लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी

Submitted by सिद्धा on 6 January, 2010 - 21:01

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले - मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.

लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.

फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. आणि समाजाच्या सगळ्या स्थरांतील लोकांची होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.

मायबोलीकर सुनील यांनी लिहिलेली गोष्ट 'विश्वास - अविश्वास', तसेच 'कुणाशी तरी बोलायचंय' मध्ये वेळोवेळी येणार्‍या अनुभवांवरुन हा धागा सुरु केला आहे. इथे मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक भा.प्र आहे. इथे लिहीणा-या किती जणांनी/ जणींनी स्वतः परिपूर्ण इतका आढावा घेतला होता ?
पुढच्यास ठेच वगैरे सर्व कबुल आहे पण आपण एक डिप्स्टीक सर्वे घेतला तर कितींनी पूर्वतयारी केली होती हे लक्षात येईल.

मी/ आम्ही घेतला नव्हता. आमचं विवाह छान चाललाय. पण लग्न जसं करु नये (ठरवून, समारंभी, पाहून, पत्रिका पाहून, मुहूर्तावर वगैरे. थोडक्यात नव-याच्या भाषेत ISO Certified) असं आम्हाला आता वाटतं आणि तेव्हाही वाटायचं तसंच आम्ही केलं. Happy

एक गोष्ट नक्की करा.... एकदा लग्न ठरते आहे असे जाणवले की आपल्या ओळखीतल्या शक्य तितक्या लोकांकडे ह्या संदर्भात बोलायला सुरुवात करा... ह्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की जर समजा चुकून कुठे काही प्रॉब्लेम असेलच तर तो कळायला खुप मदत होते.. जसे जसे तुम्ही लोकांना सांगयला सुरुवात करता तसे तसे कुठून कुठून संदर्भ जुळून, अरे.. ही मुलगी आहे का.. ती तर आमच्या नात्यातील आहे.. किंवा हा मुलगा का.. तो ना माझ्या भावाचा चांगला मित्र आहे.. असे अनेक नाते संबंध कळायला मदत होते.. आणि त्यातूनच काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला कधी कधी प्रत्यक्ष कळलेल्या नसतात किंवा मुलगा किंवा मुलगी स्वत: सांगतच नाहीत त्या कळू शकतात...

मिनोती, ते बरेच बाफ आहेत. पण याचा उद्देश स्पेसिफिकली लग्नात अनेकदा कशी फसवणूक होते आणि कशी ती टाळता येईल हाच आहे. एखाद्याची तरी तशी टळली, तरी खूप काही मिळवलं.
रैना, चांगला प्रश्न. नाहीच घेत लोक आढावा, आम्ही पण नव्हता घेतला. आमच पण छान चाललंय. पण घ्यावा आढावा आधीच.
हिम्स, चांगलं सजेशन आहे हे.
ह्या माझ्या ओळखीतील सुशिक्षित आणि सुस्थापित घरातील केसेस:

माझ्या एका मैत्रिणीला या घाईतल्या, वय उलटून चालल्याच्या भीतीने केलेल्या लग्नातून जीव गमवावा लागला. चांगला अ‍ॅमेक्स मध्ये कामाला होता, पण अतिशय खुनशी. नंतरही त्याचा स्वभाव लक्षात येऊन तिने निर्णय उशीरा घेतला आणि आई-वडिलांनी होतं कधीकधी म्हणून दुर्लक्ष केलं खरं तर त्याला हिस्टरीच होती, नोकर्‍या धरसोड करायची आणि प्रचंड संतापी स्वभावाची. ती सोडून जाणार म्हणून त्याने खूनच केला तिचा. बरेचदा लोकं वॉर्निंग सिग्नल्स्/फ्लॅग्स दिसूनही दुर्लक्ष करतात.

दुसर्‍या प्रकरणात एका इंजिनियर मुलीला आपला मुलगा काही दिवसांचा साथी आहे हे कळूनही वारस हवा म्हणून त्याचं लग्न करुन फसवलं Angry . आणि या प्रकरणात लग्न साग्रसंगीत करुन मागितलं होतं.

तिसर्‍या प्रकरणात मुलीचं वडिलांच्या ड्रायव्हरशी प्रकरण होतं तरी तिचं लग्न जमवायचा प्रकार सुरु होता, त्यासाठी दूर गावीचा मुलगा बघत होते, कारण तिथे किर्ती पोहोचणार नाही म्हणून.

हे असलं होऊ नये, शेवटी हा आयुष्याचा प्रश्न असतो आणि लग्न ही काही सारखीसारखी होणारी गोष्ट नसते.

