लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी

Submitted by सिद्धा on 6 January, 2010 - 21:01

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले - मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.

लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.

फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. आणि समाजाच्या सगळ्या स्थरांतील लोकांची होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.

मायबोलीकर सुनील यांनी लिहिलेली गोष्ट 'विश्वास - अविश्वास', तसेच 'कुणाशी तरी बोलायचंय' मध्ये वेळोवेळी येणार्‍या अनुभवांवरुन हा धागा सुरु केला आहे. इथे मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न केवळ ओळखीच्यांमार्फत किंवा नातेवाईकांमार्फत ठरतात असे नाही. वर्तमानपत्रातील जाहीराती, मॅरेज ब्युरो, इंटरनेट वरून पण स्थळं सांगून येतात. शिवाय ती देशभरातून कूठलीही किंवा देशाबाहेरील पण असतात. मग तेव्हा त्यांची खोदून माहीती काढायची कठीण पडते. मुलाचे किंवा मुलीचे चारित्र्य कसे आहे, आर्थिक परिस्थिती ते सांगतात तशी आहे का, कुठला शारिरीक / मानसिक आजार आहे का, वैगेरे अनेक शंका / कुशंका मनात येतात. बरं स्थळाची त्यांच्या शेजार्‍यांकडून किंवा ते काम करत असलेल्या ठिकाणाहून माहीती काढता येऊ शकते पण परगावी असेल तर तेही कठीण. Matrimonial investigations करणार्‍या एजन्सीज ची मदत अश्या वेळी घेता येइल. मध्यस्थालाही कधी कधी खात्रीची माहीती नसते. तेव्हा फसवणूक झाली तर नंतर आपण काय करू शकतो... त्यापेक्षा आधीच अशी मदत घेतली तर ती कामी येइल. अश्या प्रकारे चौकशी केल्यानंतर बर्‍याच गोष्टी उघडकीला येतात. जेव्हां एखादे स्थळ सर्व बाजूने चांगले वाटते व पुढील बोलणी सुरू होतात तेव्हाच (स्वतः जाऊन माहीती काढणं शक्य नसेल तेव्हा) ह्यां (detectives) ची मदत घेऊन संपूर्ण चौकशी केलेली बरी.

त्या लिस्टच बघा रे कुणीतरी...

एकंदर अनुभव वाईट दिसताहेत. Sad

दिनेशदा, लिव्ह इन ही पर्यायी व्यवस्था होऊ शकते का?

असुदे, मी निर्णय बरोबर का चूक ते ठरवत नाहीये. मी स्वतः त्या मुलीला तीनदा भेटलेय. तिची "तथाकथित" बाजू पूर्णपणे ऐकूनच मी मत बनवलेलं आहे. एकंदरीत काहीतरी लपवाछपवीचा भाग आहे हे निश्चित! कारण शेजार्‍याच्या मते तिने "लव्ह मॅरेज" केलं होतं दहवीला असताना!

मुळात स्वतःला एक मुलगी असताना "विनापत्य" अशी पेपरात जाहिरात देणे हे किती योग्य आहे?? त्यानंतर "मला ऑलरेडी एक मुलगी झालेय मग आता मेडिकल चाचणीची गरज काय?" हे विचारणे किती योग्य??

डुआय, एकंदरीत अनुभव वाईट नाहीत!! इथे फक्त वाईट अनुभव लिहिले जात आहेत...

माझ्या मते, माहिती काढण्यासाठी दुसर्‍या कुणाची मदत घेणे जितके गरजेचे आहे तितकेच स्वतःच्या मतावर विश्वास ठेवणे देखील आहे!! लग्न ठरवल्यावर लगेच करणे मला तरी अयोग्य वाटते, त्याऐवजी मुलाला आणि मुलीला एकत्र जास्त बोलण्याची भेटण्यची संधी मिळायला हवी. यातून स्वभाव, शारिरीक ओढ, प्रेम इत्यादि सर्व गोष्टीना थोडाफार वेळ मिळू शकेल. तसेच, लग्न ठरल्यावर घरच्यानी देखील एकमेकाकडे येणे जाणे ठेवल्यास सांपत्तिक स्थिती अथवा इतर माहिती "स्वतःलाच" जास्त काढता येऊ शकेल, कुठेही कसलीही शंका आल्यास इतराकडून त्याची शहानिशा करणे अर्थात आवश्यक.

