऑफ प्रिंट आहेत.
सुशि: जाता येता, झूम
नाधा: आनंद महल

DLI didn't have SuShi and GA anyway.

IITKGP has restored a part of DLI's database. But most of the DLI collection is still not available.

नाधा म्हणजे कोण?
जीएंची सगळी छापील पुस्तकं चारपाच वर्षांपूर्वीपर्यंत तरी उपलब्ध होती.

हं.

Pages