असुदे/मनःस्विनी/सुस्मिता/नानबा/मंजु- मस्तच पोस्ट्लत.
जामोप्या - सगळ्यांना एकाच तराजूत तोलायची चूक वारंवार करता आहात.माणसागणिक अनुभव बदलतात. मला वाईट अनुभव आला म्हणून सगळे जगच वाईट असे क्रुपया समजु नका. उद्या कदाचित तुम्हाला मुलगी झाली आणि जे तुम्ही आज म्हणताय तेच तिचा नवरा म्हणाला तर?

ह्म्म्म्म्म्म... वरच्या सर्व पोस्ट्स वाचल्या..काही पोस्ट्स मधे वैयक्तिक असंतोष्,अपेक्षाभंग व्यक्त करण्यात आल्यामुळे जरा विषयांतर झाल्यासारखे वाटले.. मला वाटतं भाग्यश्री चा मूळ विषय ,'मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.' हा आहे ना.. मग ज्यांना जे काही बरे वाईट अनुभव आलेत्,त्यांनी विवाहेच्छुक लोकांना रेड फ्लॅग (धोक्याचे सिग्नल)कसे ओळखावे याबद्दल काही सूचना करता आल्या तर जास्त उपयुक्त होईल ना..

भाग्यश्री,

खरच उत्तम विषयाला हात घातला आहेस. मला वाटते की इथे स्त्रीपुरुषांनी परस्परांवर दोषारोप करण्याऐवजी, वा नुसतेच मला वा माझ्या अमुकतमुकला आलेले वाईट अनुभव देण्याबरोबरच एक चेकलिस्ट होउ शकते जर सर्वांनी हातभार लावला तर. नानबाने चांगली सुरुवात केली आहेच.

आजकाल प्रत्येक जणच एवढा रोजच्या लढाईच्या घाईत असतो की निर्णय घेतांना सर्वकष विचार वा पडताळणी केली जातेच असे नाही. अशा यादीमुळे, किमान हाही विचार करायला हवा अशी कुठेतरी मनात नोंद झाली तरी त्याचा उपयोग आहे.

सावधगिरी दोन बाबतीत घ्यायला हवी असे वाटते. फक्त फसवणूक या बाबतीतच नाही तर पुढील यशस्वी सहजीवनासाठी अनुरुपता याबाबतीत सुद्धा खातरजमा करणे आवश्यक असू शकते.

(फसवणूक)
शिक्षण
नोकरी, हुद्दा, पगार
शारिरीक व मानसिक आरोग्य
आर्थिक परिस्थिती (उत्पन्नाचे स्त्रोत, कर्ज वगैरे)
स्थावर मालमत्ता
कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटूंबाचे सामाजिक स्थान.
सवयी वा व्यसने
पूर्वेतिहास( लग्न, गुन्हे, ऑफिसमधून निलंबन, मेडिकल इत्यादी)

(अनुरुपता)
स्वभाव
छंद
आवडीनिवडी
स्वच्छता
सौंदर्यदृष्टी
पारंपारिकता
एकंदर मूल्ये
भविष्यकालीन योजना
-करिअर,
-कुठे स्थायिक व्हायचे,
-मुले वगैरे.
सध्या असलेल्या वा येउ शकतील अशा जबाबदार्‍या
जोडीदाराबद्द्लच्या, त्याच्या करिअरबद्द्लच्या कल्पना
जोडीदाराच्या खाजगी अवकाशाचा आदर

यातल्या अनेक गोष्टींची पूर्वी नातेवाईक वा मध्यस्थामार्फत खातरजमा केली जात असे, मला कित्येकदा ऑफिसमध्ये असे अनेक कुणाची ना कुणाची खातरजमा करुन घेणारे फोन येत असत. अजूनही कधी कधी येतात. पण ओळखीतच असे अनेक जण पाहिले की घाईगडबडीत हा 'माहिती काढणे' हा प्रकार करत नाहीत. अनेकांचे तेवढे नेटवर्कही नसते. अशा वेळेला फसवणूक टाळण्यासाठी नामवंत व्यावसायिक तपास संस्थांची मदत घेणे हा पण एक चांगला पर्याय आहे. आयुष्याचा प्रश्न असल्याने संकोचायचे कारण नाही आणि त्यासाठी वीस पंचवीस हजार खर्चही फार नाही असे वाटते.

अनुरुपतेच्या खातरजमेसाठी एकमेकांबरोबर डोळसपणे बराच वेळ घालवणे याला पर्याय नसावा.

जाता जाता...