त्या वरच्या चेक लिस्टमधे स्वयंपाकाची आवड आहे का? हा प्रश्न असायलाच हवा असे माझे मत!

डुआय, एकंदरीत अनुभव वाईट नाहीत!!>>>>हं मग जरा चांगले अनुभव लिवा की लोकहो! हा बीबी लग्न ठ रा य चे आहे / करायचे आहे यांसाठी आहे ना? Happy

वरच्या चेक लिस्टमधे स्वयंपाकाची आवड आहे का? हा प्रश्न असायलाच हवा >> हवाच!! पण कुणाला? Wink

वरच्या चेक लिस्टमधे स्वयंपाकाची आवड आहे का? हा प्रश्न असायलाच हवा >> हवाच!! पण कुणाला?>> अर्थात दोघांनाही.

डुआय, लिव्ह ईन वर इथे पुर्वी चर्चा झाली होती. आपल्याला कल्पना नाही, पण भारतातील शहरात अनेक जणानी हा पर्याय स्वीकारलेला आहे.
स्वैपाक हा पण कळीचा मुद्दा होतो ?
मला येतो का ? जोडिदारानेच तो करावा अशी अपेक्षा आहे का ? तिची त्याची आहारपद्धती काय आहे ? ती मला चालेल का ? नसल्यास जोडिदाराने तसा आहार घेण्यास हरकत आहे का ?
बाहेरचे जेवण रोज परवडेल का ? आवडेल का ?
सर्वच बाबतीत, कितपत तडजोड करायची तयारी आहे, याचा सुद्धा विचार करायला हवा.
सवयी, व्यसनं, छंद, आर्थिक बाबी, भविष्याच्या कल्पना, सगळ्याचीच चर्चा होणे गरजेचे आहे. मेड टू ऑर्डर जोडीदार मिळणार नाही, पण नेमक्या कुठल्या बाबतीत आणि किती तडजोड करायची आहे, हे तर कळायला हवे.

डिटेक्टीव्ह चा खर्च खुपच असतो. त्यापेक्षा, हल्ली फसवणुकिच्या केसेस बर्‍याच होतात, सविस्तर माहिती मिळेल का, शहानिशा केली तर चालेल का ? असे थेटच विचारावे.

मराठीत एक अप्रशस्त-अशिष्ट म्हण आहे "गावची सून पादरी"
गर्भितार्थ दोन प्रकारे निघतो -
एक की गावचीच मुलगी सून म्हणून केली की ती हगल्यापादल्या उठून माहेरी पळणार म्हणून नकोच ती करायला
दुसरा अर्थ, तिला लहानपणापासून बघितली असल्याने तिच्या "बारीकसारीक" खोड्या आधीच माहित असल्याने नको! (दुसर्‍या शब्दात यामुळे "नाविन्याची हौस गावची पोरगी सून म्हणून करुन न भागणे")
जो नियम सूनेला, तोच जावयालाही लागू पडतो
अन अर्थातच, आजुबाजुला, पन्चक्रोशीत आपल्याला साजेशी स्थळे बघण्या ऐवजी, विशिष्ट भरीव व वाढीव अपेक्षान्च्या अनुरुप असा जोडीदार बघायला सुरुवात होते (मान्य की बरेचदा भौगोलिक दृष्ट्या जवळची स्थळे बघण्यास प्राप्त परिस्थिती देखिल अनुरुप नसते - अन्यथा मराठीने केला कानडी भ्रतार अशासारख्या म्हणी उपजल्या नस्त्या! असो)
तर मला काय म्हणायचे आहे? की हल्लीच्या जमान्यात मला वाटते की स्थळे शोध मोहीम "बालवाडी" पासूनच सुरु करावी की काय?

माझा १ अनुभव,

एकंदर मी ३ च मुली बघितल्या.
पहिली मुलगी आवडलेली पण दुसर्‍या भेटीत तीने सांगीतले की तिचा दुसर्‍या कोणावर तरी प्रेम आहे म्हणुन आणि तीचे आई वडील forcefully तिच्यासाठी मुलं बघत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलगी कुठल्या गावातली नसुन नवी मुंबई मधली होती. आणि तिच्या request वरुन मी तीला नकार कळवला कारण काय तर तिचे आई वडील तीला ओरडतील.

