मराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिका

Submitted by mangeshminal on 13 November, 2009 - 17:11

'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपटात प्रियांका चोप्राने केलेल्या १२ भूमिका व 'शंभु माझा नवसाचा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात राजेश शृंगारपुरेने केलेल्या १२ भूमिका याविषयी बातम्या वाचनात आल्या. त्या अनुषंगाने मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी चित्रपट विभागात नवीन धागा सुरू केला.
त्याच्या प्रतिसादात काही जणांनी मराठी नाटकातीलही दुहेरी / विविध भूमिका कळवल्या आहेत.

मराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.

आपल्याला माहित असलेल्या दुहेरी / विविध भूमिका कळवत रहा.

प्रत्येक नोंदीसाठी खालील माहिती जमा करता येईल.
प्रथम प्रयोगाचे साल, नाटकाचे नाव, कलाकाराचे नाव, व्यक्तिरेखांची संख्या, व्यक्तिरेखांची नावे

मराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिकांची यादी -
- रथचक्र रोहिणी हट्टंगडी २

- जेव्हा यमाला डुलकी लागते सुधा करमरकर २

- थरार सतीश पुळेकर २

१९९१ हसवाफसवी दिलीप प्रभावळकर ६ चिमणराव जोग / प्रिन्स वांटुंग पिन पिन / नाना पुंजे /
दिप्ती प्रभावळकर - पटेल - लुमुम्बा / बॉबी मॉड / कृष्णराव हेरंबकर

- गंमत जंमत अरुण नलावडे विविध
- गंमत जंमत रसिका ओक विविध
- गंमत जंमत सोनाली चेऊलकर विविध

- हलकं फुलकं रसिका ओक विविध
- हलकं फुलकं विजय कदम विविध

१९९६ चूक भूल द्यावी घ्यावी निर्मिती सावंत ३ राजाभाऊंच्या सासूबाई / राजाभाऊंची मैत्रीण / दाक्षिणात्य शेजारीण

- सही रे सही भरत जाधव ४

- बे दुणे पाच प्रशांत दामले

- रणांगण <स्त्री कलाकार> २ किंवा ३

- मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी <पुरूष कलाकार> २ हिटलर / हिटलरचा तोतया

- प्यार किया तो डरना क्या <पुरूष कलाकार> ३ बिरबल / जॉर्ज बुश / मूर्तीकार

२००९ बहुरूपी प्रशांत दामले २ 'बहुरूपी' सदा इंगवले / प्रशांत दामले

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाटकः
१. श्रीमंत दामोदर पंत - यात संध्याकाळी ६:०० नंतर त्याच्या अंगात त्याचे म्रुत आजोबा येत असतात.

२. सही रे सही - यात त्याने ३ भुमिका केल्या आहेत आणि या नाटकामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, एका sceneमध्ये हे तिघही एकाच वेळी स्टेजवर आले आहेत LIVE.

बे दुणे पाच मधे प्रशांत दामले, रथचक्र कधे रोहिणी हत्तंगडी, जेव्हा यमाला डुलकी लागते मधे सुधा करमरकर दोन भुमिका करत असत ( हि एकाच व्यक्तिने घेतलेली रुपे नव्हती )
खुपदा छोटे कलाकार नाटकात दोन तीन भुमिका करतच असतात.

अरुण नलावडे आणि रसिका ओक यांचे एक धमाल नाटक टीव्हि वर पाहिले होते... त्यात त्या दोघांनी ५ पेक्षा जास्त भुमिका केल्या होत्या. आणखी एक नाटक पाहिले होते त्यात विजय कदम आणि रसिका ओक यांनी अशात खुप भुमिका केल्या होत्या. दोन्ही नाटकांची नावे आठवत नाहित.

मुग्धा, दिनेश आणि ami79, कळवलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
नाटकातील दुहेरी / विविध भूमिकांबद्दल कळवल्यामुळे ही माहितीही संकलित करण्यासाठी हा धागा सुरू केला आहे.
मराठी मालिकातील दुहेरी / विविध भूमिकांच्या संकलनासाठी उपग्रह वाहिनी विभागात नवीन धागा सुरू केला आहे. मराठी मालिकातील विविध भूमिकांबद्दलही कळवत रहा.

मुग्धा, सही रे सही नाटकात भरत जाधवने ४ भूमिका केल्या आहेत. स्वतःशी मोठ्या आवाजात बोलणारी 'गलगले' ही भूमिका याच नाटकात आहे. हीच व्यक्तिरेखा भरत जाधवने 'गलगले निघाले' या केदार शिंदेच्या चित्रपटातही साकारली आहे.

ami79, अरुण नलावडे व रसिका ओक यांचे नाटक म्हणजे 'गंमत जंमत'. यात बहुतेक सोनिया मुळेनेही काम केले होते.
विजय कदम व रसिका ओक यांचे नाटक पूर्वी प्रभात वाहिनीवर पाहिल्याचे आठवत आहे. नाव नेमके आठवत नाही. त्या नाटकाचे नेपथ्य बहुतेक रिकाम्या चौकटी वापरून केले होते.