"आपल्याकडे लग्न करणे फार सोपे आहे आणि घटस्फोट मिळणे कठीण, आणि हेही समस्येचे मोठे कारण आहे. याच्या उलट केले पाहिजे, लग्न करणे अवघड आणि घटफोट मिळणे सोपे. पाच वर्ष एकत्र राहिल्याशिवाय लग्न करायची परवानगीच मिळाली नाही पाहिजे. " असे ओशो सांगून गेले आहेत.

अनुरुपतेच्या खातरजमेसाठी एकमेकांबरोबर डोळसपणे बराच वेळ घालवणे याला पर्याय नसावा.>>वेल सेड.

आपल्याकडे लग्न करणे फार सोपे आहे आणि घटस्फोट मिळणे कठीण,>> जी एस अरे समाजाचा घटस्फोटितांकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही संकुचितच आहे. मग ती स्त्री असो अथवा पुरूष Sad

जीएसनी दिलेल्या यादीत अजून काही गोष्टी..

मित्र मैत्रिणींची जुजबी माहिती..
खरेदी करण्याच्या सवयी..

>>>जी एस अरे समाजाचा घटस्फोटितांकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही संकुचितच आहे. मग ती स्त्री असो अथवा पुर>>><<
अगदी खरे.
इथेच(माबोवर) कोणाच्या एका बीबी/पोस्ट वरून ह्याच वरील गोष्टीचे दर्शन झाले होते की घटस्पोटीत असणे म्हणजे ती व्यक्ती व फॅमिली वाईटच.

वर्षू, बरोबर. तू म्हणतेस तोच बाफचा विषय आहे.

जीएस, अगदी असेच काहीसे मला मांडायचे होते, पण मला ते इतक्या सुसूत्रपणे जमले नाही. अशीच यादी अपेक्षित आहे. आणि घटस्फोट ही आपल्याकडे अतिशय वेळकाढू आणि क्लेशदायक गोष्ट आहे हे ही खरेच. पण या बाफच्या अनुषंगाने, एखाद्याची चूक नसताना जेव्हा त्याला/तिला या सगळ्यातून जावे लागते, तेव्हा पुनर्विवाह करताना तर अजूनच खबरदारी बाळगावी असे मी म्हणेन.

बाकी जामोप्या, तुम्हाला आलेले अनुभव क्लेशदायक असतील व त्याबद्दल सहानुभूती नक्कीच आहे, पण म्हणुन हुंडा देणे वै. या प्रथा योग्य वाटत नाहीत. तसेच <<<माझी मुलगीदेखील तिच्या सासूने त्या घरासाठी जे केलेले असते त्याचे फळ आयते चाखणार असते ना?>> हेही बरोबर नाही. तुमची मुलगी पण २०-२५ वर्षे राहिलेले आपले घर सोडून जाणार असते, तिथे त्या घरात घरकाम इ. सगळे करणारच असते. आयुष्यात आयते असे काहीही कोणालाही सहसा मिळत नाही.

असो, वर गोविंदने म्हटल्याप्रमाणे दोषारोप इ. न करता आपल्याला एक चेकलिस्ट करता आली आणि तसे प्रकार होऊ नयेत म्हणुन काही ढोबळ जरी उपाय सुचले, तरी चांगले.

सर्वसाधारणपणे प्रत्येकजणच, लग्न केल्यावर आपल्या जोडीदारात जन्माचा सोबती , सुखदु:खातील भागीदार शोधत असतो. पण जर दोघांमधला संवाद (कम्युनिकेशन) मूकच राहिला तर मात्र दुसर्याला आपल्या मनातल्या अपेक्षा आपण न बोलता उमजायला हव्या अशी आशा करणं अजिबात चुकीचं आहे.

लग्नाच्या आधी मात्र होणार्या जोडीदारा कडे पाहतांना थोडं एलर्ट असावं. उदाहरणार्थ
१) तो रमत असलेलं वातावरण कसं आहे?
२) काही व्यसनं आहेत काय?
३) जॉब कसा आहे?
४) त्याची मानसिक आणी शारीरिक हेल्थ कशी आहे?
५) त्याची वृत्ती आनंदी आहे का?
६)त्याचे त्याच्या घरच्यांशी,भावाबहिणीशी संबंध कसे आहेत?
७)त्याच्या फॅमिलीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आहे?
या सर्व गोष्टींचा पुढील आयुष्यावर प्रभाव पडू शकतो.
याशिवाय दोघांच बॅकग्राउंड आणी मूल्ये जवळपास सारखी असतील तर त्यांचे मॅरिड लाईफ सुखी होण्याचे जास्त चान्सेस आहेत. पण जर का अगदी वेगवेगळ्या वातावरणात ते वाढलेले असतील तर मात्र किरकोळ आवडीनिवडीत फार तफावत सुद्धा सहज ,वादाचे कारण बनू शकते.