त्यानंतर दुसरी बघीतली ती जरा arrogant वाटली म्हणुन ती काही आवड्ली नाही.

३ री बघीतली ती आम्हाला आवड्ली. जी आत्ता माझी बायको आहे..पहीली च्या अनुभवावरुन हे ठरवलं की जिच्याशी लग्नं ठरेल तिला हा प्रश्न नक्की विचारायचा की माझी आधी कोणी GF नव्हती..तुझ्या मनात दुसरा कोणी असेल तर आत्ताच सांग. मी तीला तसं विचारलं ,उत्तर अर्थातच नाही असं होतं. माझ्या या प्रश्नाचा तिला थोडा राग आलेला पण उदाहरणासहीत स्पष्टीकरण दिल्यावर तो गेला.
एकंदर स्थळं बघण्यासाठी माझ्या आईवडलांना आणि मला जास्तं त्रास नाही झाला.

limbutimbu , >>>>>>>>>>>>>स्थळे शोध मोहीम "बालवाडी" पासूनच सुरु सुरु करावी की काय?>>>>>>>>>>>>>... Rofl

<<कमावत्या बायकोमधून डोके आणि संपूर्ण पगार दोन्ही वजा केले, तर मग बायकोमध्ये शिल्लक रहातेच काय..?>>
मन आणि मनभरुन ओसंडणरे प्रेम
पण ज्याच्याकडे हदय (प्रेमळ) आसते त्यालाच ते कळत्ते..

कमावत्या बायकोमधून डोके आणि संपूर्ण पगार दोन्ही वजा केले, तर मग बायकोमध्ये शिल्लक रहातेच काय..?>>
नवर्‍याचा पूर्ण पगार वजा केला तर बायकोला दिसते का त्याचे प्रेम? >>

बापरे! म्हणजे नोकरी गेली , कंपनी बंद पडली, अपघाताने अपंगत्व आले आणि अशा कोणत्याही कारणाने कमवायची क्षमता नष्ट झाली (नवरा / बायको कुणाचीही) तर पहिले काम म्हणजे घटस्फोट घेणे .नाहीच मिळाला तर कसंही करुन त्या लोळातून आधी स्वतःची सुटका करुन घेणे, नाही का?

हो! अगदी घटस्फोट नाही पण बर्‍याच अंशी तसेच घडते - पुरुषाच्या बाबतीत. बायकांनी घरकाम (पक्षी चूल आणि मूल) आणि पुरुषांनी पैसा कमावलाच पाहिजे हे विचार मध्यमवर्गात इतके खोल रुजले होते. यातला पहिला विचार खूपच पालटला आहे पण दुसरा विचार अजून ठाम आहे. ज्या (मध्यमवर्गीय) घरात नवरा पैसे कमावत नाही त्या घरात त्याची काय किंमत असते ते कधी पाहिले आहे का?

नोकरी गेली , कंपनी बंद पडली, अपघाताने अपंगत्व आले >> जामोप्यांच्या उदाहरणात असे काहीही घडलेले नाहिये त्यांच्या पत्नीच्या बाबतीत. त्या सगळा पगार माहेरी देतात यावर त्यांचा आक्षेप आहे आणि तो १००% न्याय्य आहे. पुरुषाने आपला सगळा पगार त्याच्या आई वडलांना दिल्यावर बायको त्याला प्रेमाने पोसेल का? (पोसावे अशी माझी जराही अपेक्षा नाही पण मग नवर्‍याने तरी तिला अशा उदाहरणात का पोसावे?) उगाच प्रेम आणि पैसा यांची गल्लत करू नये. दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत.

