दुधी भोपळ्याचा रस्सा.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 January, 2010 - 13:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ ते २ वाट्या दुधी भोपळ्याच्या फोडी
फोडणी : साजुक तुप, राई, जिर, कढीपत्ता
वाटण : पाव वाटी खोबर, २ ते ३ मिरच्या, थोडी कोथिंबीर, ४-५ लसुण पाकळ्या एकत्र वाटून
चवी पुरते मिठ,

क्रमवार पाककृती: 

प्रथम साजुक तुपावर राई, जिर, कढीपत्त्याची फोडणी टाकावी. मग त्यात वाटण घालुन थोडे पाणी घालावे व वरुन दुधीच्या फोडी टाकाव्यात. पाणी गरजेनुसार घालावे. दुधी शिजत आला की मिठ घालावे. व थोडावेळ उकळवुन गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यात मिरची ऐवजी मिरी घातली तरी छान लागते. व कोथिंबिरही नाही घातली तर ही कढी बाळंतीणीसाठी फायद्याची ठरते. खोबरे ओले किंवा सुके कोणतेही चालते.
वरील प्रकाराची कढी अगदी सुप सारखी लागते. वरुन थोडे लिंबू पिळले तरी चव छान लागते.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचेच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, फोटो दे ना... तुझी फोटोशिवाय पाकृ सहन होत नाही Wink

यात दही नाही, ताक नाही, डापि नाही, तो फिर कढी काय को बोल रैली हय Wink
मी दुधीची भाजीच अशी करते. फक्त आधी दुधीच्या फोडी, मग वाटण. आता एकदा मिरच्यांऐवजी मिरी घालून बघेन तू लिहिल्याप्रमाणे.

मंजुडी ही रेसिपि २०१० सालची आहे बघ. मी तेव्हा माबोवर फोटो क्वचित टाकत होते.
आणि नउदबदलुया आपण. ही चुक आत्ता तू लक्शात आणुन दिलिस.

आणि नउदबदलुया आपण.>> क्रोममध्ये खोडत खोडत काहीतरी लिहिलेले दिसतेय जागूने Wink

अगं २०१० सालच्या रेसिपीत २०१५ संपायच्या आत फोटो दे Happy

सूपसारखी लागणारी कढी आणि तिला रस्सा म्हणायचं. बघा पाच वर्षांत किती फरक पडलाय.

रस्सा आणि दुधी हे दोन शब्द एका वाक्यात कसे बसले बुवा?

सूपसारखं करायचं तर दुधीचे तुकडे ब्लेंड करायचे का?

डिटॉक्ससाठी दुधी छान म्हणतात. पण त्याचा ज्युस काही पिववणार नाही. हे चालेल का? पाव वाटी खोबर्‍याकडे काणाडोळा करून?

भरत, मी दुधीचं लेमन कॉरीअँडर सूप करते -

दुधी भोपळ्याच्या फोडी मावे किंवा कढईत झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या. आणि थोडं पाणी घालून गुळगुळीत ब्लेंड करून घ्यायच्या. घरचं लोणी किंवा तूप किंवा बटर गरम करून त्यात आल्या-लसणीचे अगदी बाऽरीक तुकडे घालून परतून घ्या. त्यात चिरलेली कोथिंबीर भरपूर घालून परता, झाकण ठेवायचं नाही. लगेचच दुधीची प्युरी घाला. उकळी आली की चवीनुसार मीठ साखर घालून गॅस बंद करा. बाऊलमध्ये घेतल्यावर त्यात लिंबू पिळून आवडीप्रमाणे मीरपूड घालून प्या.

भरत शिकतेय हो अजुन मी मायबोलीवरच. चुका होत असतील तर दाखवत रहा म्हणजे सुधारता येईल.

बर खोबर घातल आहे म्हणून रस्सा लिहिल आहे. कारण आम्ही माश्यामध्ये खोबर घालतो आणी त्याला रस्सा म्हणतो.

मी पण सुप करते दुधीच. आठवड्यातून एकदा तरी असत. दुधीचे तुकडे, एखादा गाजर तुकडा, थोडे मटारदाणे कुकरमध्ये शिजवून घेते. मग ते मिक्सरमध्ये काढून तुपात लसूण, दालचीनीची फोडणी देते व त्यावर वाटलेले मिश्रण घालते. गरजेनुसार पाणि काही जण दुधही घालतात. मग त्यावर मिठ आणि मिरपूड घालून सुप बनवायचे. खुप चविष्ट अगदी पाया सुप सारख लागत हे सुप.

भरत दिवा देण्यासारख मी काहीच मानल नाही. Happy सुप नक्की करुन पहा. हल्ली दूधीवर भरपूर वाचायला मिळत. हेल्थ्साठी दूधी चांगला असतो.

ऑर्किड धन्यवाद.