साखरपुडा झाला असल्यास लग्नापूर्वी काही काळ कोर्टिन्ग साठी जरूर असावा. या काळात त्याच्या व्यसनांकडे,पैश्याच्या उधळपट्टीकडे , अस्वच्छतेकडे, आक्रस्ताळेपणाकडे, आपमतलबीपणाकडे, असहनशीलतेकडे, दुसर्यावर अंकुश ठेवण्याच्या वृतींकडे दुर्लक्ष करु नये. हेच ते 'रेड फ्लॅग्स' आहेत.
लग्न झाल्यावर सुधारेल अशी (वेडी)आशा ठेवू नका.
अर्थात आपण सर्वांतच काही ना काही दोष असतोच. निर्दोष मनुष्य ही गोष्ट अस्तित्वात नाही. फक्त आपण दुसर्याचे कोणकोणते दोष जन्मभर सहन करू शकतो याची आपल्याला जाणीव असणे फार जरूरी आहे.
एकतर कोणत्याही जोरजबर्दस्तीला,आवेगाला बळी पडून लग्न करू नका. धार्मिक आणी जनरल विचारांमधे फार तफावत असली तरी लग्नाला नकार द्या. थोड्या प्रगल्भ वयात लग्न करा.
थोड्याफार बेसिक प्रिकॉशन्स घेतल्या तरी सुखी जीवनाचा पाया उभारण्यास नक्कीच मदत होईल..

वर्षू, चांगली लिस्ट दिलीस.

ओ राजे, बाफचा विषय बघा की राव! हुंडा देणं आणि घेणं दोन्ही वाईटच, घेणं कायद्याने गुन्हा आहेच.

मस्त मुद्दे मांडलेत अलमोस्ट सगळ्यांनी - आणि GS नं तर सगळच कव्हर केलं म्हणायला हरकत नाही!

सॉरी भाग्यश्री - विषयांतर
मुलगी सासरी हुंडा घेऊन गेली तर तिला समजेल की हे घर्/नवरा/सासर फुकट मिळालेले नाही...
>> आणि नवर्‍याला कधी कळणार भाऊ की बायको फुकट नाहीये.. बर्‍याच जणांची बायकोची कल्पना 'घरकामाला बाई, मुलाबाळांना आई' अशी असते..त्यांच काय? हुंडा घेणं म्हणजे ऑफिशियली स्वतःला विकणं - पटत असेल तर करा (किती किम्मत केलीत स्वतःची?)
घरचा स्वैपाक, बरीचशी काम कोण करतं? मग मोलकरीण तासाला घेते, त्यानुसार पगार पण द्या बायकोला (किंवा काम करणार्‍या व्यक्तीला)
काय राव, लग्न संकल्पनेतली मजाच घालवलीत तुम्ही. Sad

लग्नाळू स्त्री पुरुषहो - समोरचा आपली काय किम्मत करतोय- तो आपल्याशी काय विचार करून लग्न करतोय ते ही बघून घ्या.
तो/ती आपल्याला आपल्या आईवडीलांपासून तोडून तर टाकत नाहिये ना? सगळ्यांच मिळून एक कुटुंब असा विचार करण्याची त्याची क्षमता आहे ना? नसेल तर आपल्याला ते चालणार आहे का?
हे माहित करून घेता आलं तर बघा

इनिंग संपल्यावरील २०/२० हाइंड्साइट. Happy

स्त्रीयांच्या समानतेसाठी प्रयत्न करणार्‍यांना असे लग्न अभिप्रेतच नाही. दोन मनांचे मीलन, शारीर संबंधात
कॉम्पॅटिबिलिटी, आर्थिक निर्णयांचे स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य या व अश्या निकषांवर आधारित नातेसंबंध अभिप्रेत आहे ज्यात दोन्ही पार्टनर्सना आनंद आहे. मुले जोपासण्यातील सूख आहे. वैयक्तिक सिच्युएशन व स्वभावदोषांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे खापर क्रुपया चळवळीवर फोडू नये. खरी मुक्त व विचाराने प्रगल्भ स्त्री असे वागणार नाही. तिला एक मॅच्युअर पुरुषच समजून घेवू शकेल.