फक्त एकट्या जामोप्यांच्या उदा. वरुन तुम्ही फार धाडसी विधानं करताय असं वाटत नाही का?
ज्या (मध्यमवर्गीय) घरात नवरा पैसे कमावत नाही त्या घरात त्याची काय कीमत असते ते कधी पाहिले आहे का?
>> हो. अगदी जवळून. एकदा नव्हे तीन ते चार ठिकाणी. सख्ख्या नात्यात. जास्त विशद करुन मला माझे खाजगी आयुष्य उघड करायचे नाही पण एक सर्वसाधारण निरीक्षण म्हणून सांगते. अशा घरात नवर्‍याचा 'दृष्टिकोण' कसा आहे यावर ९०% गोष्टी अवलंबून असतात. त्याने स्वतःच कुढत न बसता बायकोला सर्वतोपरी ( हो, स्वयंपाक, मुलांचे आवरणे हे सुद्धा) मदत करायचे ठरवले तर असा प्रॉब्लेम सहसा होत नाही. पण जर तो 'मी आजवर हे काम कधी केले नाही, आमच्या आईने हे कधी करायला लावले नाही' किंवा 'मला अमूक काम मिळाले तरच मी नोकरी करेन' असेच म्हणत बसला तर बायकोची चिडचिड स्वाभाविक आहे. जर ती बाहेर जाऊन कमावत असेल (आणि 'मध्यमवर्गीय' समजूती नुसार पुरुषाची जबाबदारी पार पाडत असेल ) तर संसारासाठी नवर्‍याचे हे कर्तव्यच बनते की तिच्या घरातल्या कामाला हातभार लावावा, तिला प्रोत्साहन द्यावे, तिची समाजातील प्रतिमा घरातही कायम राहिल अशी वागणूक द्यावी. बर्‍याचदा अशा घरी बसलेल्या नवर्‍यांच्या न्यूनगंडामुळे अगतिक होऊन स्त्रियांनी नोकर्‍याच काय समाजात वावरणंही सोडून दिल्याची उदा. आहेत. जर नवर्‍याचा पाठिंबा असेल ( आर्थिक नसला तरी भावनिक)तर स्त्री मोडलेला संसार पुन्हा उभा करु शकते. अर्थात, या विषयाचा आवाका खूप मोठा आहे त्यावर मी पाहिलेली उदाहरणे जर तुमच्या पाहण्यात आली नसतील किंवा व्हाईस अ व्हर्सा, तर आपण कधीच एकमत होणे शक्य नाही. त्यामुळे चर्चा करुन नुसता कीस पाडत बसणे व्यर्थ आहे.

मला एक सांगायचं आहे. अनुभव म्हटल्यावर काही विलक्षण छान आणि अनपेक्षितरित्या चांगले अनुभव लग्न आधी आणि नंतरही येऊ शकतात. तसे कुणाला आले असल्यास तेही इथे टाकावेत.

विषयांतर होत असल्यास - भाग्यश्री आणि इतर मंडळी यांना सॉरी.

मी फक्त जामोप्यांच्या उदा. बाबतच बोलतोय.

संसारासाठी नवर्‍याचे हे कर्तव्यच बनते की तिच्या घरातल्या कामाला हातभार लावावा, तिला प्रोत्साहन द्यावे, तिची समाजातील प्रतिमा घरातही कायम राहिल अशी वागणूक द्यावी. >> अगदी १००% बरोबर! पण मग बायकोचे पण कर्तव्य नाही का की तिनेही घरात पैसे कमावून आणावे? तेच तर जामोप्यांच्या बाबतीत होत नाहिये आणि तोच त्यांचा आक्षेप आहे. मग त्यांचे काय चुकले? उगीच त्यांची खिल्ली का उडवली जातेय?

आणखी एक उदा. देतो. हुंडा घेणे चूकच! तेंव्हा जामोप्यांना जे हुंड्याच्या बाबतीत 'वाटले' त्या पोष्टी उडवल्या . पण मागे 'मी काय करू' सारख्या बाफवर एका बायकोला आपल्या नवर्‍याला शारिरीक इजा कराविशी वाटलेली त्याबद्दल हुंड्याविरोधात आरडाओरड करणारे कोणी काही बोलले नाही. का शारिरीक इजा करणे कायद्यात बसते?

जर नवर्‍याचा पाठिंबा असेल ( आर्थिक नसला तरी भावनिक)तर स्त्री मोडलेला संसार पुन्हा उभा करु शकते. >> हे पुरुष पण करु शकतो.

मी पाहिलेली उदाहरणे जर तुमच्या पाहण्यात आली नसतील किंवा व्हाईस अ व्हर्सा, तर आपण कधीच एकमत होणे शक्य नाही >> Happy पटेश! कारण मी तुमच्या उलटी उदाहरणे पाहिली आहेत.

