गणपती पुळे.....

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

याच महिन्यात गणपती पुळ्याला जाऊन आलो. मनात भक्तिभाव नव्हताच पण 'इस घरमे रहना है तो....' बर्‍याच गोष्टी कराव्या लागतात.

त्याची निवडक प्रकाश चित्रे...

हा मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी असणारा पितळेचा उन्दीर. त्याच्या कानात लोक आपल्या इच्छा सांगतात...

undir1.JPG
देवळाचे रंगकाम चालू आहे.
deul1.JPGdeul2.JPGdeul3.JPG

मंदिरानन्तर माणसे जातात पहिले बीचवर...
इथला बीच सुन्दरच आहे....
सायंकाळची क्षणचित्रे....
beach1.JPG

विषय: 

भंडारपुळे...

26855065[1].jpg26855209[1].jpg

हा भन्डारपुळ्याचा कृष्णाली रिसॉर्ट

26855273[1].jpg
गूगल अर्थ दृश्य भन्डारपुळे
bhandar.jpg

मी तर ठरवलेय पुढचा मुक्काम भन्डारपुळे !! Proud

मी देखिल आता २५ ते २८ या सुट्टीत जावुन आलो. पण आता इथे तोबा गर्दी आहे. २५ तारखेला चक्क ३०० बसगाड्या आल्या होत्या. इतर छोटी वाहने वेगळिच त्यामुळे गावात वाहतुक मुरांबा होता. असो..
आरेवारे बीचचे फोटो काढले की नाही .. त्याच्या शेजारुन जाणारा रस्ता देखिल सुरेखच .. प्राचिन कोकण / कवी केशवसुत स्मारक पाहीले की नाही .. आम्हाला फोटो पाहायचे आहेत. Happy

नाही ना. एक तर लग्न गाठायचे होते रत्नागिरीत पावने बाराचे. त्यामुळे खूप धावपळ झाली. भन्डारपुळ्याचेही फोटो नाही काढता आले. मालगुन्ड आणि प्राचीन कोकणही राहिले. आता पुन्हा एकदा जावे लागेल Proud

रॉहू, किती तारखेला होतात रत्नागिरीत? मी २६-२७ ला होते. गणपतीपुळे तिथे असलेल्या गर्दीचा सुगावा लागल्याने ड्रॉप केलं. पावसला नव्हती एवढी गर्दी.

मी १३ ला होतो. त्या दिवशी पावसला कसलासा मोठा उत्सव असल्याने जाऊ नका असा सल्ला रत्नागिरीतच मिळाला. त्यामुळे मलाही बरे वाटले. मला जायचे नव्हतेच Wink

छावा तुला हे दृष्य म्हणायचे आहे का?>>>>>
हो हेच, छान आहे. धंन्यवाद!
पण अजुन थोडा राईट अँगलचा ज्यात गावाचा काही भाग ही दिसतो. तो आहे का?

केवळ ट्रीप म्हणून, रत्नागिरीला एका लग्नाला जायचे होते. सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे भक्तीभाव नव्ह्ता. पण सहल, लग्न , बदल इत्यादी सर्व कारणे.

च्यायला भंडारपुळ्यात पण झालं का रिझॉर्ट.. पुर्वी पायवाट होती ही सगळी.. निवतीपर्यंतपण पायीच जायला लागायचे.. मग गाडीवाट होती.. आणि मन:स्विनीने म्हटल्याप्रमाणे गावात फरसबंदी होती, रस्ता नव्हता.. ९२साली केशवसूत स्मारकाच्या उद्घाटनाला शरद पवार येणार म्हणुन फरसबंदी काढून रस्ता झाला.. मला जाम जुलाब झाले होते आणि आजीने सुंठ-जायफळ एकत्र करुन वाटीत दिले होते.. ते खात मी दिवसभर रस्त्याचे काम बघत बसलो होतो (आणि अधून मधून पार अर्धा किलोमीटर मागं असलेल्या संडासात जात होतो).. नंतर नंतर मात्र पुळे फारच कमर्शियल झाले आणि गर्दी कमालीची वाढली..