दोन्ही पार्टनर्स व त्यांची मुले यांचे जीवन त्या लग्नसंबंधाने एनरिच होत असेल तर ते एक प्रॉडक्टीव लग्न आहे नाहीतर कुंकवाचा धनी/मंगळसुत्राचा आधार वगैरे हुंडा देउन घेणे म्हण्जे स्वतःलाच फसवीणे आहे. ते एक आर्थिक व सामाजिक कॉन्ट्रॅक्ट आहे. आपल्याला ह्या भावनिक, शारीरिक, आर्थिक व सामाजिक कमिटमेन्ट मधून काय हवे आहे व ते ह्या स्त्री/ पुरुषाकडून मिळू शकेल काय याची थोडी तरी कल्पना आल्याशिवाय लग्नाच्या विचारात पडू नये.

लग्नपुर्व रक्त तपासणीचा आग्रह आता लोक धरतात का (मुलाचा आणि मुलीचाही)? (एच आय वी आणि एस टी डी साठी?)
मला वाटते यावर कायदा होणार होता पण काही कारणाने बारगळला.
मला वाटते लग्न फायनलाईझ करण्यापुर्वी हा आग्रह धरायला हवा.

तर काही मुलीच्या आई वडिलांना अमेरीकेतलाच मुलगा हवा अशीही मागणी असते.
मी तर ऐकले की आजकाल या उलट आहे. शक्यतो अमेरिकेतला नवरा, किंवा बायको नको. मागून तिथे जावे लागले तरी परत येतील याची खात्री हवी असते.

मला पटते ते. आहे काय या अमेरिकेत? भारतातल्या लोकांना आजकाल नोकर्‍या, पैसे, सर्व काही भारतात मिळते. सुधारणा होतातच आहेत. नोकर चाकर उदंड. म्हणजे आयुष्य अत्यंत आरामाचे. वशिला, लाचलुचपत याचा फायदा होतोच तिथे.

इथली मुले म्हणतात, भारतीय असली तरी 'चालेल' पण इथे जन्मलेली वाढलेली पाहिजे! शिवाय लग्न हे काहि अत्यावश्यक आहे, किंवा जीवनातली ती एक मोठी गोष्ट आहे असे फारसे लोक मानत नाहीत.

राजे
>>>>हूंडा: बाजू नं. १---------------------प्रथेची वाईट माणसांशी गाठ पडते तेंव्हा परिणाम वाईट येतात.>>>>

तुम्ही हे गम्भीर पणे लिहिलय???
Are you serious???
आधी शहानिशा करून घेतो अन मग वक्तव्य करतो!!!

त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार प्रथा सुरू होतात, नंतर बदलत्या परिस्थितीमधे काही प्रथा चुकीच्या वाटू लागतात. कोणतीही प्रथा चांगली की वाईट हा भाग अलाहिदा, पण प्रथेची वाईट माणसांशी गाठ पडते तेव्हा परिणाम वाईट येतात हे मात्र अगदी बरोबर. हे वाक्य खरोखर भिडेश आहे Happy

माझे लग्न आजुन व्हायचे आहे.... (search is in progress)
हे सगळे अनुभव वाचुन वेड लागायची वेळ आली आहे Sad

Medical checkup चा विचार कधी मनात पण आला नव्हता... पण आपण सगळ्यानी दिलेल्या माहीती नुसार ते फार महत्वाचे आहे हे पटले.... त्याबद्दल शतशः धन्यवाद देउ इछितो ...

आणि माझा( आनी कुणाचाच) future मधे जागो मो. प्या होउ नये) ही ईश्वर चरणी प्रार्थना ...

Thank you once again to all of you Happy

अहो वेड लावून घेवू नका.. तुमचे लग्न अजुन व्हायचेय. मुलीला पटणार नाही की ह्या मायबोलीवरच्या पोस्ट वाचून तुमचे असे झालेय. Happy
तसे अजुनही आपल्या देशात लग्न झाल्यावर सुधारेल असे मानतात मग हरकत नाही. Happy ह. घ्या.

पुण्यात श्री. अनिल व सौ. शोभा भागवत प्री-मॅरेज काउन्सेलिंग छान करतात. शनिवार पेठ, राजमाचीकर गिरणीसमोर, दक्षिणमुखी मारुती बस थांबा.

अ^ड मिन,
राजे यांचे वक्तव्य कायद्याविरुद्ध आहे याची नोंद घ्यावी.
हुन्डा देणे व घेणे बेकायदेशीर आहे.

माझ्या वकिल मैत्रिणिने दिलेली तांत्रिक माहिती.
gifts from girls' parents without demand from groom's side is not considered as dowry.so such cases can not be considered as dowry cases and no action can be taken against them.

Pages