<<नवर्‍याचा पूर्ण पगार वजा केला तर बायकोला दिसते का त्याचे प्रेम?>>
खरे प्रेम आसेल तर नक्कीच दिसते...

नवर्‍याचा पूर्ण पगार वजा केला तर बायकोला दिसते का त्याचे प्रेम?

चला कुणाला तरी माझा मुद्दा पटला म्हणायचा...

<<नवर्‍याचा पूर्ण पगार वजा केला तर बायकोला दिसते का त्याचे प्रेम?>>
खरे प्रेम आसेल तर नक्कीच दिसते...

हेही १०० टक्के बरोबर.. मीही माझ्या सासुसासर्‍याना हेच तर सांगतो आहे.... मुलीचा पगार न घेताही /गरजेपुरताच घेऊनही मुलीवर प्रेम तसेच ठेवा!!!!!!!!!! Happy

( आता थोडे खाजगी : गेल्या महिन्यात बायकोचे आणि माझे भांडण झाले... मी बायकोला समजावून दिले की तुझा पगार तुला आईबापानाच द्यायचा आहे, तर तू स्वतंत्रपणे करियर कर.... नवर्‍याने खेड्यातून मुंबईत जाऊन स्ट्रगल करुन घर उभे करायचे आणि बायकोने आयते तिथे राहून पगार मिळाला की नवर्‍याच्याच घरात नवर्‍याबरोबर भांडायचे... उद्या नवरा परदेशात गेला की तिथे डिपेंडंट म्हणून यायचे.. आणि पुन्हा परत.....!!!! हे असे नको.... स्वतःच्या पायावर राहून करियर कर आणि तुला कुणाला पोसायचे आहे, त्याना पोस.....
तिने आनंदाने एम टी पी करुन घर सोडले आहे. (२ महिने झाले होते.) .. घर सोडताना म्युचुअल डिसिजनने घटस्फोट घ्यायचा म्हणून ती गेली... आता फोन केले तर आईबाप कधी कॉस्प्रमाइज करा म्हणतात , कधी त्याना पगार देणे कसे जस्टीफाईड आहे, हे सांगतात.... बायको फोनवर एकदाही आलेली नाही.... आईबापाला पैसा कमी पडतो तर दोन्ही रिकामटेकड्या बहिणीना काम करायला सांग, हे मी गेल्या वर्षी बोललो होतो..... पण हिचा सगळा पगार मला त्रास देऊन घेणे, त्याना कदाचित जास्त सोपे वाटले असेल... Happy )

बायकोच्या दुसर्‍या एका सख्ख्या बहिणीची हिस्टरी: ( एकूण ४ बहिणी, बायको, वर उल्लेखलेल्या २ आणि ही एक.. सर्व विवाहीत)

लग्न झाले... नवर्‍याने कर्ज काढून डोनेशन भरुन तिला शाळेत नोकरीला लावले.... त्याच शाळेत दुसर्‍या एकाबरोबर तिने पळून जाऊन दुसरे लग्न केले....... तिची नोकरी चालूच आहे... आणि नवर्‍याचे कर्जाचे हप्तेदेखील चालू आहेत....... रीतसर घटस्फोट होऊनही तिने कर्जाची जबाबदारी घेतली नाही, तिच्या नव्या नवर्‍यानेही नाही.......... पैसे न घेताही प्रेम करायला शिका, हा सल्ला त्याना बहुतेक कुणी दिलेला दिसत नाही..... घाण केली तर व्य्वस्थीत ती जागा झाकावी आणि मग ती जागा सोडावी, एवढी अक्कल कुत्र्यामांजरानाही असते.... अशा पळकाढूना हे कोण शिकवणार?)

हुंड्याच्या बाबतीत माझ्या पोस्ट उडवल्या याला मला आक्षेप घ्यायचा नाही... पण मला एडिट करायची संधी मिळायला हवी होती... कारण हुंड्याव्यतिरिक्त इतर महत्वाचे अनेक मुद्दे सुसंगतपणे मांडले होते, तेही उडाले. मी हुंड्याच्या ओळी कमी केल्या असत्या.... अ‍ॅडमिननाही हे करता आले असते.... असो.. आतादेखील हे करणे शक्य असल्यास अ‍ॅडमिनने मला तसे कळवल्यास चालेल....

