मी केलेला इब्लिसपणा!!

Submitted by नंदिनी on 23 November, 2009 - 06:04

कधी जाणतेपणाने तर कधी अजाणतेपणाने... आपण सर्वजण इब्लिसपणा करतोच!!

तो इथे लिहालच!!
इब्लिस्पणामधे पी एच डी संपादन केलेले काही मायबोलीकर आहेत, ते आपल्या सर्वाना मार्गदर्शन करतील..

जुन्या मायबोलीवरचा इब्लिसपणा इथे आहे..
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/93663.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईच्या, नको असलेल्या मैत्रिणीच्या चहात भावने आणि मी महासुदर्शन चुर्ण टाकल होतं एकदा. एकदा असच त्याच बाईंच्या बबतीत त्या काही बोलायला उभ राहिल्यावर भावने इनोसंटली Wink त्यांची खुर्ची काढुन घेऊन तो स्वतः बसला, त्या उभ्याच्या बसत्या झाल्या त्या एकदम जमिनिवरच धडाम होऊन

कॉलेज मधे झुरळांच डिसेक्शन असेल त्यावेळी कुणाच्या अ‍ॅप्रन वर झुरळ सोडुन दे, झुरळाच्या पायाला दोरी बांधुन फर्स्ट फ्लोअर च्या गॅलरीतुन खाली लोंबकळवल की मुलिंची किंचाळी याय्लाच हवी Proud एकदा एका नुकतच अफेअर झालेल्या कपल मधल्या मुलाच्या खाद्यावर हळुन झुरळ सोडुन दिलेलं मग तिची किंचाळी नी त्याचा भांगडा बघायला जाम मजा आलेली Proud

एकदा नंदुरबारला आजोळी गेलो असता गावातच रहाणार्या मावस आजीला आमच्या आजीच्या घरी येताना बघितले. ही मावसआजी खुप जाड होती आणि आली की बंगईवर हमखास बसायची. तिला येताना बघुन आम्ही भावंडांनी बंगईचे चारही स्क्रु ढीले करुन ठेवले. ती सवयीने बसली आणि बंगईसकट खाली! आम्ही सगळेजण विविध दारं खिडक्यातुन बघत होतो. नंतर ती आजी कधीच बंगईवर बसली नाही.(या ईब्लिसपणाचे प्रायश्चित्त म्हणुन की काय नंतर आम्हा भावंडांना बंगई आवडत असुनही त्या प्रकारची प्रशस्त बंगई घरात काही ना काही कारणाने लावता आली नाही:) )

वत्सला Proud

काकांकडे एक नवार खाट होती, तिच्या विणलेल्या पट्ट्या सैल झाल्या की ती कोणी बसले की मधोमध खचायची..... आम्ही मुले त्यावर व्यवस्थित सतरंजी घालायचो आणि रोज कोणीतरी 'बकरा' गाठून त्याला त्यावर बसायला लावायचो.... तो माणूस बसला की त्याचे बूड थेट जमीनीलाच टेके, आणि आमची हसून हसून पुरेवाट!!

श्री Lol

<< नको असलेल्या आईच्या मैत्रिणीच्या चहात भावने आणि मी महासुदर्शन चुर्ण टाकल होतं >>

कविता...... शब्दक्रम बदल गं बाई........ Lol

आणि महासुदर्शन चूर्ण........ अहाहा..... दुसर्‍या दिवशी त्या बाईंच्या पोटाची हालहवाल विचारली की नाही? Proud

मी पानिपतला असताना तिथला एक डॉक्टर कलिग मला रोज चिडवत होता..'आप दो बच्चोवाली मां से शादी करना...; ( माझी तिशी ओलांडली होती, तरी लग्न झाले नव्हते, तिकडे लोक लग्न फार लवकर करतात.. म्हणून हा चिडवण्याचा विषय झाला होता.)

बरेच दिवस हा प्रकार सुरु होता.

एकदा सगळ्या स्टाफसमोर त्याने पुन्हा ते वाक्य म्हटले... सगळे हसले , मीही हसलो आणि त्याला एकच प्रश्न विचारला,'तुम्हे कितने बच्चे है?'

तोही बिनडोक, बथ्थड.. Proud . सरळ सांगून मोकळा झाला.. मुझे एक बच्चा है..