एमटीडीसी आहे तिथे आधी सुरुचे बन होते.. बापटांच्या घराला लागून.. मला थोडेथोडेच आठवते.. आणि पुळ्यातून मालवणला जाताना एक कमळाचे तळे होते.. आता मात्र कमळे नसतात बहुतेक तिथे..

रॉबीन जुन्या आठवणी जाग्या झाल्या बघा.. पुळ्याचे आणि माझे अजून एक जुळलेले नाते म्हणजे मी आडात पडलो होतो तीन वर्षाचा असताना.. आडात पडून (आणि वर अर्धा पाऊण तास आत राहुन) जिवंत बाहेर आलेल्या मोजक्या लोकांपैकी एक आहे मी Proud पुर्वी गेलो की गावातले लोक मिरजेच्या जावईबापूंचा आडात पडलेला मुलगा म्हणुन ओळखायचे Proud (आमच्या आईच्या मते बहुतेक तेव्हापासूनच माझ्या डोक्यावर परिणाम झाला.. त्यापुर्वी मी नॉर्मल होतो असे तिचे मत आहे Happy )

ह्म्म...खूपच सुधारणा झालीय इथे आता. मी ९३ मध्ये गेले होते आईच्या मावसभावाचे लग्न म्हणून. पावसला आईची मावशी व रत्नागिरीला आजी म्हणून कधी पुळ्याला राहिलो नाही. जावून परत रत्नागिरीला यायचो. तसेही प्रत्येक मे मध्ये जायचोच पुळ्याला व गु़ळ्याला(गणपती गुळे पण आहे पावसेच्या बाजूला कुठेतरी ,आता आठवत नाही). पुर्वी आजूबाजूलाच गणपती पुळ्याला कोणीतरी जेवणाची व्यवस्था करत असे. मस्त शाकाहारी जेवण असे गरमागरम. रस्ता बर्‍यापैकी होता म्हणून फियाटने गेलो होतो तेव्हा. तेव्हा ८ माणसे कोंबून. मागच्या सिटच्या मधल्या फटीत मी(तू काय बारीकच आहेस व लहानांनी खाली बसले तर काय होणार नाही), वरती भारीभक्काम (वजनाने) मावसभाऊ व बाजूला त्याची नवीन बायको(ह्यांचे प्रेमाचे बारीक आवाजातले डायलॉग एकत मी फटीत),तिची आई,माझी बहिण व पुढे आई,पप्पा,ड्रायवर. हा प्रवास विसरणार नाही कारण पाठीचे हाड लहान वयातच मोडले असे आठवडाभर वाटत होते. Proud

हुडा, अत्यंत देखणे फोटो आहेत. पुळं कधी बघितलं नाही, पण फोटो बघून जायची खूप इच्छा आहे.

'भाव नव्हता' हे कशाला सांगायचं पुन्हा पुन्हा? टण्या बघ बरं, त्याच्या मनी पण बहुदा भक्तीभाव नसावा पण तो कशा वेगळ्या कहाण्या सांगतोय की नै? Proud

रॉबीन,
फोटो झकास.

मागच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातले सागरी किल्ले केले तेंव्हा जायचा योग आला. मला पण नाही आवडले. तिर्थक्षेत्री अपेक्षित असते तसे वातावरण नाही. किंवा मी फारच अपेक्षा घेउन गेले असेल.

प्राचिन कोकणाला भेट दिली, तिथे गरम गरम उकडिचे मोदक मिळतात. आम्ही बरेच जण होतो म्हणुन २१ मोदकांची ऑर्डर दिली. त्यांनी आम्हाला ७ मोदक दिले आणि बाहेर येउन सांगितले 'आता बास'. Happy

पुढे एका दामले काकुंनी पोटभर खाउ घातले.

Pages