मला जामोप्यांचे म्हणने १००% पटले. नवर्याने स्वताच्याच घरात रहात असताना ही आपला पूर्ण पगार आईच्या हातात दिलेला किती बायकांना पटेल? मला तरी मुळीच पटणार नाही. मग हीच अपेक्षा नवर्याने केली तर चुकलं काय? बायकोचे आई वडिल अगदीच लाचार असतील तर एक वेळ ठीक पण आहे, पण अरेरावी करून पैसे उकळणे कुठून ही समर्थनीय नाही .(हे मी फक्त जमोप्यांच्या बायको बद्दल बोलत नसून जनरल बोलतेय). कमावत्या बाईचा पगार तिचा स्वताचा असं मानलं तर तिची जबाबदारी तिने स्वता उचलावी, नवर्याच्या पगाराला हात ही लावू नये, हे अगदी सरळ समीकरण आहे..

वरती यश चोप्रा मुव्हीला शोभेलश्या "खर्या प्रेमाच्या" वगैरे गप्पा वाचल्या आणि कुणी इतका इमप्रेक्टिकल विचार करू शकतं ह्याचं खूपच नवल वाटलं.

यातला पहिला विचार खूपच पालटला आहे पण दुसरा विचार अजून ठाम आहे. ज्या (मध्यमवर्गीय) घरात नवरा पैसे कमावत नाही त्या घरात त्याची काय किंमत असते ते कधी पाहिले आहे का?
>> माझ्या एका जुन्या (तमीळ) कलिगच्या नवर्‍याला रिसेशनमुळे अमेरिकेत जॉब मिळत नव्हता. ऑफिसमध्ये खूप लोड असायचा.. तरिही तीच घरी जाऊन काम करायची - तो नाही 'बायकांची कामं' करायचा - पण ती मात्र करायची पुरुषांचीही कामं!
आणखीन एका ओळखीच्या मुलीच्या नवर्‍याचा अमेरिकेतला जॉब गेला.. तीला कॅनडा मध्ये जॉब मिळत होता - पण नवर्‍याला आधी डिपेंडंट म्हणून जाऊन मग वर्क परमिट घ्यावं लागलं असतं. नवर्‍यानं सपशेल नकार दिला! शेवटी ते परत भारतात गेले.
ह्या दोन्ही उदाहरणात मला पुरुषांचा इगो दिसतो!

आता माझा नवरा जॉब सोडून घरी बसला तर मला चालेल का?
तर मी घरी बसल्यावर घराची जशी जबाबदारी घेते तशी त्यानं घेतली तर नक्कीच चालेल!
किंवा त्याला पुढे शिकायचं असेल/विधायक काम करायचं असेल तरीही चालेल.

पुण्यात अजित अभ्यंकर म्हणून आहेत. त्यांनी आणि त्यांच्या बायकोनं कॉलेजात असतानाच ठरवलेलं की एकानं समाजसेवा करायची आणि दुसर्‍यानं घरासाठी कमवून आणायचं. अजित अभ्यंकर २०+ वर्ष समाजसेवा करतात आणि विपूल अभ्यंकर (बायको) मॉडर्न कॉलेजात शिकवतात.

बर्‍याचदा नोकरी सोडलेल्या नवर्‍याचा इगोच नाती ताणली जायला कारणीभूत ठरतो (असं मला वाटतं)

रीतसर घटस्फोट होऊनही तिने कर्जाची जबाबदारी घेतली नाही, तिच्या नव्या नवर्‍यानेही नाही >> म्हणजे त्यात तो दुसरा पुरुषही आलाच ना? त्यांची नियत नसेल बरोबर पण म्हणून सरसकट 'बायका' तशा होत नाहीत!