'तो जब तुम्हे दूसरा बच्चा हो जायेगा तो मुझे फोन करना, तेरी सारी तमन्ना पूरी कर दूंगा..' मी म्हणालो आणि मग ती चेष्टा कायमची बंद पडली... Proud

आमच्या इथे एका बंगल्यात एक खडुस, भांड्कुदळ आजी रहायच्या. मुल पण त्यांना त्रास द्यायची त्यांच्या बंगल्याच्या आवारातले पेरु काढुन. मग त्या अस्सल कोकणी शिव्या देत उद्धार करायच्या. माझ्यावर विशेष "प्रेम" होत त्यांच Proud एकदा आमच्या कंपुतल्या कुणीतरी माझ्याशी बेट लावली, दुपारच्या वेळी जावुन त्यांच्या दाराला बाहेरुन कडी लावुन यायची. मी गेले तेव्हा त्या घरात असाव्यात अंदाज घेऊन कडी लाऊन मी परत मैत्रिणीच्या घरी गेले. थोडावेळाने जो शंखनाद सुरु झाला तो सगळा आम्ही वरुन बघत होतो Proud कोणी तरी साळसुद पणे दार उघडून दिलं पण त्याला सर्वात जास्त शिव्या ऐकाव्या लागल्या Proud

लहानपणी शेजारी कुणी सायकलवर आलं की आम्ही सायकलमधली हवा काढायचो आणि नंतर साळसुदपणे त्यांची गंमत बघायचो.( म्हणजे त्यांना म्हणायचो आम्ही ईथेच तर खेळत होतो कुणी काढली हवा समजलेच नाही वगैरे).

हा एक मित्राचा इब्लिसपणा. रात्रीची वेळ. रस्त्यावर पडदा लावून पिक्चर दाखवत होते.खूप आवाज होत होता म्हणून ह्याने रात्र झालिये आवरा वगैरे समजवायचा प्रयत्न केला पण उपयोग शून्य. पोलिस कंप्लेंट करावी म्हणून पहिल्या मजल्यावरुन खाली उतरला पण विचार बदलला.

परत वर जाताना त्याला गल्लीतला कुत्रा दिसला. यू यू करुन हा त्याला मेझॅनिन फ्लोअरपर्यंत घेउन गेला. आणि गॅलरीतून खाली प्रेक्षकांत भिरकावून दिला.

पडदा फाडून लोकं पळाली.

हा एका डॉक्टरचा इब्लिसपणा. माझी मैत्रिण त्यांच्याइथे एन्टरन्सशिप करत होती.
त्यांना सवय होती पेशंटशी गप्पा मारायची आणि प्रत्येक पेशंटशी अनुभुती करायची. म्हणजे बघुया आपल्याला काय होतंय.... आता तपासूया, तोंड उघडुया...
एकदा एक बाई आली होती तपासून घ्यायला... तिला म्हणाले 'चला तिकडे झोपुया...' Lol

हा किस्सा मी जुन्या हिगु वर पण लिहिला होता... Rofl

Lol

दक्षे,अमित Biggrin
लहान असतांना रात्री झोपताना २,३ वाजताचा अलार्म लावून हळूच ते घड्याळ जास्त घोरणार्‍या काकाच्या डोक्याजवळ ठेवायचो.. तो ऐन बहरात असतांना कर्कश्श्य अलार्म वाजला कि बिचारा गोंधळून ,धडपडत उठत असे..

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सर्व भावंडे एकत्र जमलो की उकाडा व लहान जागा यांमुळे काही बच्चे कंपनीचा रात्रीचा मुक्काम बाल्कनीत असायचा. माझ्या एका भावाला झोपेत चालायची सवय होती. त्यामुळे अनेकदा त्याच्या नकळत आम्ही त्याच्या पायाला दोरीचे एक टोक बांधून दुसरे टोक बाल्कनीच्या जाळीच्या कठड्याला बांधत असू.
एकदा रात्री असेच आडवे पडून भुताखेतांच्या गप्पा चालल्या असताना बाल्कनीत एक मोठ्ठी पाल आली. आम्ही बाकी सर्व बच्चे मंडळी ''ईईईईईईई.....पाssssssssssssल'' करत घरात पळालो आणि भाऊ एकटा एक पाय कठड्याला बांधलेल्या, लोंबकळलेल्या अवस्थेत ''अरे, मला कोणीतरी सोडवा ना.......!!!!'' करत ओरडत बसला!!
Lol

तिच्या विणलेल्या पट्ट्या सैल झाल्या की ती कोणी बसले की मधोमध खचायची Rofl
जामोप्या, कविता Rofl
पडदा फाडून लोकं पळाली. Rofl
तिला म्हणाले 'चला तिकडे झोपुया...' Rofl

Pages