ग्लास पेंटिंग्ज

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मागे डॅफोला विचारुन ती करते त्या प्रकारचे ग्लास पेंटींग्ज करायला घेतले होते. पण ते अर्धवटच पडून राहिलय.

आईकडे आलेच आहे तर पूर्वी मी ऑइल कलर्स वापरुन केलेल्या ग्लास पेंटींग्जचे काही फोटो काढलेत.
अर्थात ही सगळी चित्र कोणत्याना कोणत्या चित्राची कॉपी आहेत. यात ओरिजनल असं काही नाहीये..

IMG_1583.JPG

हे अजून एक भुभुचे चित्र.. सध्या माझ्या लेकाचं अत्यंत आवडीचं. Happy

IMG_1602.JPG

अन हे माझं आवडतं...

IMG_1608.JPG

अन हे मी केलेले अ‍ॅल्युमिनियम शीटवरचे एम्बोसिंग

IMG_1610.JPG

हा फोटो काही मला नीट काढता आला नाही. एकतर जवळपास सहा फुट फ्रेम आहे ही. अन ती पण भिंतीवर लटकवलेली. उद्या जरा अजुन प्रयत्न करते फोटो काढयचा.

अल्पना मस्त की ग. ती मोठी फ्रेम जमीनीवर आड्वी ठेऊन मग एक मजला चढून वरून काढ्ला तर पूर्ण येइल. मी परवा शाळेत तसेच केले सग्ळे डान्स फॉर्मेशन फ्रेम मध्ये यावे म्हणून वरच्या मजल्यावर जावून शूट केले.

पहिल्या चित्रातिल भुभु च्या चित्रात डोळ्यातिल भाव मस्तच...सगळेच छान आहेत्,शेवटच्या चित्रातिल फ्रेम बघायची उत्सुक्तता आहे.

सगळ्यांना खूप धन्यवाद. त्या एम्बोसिंगचे परत फोटो घेणे काही मला जमले नाही. परत औरंगाबादला गेल्यावर काढेन आता. Happy
मृण्मयी, एम्बोसिंग करणे खूपच सोपे असते. खरतर एम्बोसिंगला कला म्हणण्यापेक्षा टेक्निक म्हणायला हवं. माझ्याकडे घरात पत्र्याचा तुकडा पडलाय एक. अन अर्धवट बनलेले दोन एम्बोसिंग, एक ग्लास पेंटींग असं सगळं पडून आहे. येत्या १०-१२ दिवसात कधीतरी ते पूर्ण करेन. त्यावेळी कसं केलं हे सुद्धा लिहिन. Happy

अल्पना, मस्त झाली आहेत ग्लास पेंटिंग्ज. मी कधीच केले नाही. एम्बोसिंग मात्र केले आहे. काचेवर चित्र कसे
ट्रेस केले ते सांगतेस का?

विद्याक, अगं काचेवर चित्र ट्रेस करण्याऐवजी कागदावर चित्र काढून त्यावर काच ठेवायची. (बर्‍याचदा रेडीमेड पोस्टरवर सरळ काच ठेवून त्याबरहूकूम रंगवता येतं. आई आणि मुलीचं चित्र काढताना मी सरळ पोस्टरवर काच ठेवली होती. दुसरी दोन्ही चित्रं काढताना मात्र कागदावर स्केच काढून त्यावर काच ठेवली.) काचेतून दिसणार्‍या चित्रातले बारिक डिटेल्स - डोळे, भुवया, ओठ इ आधी रंगवायचे आणि मग बाकीचं चित्र. मुळात या पद्धतीमध्ये आपण काचेच्या उलट्या (मागच्या) बाजूला रंगवत असतो त्यामूळे नेहेमी ज्या गोष्टी आपण शेवटी रंगवतो त्या आधी आणि आधी रंगवतो त्या शेवटी असा उलटा प्रकार करायचा असतो. तू करून बघ. एखाद्या पोस्टरवरून कर आधी. सोप्पं आहे अगं. Happy

अप्रतिम पेंटिंग्ज अल्पना!!!सगळीच मस्स्त आहेत.मी शिकायला येणार आहे हं तुझ्या कडे!!

भू भू अगदी मस्त !
तिन्ही पेंटिग्ज अ प्र ति म ! मी सुद्धा एवढे दिवस हा धागा बघितलाच नव्हता .

Pages