लग्न केलं म्हणजे माझी सगळी ( रहाणं, खाणं, आणि कपडेलत्ते) जबबदारी नवर्‍याने घेतली आहे. त्यामुळे मी मिळवलेला पैसा मी त्याला व्याजावार दिला आहे घर घेण्यासाठी असं जेंव्हा एका मुलीने मला सांगितलं तेंव्हां बोट काय माझा सगळा हातच तोंडात गेला. Proud

त्यामुळे मी मिळवलेला पैसा मी त्याला व्याजावार दिला आहे घर घेण्यासाठी असं जेंव्हा एका मुलीने मला सांगितलं तेंव्हां बोट काय माझा सगळा हातच तोंडात गेला
>> आयला! लग्नाचा अर्थच नाही कळला बिचारीला (अर्था(इकॉनोमी) मध्येच अडकून पडली) Proud

(नवर्‍याला सांगितलं तर म्हणाला "अग, चुकून बँकेशी लग्न केलं असेल त्या मुलानं" Wink )

नानबा, उसगावातून भारतात आल्यावर मी ४ महिने (त्यातले २ ऐच्छीक) घरी होतो तेंव्हा लोकांनी मला अनेक कुत्सीत प्रश्ण विचारले होते. हा झाला समाजाचा दृष्टीकोण आणि त्या प्रश्ण विचारणार्‍यात ९०% बायकाच होत्या.

तो नाही 'बायकांची कामं' करायचा >> नवर्‍याने पण घरकामात भाग घेतलाच पाहिजे. पण मी पाहिलेल्या उदा.मध्ये मला वेगळेच जाणवले. त्यातली जेंव्हा बायको जॉब करत नव्हती तेंव्हा काही घरकामे करताना (कपडे वाळत घालणे ई) तिला आम्ही कधीच पाहिले नव्हते. पण मग जेंव्हा तिच्या नवर्‍याची नोकरी गेली तेंव्हा त्याला ती पण कामे करायला लावायची त्याची बायको. इथे इगो दुखावणे सहाजिकच आहे ना? त्यात चूक काय? कोणत्या बाईचा नसता दुखावला इगो?

नवर्‍याचा इगोच नाती ताणली जायला कारणीभूत ठरतो>> साफ चूक! बायकोचा इगोही तेवढाच कारणीभूत असतो. फक्त पुरुषांचा आणि बायकांचा इगो वेगवेगळ्या बाबतीत असतो.

त्यांची नियत नसेल बरोबर पण म्हणून सरसकट 'बायका' तशा होत नाहीत! >> अगदी बरोबर. आणि हेच विधान पुरुषांना पण लागू पडते.

रीतसर घटस्फोट होऊनही तिने कर्जाची जबाबदारी घेतली नाही, तिच्या नव्या नवर्‍यानेही नाही >> म्हणजे त्यात तो दुसरा पुरुषही आलाच ना?

बायकानी झटके दिले की पुरुष शहाणपणा शिकतात, त्याचा हा पुरावा!! आधीच्या नवर्‍याला कर्जात ढकलून जी बाई आपल्याकडे येत आहे, तिचे कर्ज तो नवा पुरुष कशाला डोक्यावर घेईल??? Proud पुढच्यास ठेच मागचा शहाणा!! यात त्याची नियत खोटी म्हणण्याचा संबंध येतोच कुठे?? Happy

बायकोचा इगोही तेवढाच कारणीभूत असतो. फक्त पुरुषांचा आणि बायकांचा इगो वेगवेगळ्या बाबतीत असतो.
>> मागे घेते माझं वाक्य.. समजुतदार पणाचा/मॅच्युरिटीचा अभाव म्हणूयात का?

आणि हेच विधान पुरुषांना पण लागू पडते.
>> ११०%.. माझ्या कुठल्या विधानातून ह्याच्या विरुद्ध जाणवलं असेल तर सॉरी.. आणि माझा नवरा, बाबा, मामा,आजोबा अशी मंडळीही पुरुषच आहे - इतक्या पुरुषांचा इतका छान अनुभव असताना - मी पुरुषांना ब्लँकेट वाईट म्हणूच शकत नाही! Happy

जामोप्या,
आधीच्या नवर्‍याला कर्जात ढकलून जी बाई आपल्याकडे येत आहे
>> मी अशा सिच्युएशन मधे असेन तर असं वागणार्‍या व्यक्तीबरोबर (बाई/पुरुष) लग्नच नसतं केलं!
(म्हणजे वरच्या उदाहरणात तुमच्या मेहुणीबरोबर) - किंवा केलं असतं.. तरी पैसे परत केलेच असते/करायला लावलेच असते (हे ज्यानं केलं नाही, त्याला नियत नाहीच्चे! तुम्हाला हे समर्थनीय (शहाणा पुरुष) वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मेहुणीच्या पहिल्या नवर्‍यावर अन्याय करताय!)

Pages