शुभ्र

Submitted by प्रीति on 9 December, 2009 - 11:46

काय मस्त वाटतं होतं आज बाहेर, शुभ्र, शुभ्र!!. सिझनचा पहिला (मोठा) स्नो. मागच्या आठवड्यात पण झाला, पण थोडाच. घराच्या मागचा क्रिसमस ट्रि फार्म तर अफलातुन दिसत होता. सकाळच्या स्नोचे काही फोटोज.
DSC_0101.jpgDSC_0107.jpgDSC_0111.jpgDSC_0118.jpgDSC_0121.jpgDSC_0123.jpgDSC_0134.jpgDSC_0135.jpgDSC_0136.jpg

गुलमोहर: 

खरंच सुंदर.पहिले दोन लाईटमधले ही मस्त वाटतायत. नी त्या दोन बुटक्या झाडांवरचे (५वा) ठिपक्या ठिपक्याचा स्नो पडलेलेही.

हो, ५वा सुंदर आलाय. फार सुंदर दृश्य दिसते बर्फाचा वर्षाव झाला की. मला पण पुर्वीचे दिवस आठवले जेव्हा अशा थंड ठिकाणी रहात होते.

हो तो स्नो पडतांनाचा फोटो बघून एकदम क्रिसमस कॅरोल वाजायला लागले माझ्या डोक्यात. आय वान्ना विश यु अ मेरी क्रिसमस....., लेट इट स्नो, लेट इट स्नो ...., सॅन्ताक्लॉज इस कमिंग टू द टाऊन......

पाचवा आवडला. बाकीच्या फोटोत पिवळ्या अथवा निळ्या रंगाच्या छटात बर्फाची शुभ्रता झाकोळून गेलीये. त्या tints काढता आल्या किंवा कमी करता आल्या तर शीर्षकाला अधीक साजेसे होतील फोटो.

मस्त फोटो.. असली दृश्ये आम्हाला फक्त फोटोतच दिसायची Happy आवर्जुन इथे टाकल्याबद्दल धन्यवाद..

एकदम मस्त ग प्रीती.... शीट्टीत फिरुन आले फोटो बघुन.. Happy
मुली मला तर इथे रोज विचारुन हैराण करतात्..आता स्नो पडणार का म्हणुन .. आणि इथे आत्ता कुठे जरा सकाळी गारवा असतो Uhoh

खुप धन्यवाद सगळ्यांना Happy
माधव ते फोटो सकाळी पावणे सहाला काढले तेव्हा स्ट्रिट लाईट चालु होते, म्हणुन तसे आलेत.
किट्टु अगदी गं, मागच्या नोहेंबरमधे मी भारतात होते, तेव्हा माझ्या मुलाने पण असेच केले. मुलं मस्त एंजॉय करतात ना.

Pages