ग्लास पेंटिंग्ज
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
57
मागे डॅफोला विचारुन ती करते त्या प्रकारचे ग्लास पेंटींग्ज करायला घेतले होते. पण ते अर्धवटच पडून राहिलय.
आईकडे आलेच आहे तर पूर्वी मी ऑइल कलर्स वापरुन केलेल्या ग्लास पेंटींग्जचे काही फोटो काढलेत.
अर्थात ही सगळी चित्र कोणत्याना कोणत्या चित्राची कॉपी आहेत. यात ओरिजनल असं काही नाहीये..
हे अजून एक भुभुचे चित्र.. सध्या माझ्या लेकाचं अत्यंत आवडीचं.
अन हे माझं आवडतं...
अन हे मी केलेले अॅल्युमिनियम शीटवरचे एम्बोसिंग
हा फोटो काही मला नीट काढता आला नाही. एकतर जवळपास सहा फुट फ्रेम आहे ही. अन ती पण भिंतीवर लटकवलेली. उद्या जरा अजुन प्रयत्न करते फोटो काढयचा.
विषय:
प्रकार:
शेअर करा
खूप आवडली तिन्ही पेंटींग्ज.
खूप आवडली तिन्ही पेंटींग्ज.
एंबॉस केलेलं चित्र पन छान आहे. वेळ मिळाला तर इथे शिकवा.
मस्त झालेत पेंटींग्स अल्पना,
मस्त झालेत पेंटींग्स अल्पना, मला आईलेक आवडले जास्त
भूभू मस्त रियल वाटताहेत.
भूभू मस्त रियल वाटताहेत. जास्त करुन त्यांच्या मानेवरचे केस...
मस्तच गं अल्पना! मला तीन
मस्तच गं अल्पना! मला तीन नंबरचं आवडलं.
अल्पना, छानच ग.
अल्पना, छानच ग.
अल्पना मस्त की ग. ती मोठी
अल्पना मस्त की ग. ती मोठी फ्रेम जमीनीवर आड्वी ठेऊन मग एक मजला चढून वरून काढ्ला तर पूर्ण येइल. मी परवा शाळेत तसेच केले सग्ळे डान्स फॉर्मेशन फ्रेम मध्ये यावे म्हणून वरच्या मजल्यावर जावून शूट केले.
किती छान!
किती छान!
पहिल्या चित्रातिल भुभु च्या
पहिल्या चित्रातिल भुभु च्या चित्रात डोळ्यातिल भाव मस्तच...सगळेच छान आहेत्,शेवटच्या चित्रातिल फ्रेम बघायची उत्सुक्तता आहे.
खासच !!!! भुभुड्यांचे डोळे
खासच !!!!
भुभुड्यांचे डोळे एकदम मस्त
सुंदर झाली आहेत पेंटींग्ज.
सुंदर झाली आहेत पेंटींग्ज. तिसर पेंटिंग तर अप्रतिम झालय. कीप ईट अप.
अप्रतिम पेंटिंग्ज अल्पना काल
अप्रतिम पेंटिंग्ज अल्पना
काल तू सांगितलस अन मला राहवलंच नाही बेष्टच एकदम
छानच आहेत
छानच आहेत
सगळ्यांना खूप धन्यवाद. त्या
सगळ्यांना खूप धन्यवाद. त्या एम्बोसिंगचे परत फोटो घेणे काही मला जमले नाही. परत औरंगाबादला गेल्यावर काढेन आता.
मृण्मयी, एम्बोसिंग करणे खूपच सोपे असते. खरतर एम्बोसिंगला कला म्हणण्यापेक्षा टेक्निक म्हणायला हवं. माझ्याकडे घरात पत्र्याचा तुकडा पडलाय एक. अन अर्धवट बनलेले दोन एम्बोसिंग, एक ग्लास पेंटींग असं सगळं पडून आहे. येत्या १०-१२ दिवसात कधीतरी ते पूर्ण करेन. त्यावेळी कसं केलं हे सुद्धा लिहिन.
फारच छान
फारच छान
अल्पना, मस्त झाली आहेत ग्लास
अल्पना, मस्त झाली आहेत ग्लास पेंटिंग्ज. मी कधीच केले नाही. एम्बोसिंग मात्र केले आहे. काचेवर चित्र कसे
ट्रेस केले ते सांगतेस का?
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
मस्तच..
मस्तच..
सुंदर!
सुंदर!
भु भु जबरीच!!
भु भु जबरीच!!
वॉव मस्तच
वॉव मस्तच
विद्याक, अगं काचेवर चित्र
विद्याक, अगं काचेवर चित्र ट्रेस करण्याऐवजी कागदावर चित्र काढून त्यावर काच ठेवायची. (बर्याचदा रेडीमेड पोस्टरवर सरळ काच ठेवून त्याबरहूकूम रंगवता येतं. आई आणि मुलीचं चित्र काढताना मी सरळ पोस्टरवर काच ठेवली होती. दुसरी दोन्ही चित्रं काढताना मात्र कागदावर स्केच काढून त्यावर काच ठेवली.) काचेतून दिसणार्या चित्रातले बारिक डिटेल्स - डोळे, भुवया, ओठ इ आधी रंगवायचे आणि मग बाकीचं चित्र. मुळात या पद्धतीमध्ये आपण काचेच्या उलट्या (मागच्या) बाजूला रंगवत असतो त्यामूळे नेहेमी ज्या गोष्टी आपण शेवटी रंगवतो त्या आधी आणि आधी रंगवतो त्या शेवटी असा उलटा प्रकार करायचा असतो. तू करून बघ. एखाद्या पोस्टरवरून कर आधी. सोप्पं आहे अगं.
एक से बढकर एक! सगळ्याच
एक से बढकर एक!
सगळ्याच पेंटिंग्स अप्रतिम आहेत.
धन्यवाद अल्पना! मी नक्की
धन्यवाद अल्पना! मी नक्की करुन बघेन. भुभुचे डोळे, केस खुपच मस्त जमले.
फारच सुरेख केली आहेत!
फारच सुरेख केली आहेत!
अप्रतिम पेंटिंग्ज
अप्रतिम पेंटिंग्ज अल्पना!!!सगळीच मस्स्त आहेत.मी शिकायला येणार आहे हं तुझ्या कडे!!
खुपच सुंदर आलीत अल्पना!!!
खुपच सुंदर आलीत अल्पना!!! पाहिला नव्हता हा धागा.
भू भू अगदी मस्त ! तिन्ही
भू भू अगदी मस्त !
तिन्ही पेंटिग्ज अ प्र ति म ! मी सुद्धा एवढे दिवस हा धागा बघितलाच नव्हता .
Pages