उकड हंडी

Submitted by जागोमोहनप्यारे on 1 January, 2010 - 10:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कांदा, १ मोठा बटाटा, १ कच्चे केळ, लाल भोपळा १०० ग्रॅम, फरसबी ५० ग्रॅम, कांद्याची पात ४-५ कांदे, १ लहान रताळे, १ वांगे

१-२ चमचे मीठ, १-२ चमचे लाल तिखट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा काळा मसाला, १/२ चमचे जिरे, २ लवंगा, दालचिनी, कढीपत्ता १०-१२ पाने.

२ चमचे तेल, बटर १ चमचा

क्रमवार पाककृती: 

१. सर्व भाज्या चिरून लांबलांब फोडी कराव्यात.

२. नॉन्स्टिक पॅनमध्ये सगळ्या फोडी, तेल,मीठ, तिखट, मसाला, हळद, जिरे, कढीपत्ता, दालचिनी आणि लवंगा घालून व्यवस्थीत हलवून घ्यावे.

३. नंतर मंद आचेवर भांडे ठेऊन झाकण लावून शिजवावे. पाणी अजिबात घालू नये.

४. पाच सात मिनिटानी एकदा भाजी खालीवर करावी. मसाला तळाला लागतो आहे, असे वाटले तर २-४ चमचे पाणी घालावे. पुन्हा झाकण लावून शिजवावे.

५. एकूण १०-१५ मिनिटे शिजले की शेवटी १ चमचा बटर घालावे.

हा पदार्थ खरे तर मडक्यात करतात. मडक्यात भाज्या घालून घट्ट झाकण लावून आगीत शिजवतात. सोयामीटचे तुकडे स्वच्छ धुऊन पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवावेत. त्यातले पाणी पिळून ते तुकडेदेखील भाजीत घातले तर छान लागतात. झटपट होणारा प्रकार आहे. काळा मसालाऐवजी रस्सम मसाला घातला तरी चव छान येते. Happy . कुठल्याही भाज्या चालतात. शक्यतो चार पाच तरी असाव्यात. पालाभाजी, भेंडी , कच्चा टोमॅटो वापरले तरी चव छान येते.

वाढणी/प्रमाण: 
३-४ व्यक्ती
अधिक टिपा: 

पोपटी नावाचा असाच एक मडक्यात करायचा भाजीचा प्रकार आहे (म्हणे.)

माहितीचा स्रोत: 
'मिसळपाव' वरील गणपाभाऊंची उकडहंडी .... :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज केली. मस्त झाली. एकदम चविष्ट. परतत बसा वगैरे वेळपण वाचतो. कृती शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

मी पण करतो ही भाजी अनेकवेळा. (म्हणजे परतायला वेळ नसेल, पुस्तक वाचायचे असेल आणि घरात चार पाच भाज्यांचे तुकडे उरलेले असतील तर ) पण याला उकडहंडीपेक्षा घडाभाजी हे नाव जास्त समर्पक आहे.
पोपटी म्हणजे पावट्याच्या शेंगा मडक्यात उकडून करतात तो प्रकार. या शेंगाबरोबर अंडी पण उकडतात.

छान

पोपटी नावाचा असाच एक मडक्यात करायचा भाजीचा प्रकार आहे (म्हणे.)>>>>>>>>>>... हा प्रकार आहे...अलिबाग ला मुख्यत्वे करतात.....चिकन ची किंवा भाज्यांची बनवतात......पण त्या साठी भांबुर्डी चा पाला लागतो......मडक्यात खाली हा पाला मग केळीचे छोटे पान त्या वर मॅरिनेट केलेले चिकन परत केळिचे पान , भांबुर्डी चा पाला , चिकन असे थर लावुन मग ते मडके पानाने घट्ट बांधुन उलटे खड्ड्यात टाकुन आग लावली जाते....स्पेसिफिक टाइम नंतर ते बाहेर काढले जाते...थंड झाले की त्यावर ताव मारु शकतो....अप्रतीम लागते....

पोपटीसाठी भांबुर्डी चा पाला लागतो ह्यापाल्याचा उपयोग वास आणि आतले जिन्नस जळू नये म्हणून करतात

व्हेज पोपटी करण्यासाठी त्यात कांदा बटाटे आणि वालाच्या शेंगा लागतात
पहिल्यांदा ह्यापाल्याचा बऱ्यापैकी जाडा थरलावून वालाच्या शेंगा भिजवून निथळून त्यात ओवा आणि मीठ एकत्र करून मडक्यात थर लावतात त्यानंतर बारीक कांदे मध्ये काप देऊन वं बटाटे मध्ये चार चिरा देऊन त्यात चवीपुरता मीठ मसाला भरून परत वरून भांबुर्डी चा पालयाचा थर लावतात आणि मडके जमिनीवर उपडे घालून वर पेंढा आणि जळाऊ लाकूड शेकोटी पेटवावी मडके लाला झाले की आतील वालाच्या शेंगा शिजल्या की एक वास येतो त्यावरून पोपटी शिजली असे समजावे.

नॉनव्हेज पोपटी मध्ये सुद्धा सेम फक्त बटाटे आणि कांदा न टाकता चिकन चे तुकडे माल मसाला लावून सिल्व्हर फोईल मध्ये गुंडाळून आत मध्ये ठेवावेत

आज उकडहंडी करणार

त्याच गर्दीत अळूवड्यापण करून घेणार , एकावर एक फ्री

SAVE_20210926_114430.jpegIMG_20210926_130029.jpgSAVE_20210926_132144.jpeg

छान.

अरे हे इंटरेस्टिंग वाटतंय! निवांत टीव्ही बघत करता येईल, हलवा ढवळा प्रकार नाही दिसते फार. करुन बघतो.