मंगेश मिनल,
तुमच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
मला सही रे सही मधल्या भरत जाधवच्या ४ भुमिका कोणत्या सांगाल का?
मला आठवत असलेल्या याप्रमाणे:
१. मुख्य भुमिका - श्रीमंत म्हातारा
२. गलगले
३. श्रीमंत म्हातार्याचा वेडसर मुलगा.
४. ?

या शिवाय नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी अजरामर केलेल नाटक "तो मी नव्हेच". यात त्यांच्या एकुण ७ भुमिका केल्या आहेत. याच नाटकात प्रथम फिरता रंगमंच वापरण्यात आला होता.

'प्यार किया तो डरना क्या' या नाटकात बिरबलाचे काम करणार्‍या पात्राने जॉर्ज बुश आणि मुर्तीकार या दोन भुमिका सुद्धा केल्या आहेत.

मुग्धा, भरत जाधवची चौथी भूमिका (नाटकातील दुसरी भूमिका) कुरियर घेण्यासाठी आलेल्या माणसाची होती.
मदन सुखात्मेचा (श्रीमंत म्हातारा) मृत्यू झाल्यानंतर त्याचे प्रेत मदनची दुसरी पत्नी व सेक्रेटरी एका पेटार्‍यात लपवतात. त्यानंतर या कुरियरवाल्याचा नाटकात प्रवेश होतो.
मदन सुखात्मेची दुसरी पत्नी, पहिली पत्नी व लांबच्या नात्यातील काका हे तिघेजण मदन सुखात्मेची संपत्ती मिळवण्यासाठी मदनसारख्याच दिसणार्‍या ३ जणांचा वापर करतात.
कुरियरवाल्याचा वापर दुसरी पत्नी व सेक्रेटरी करतात. गलगलेचा वापर पहिली पत्नी व मुलगी करतात. वेडसर मुलाचा वापर लांबच्या नात्यातील काका 'अण्णा' करतात. (हा मुलगा श्रीमंत म्हातार्‍याचा - मदन सुखात्मेचा - नसतो. तो अण्णांच्या गावातील असतो असा नाटकात उल्लेख आहे.)

'सही रे सही' या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व बहुतेक यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली होती.

या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजरातीत भाषांतर झाले. गुजराती नाटकात शर्मन जोशी याने काम केले होते. या गुजराती नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे ३५० प्रयोग होणे हे गुजराती रंगभूमीवर गेल्या १० वर्षात प्रथम घडले होते.

या नाटकाचे 'हम ले गये, तुम रह गये' या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफ्री याने काम केले होते.

'सही रे सही' वर आधारित हिंदी चित्रपटाचे काम सुरू आहे व या हिंदी चित्रपटात जावेद जाफ्री काम करत आहे असे वाचले होते.

मुग्धा, 'तो मी नव्हेच' या नाटकाच्या कथेनुसार 'लखोबा लोखंडे' हे नाव धारण केलेली व्यक्ती विविध वेषांतरे करून तरूण मुलींना फसवते, त्यांच्याशी लग्न करते व त्यांचे पैसे, दागदागिने घेऊन पसार होते.
एकाच व्यक्तिरेखेने केलेले वेषांतर या नाटकात असल्याने सध्या या नाटकातील भूमिकांचा विचार विविध भूमिकांसंदर्भात केलेला नाही व यादीत सुधारणा करणे टाळले आहे.
(काही प्रकारच्या भूमिकांचा विचार दुहेरी / विविध भूमिकांच्या नोंदीत केलेला नाही. ते प्रकार 'मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका' या चित्रपट विभागातील धाग्यात नमूद केले आहेत. ते वाचून आपले मत जरूर कळवा.)

'तो मी नव्हेच' या नाटकाचा पहिला प्रयोग १९६२ साली झाला.
प्रभाकर पणशीकर यांनी या नाटकात ५ व्यक्तिरेखा साकारल्या आहेत -
लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार (दिवाकर दातार यांचा मोठा भाऊ), कॅप्टन अशोक परांजपे (परांजपेंकडे दत्तक गेलेला दिवाकर दातार यांचा धाकटा भाऊ), राधेश्याम महाराज.

विविध भूमिकांसाठी कमी वेळात वेषांतर करून प्रत्येक व्यक्तिरेखा त्या त्या लकबींनुसार नाटकात सादर करणार्‍या प्रभाकर पणशीकरांना दाद द्यावी तेवढी थोडीच. मी हे नाटक पाहिले तेव्हा प्रभाकर पणशीकर हे वेषांतर ५-७ मिनिटात करत आणि तेव्हा त्यांचे वय ६० पेक्षा जास्त होते.
नाटकात फिरता रंगमंच वापरण्याची व त्यासाठी तो तयार करून घेण्याची त्यांची कल्पकता वाखाणण्यासारखी.

आता प्रभाकर पणशीकरांनी ही भूमिका करणे थांबवले आहे. यापुढे ही भूमिका डॉ. गिरिश ओक सादर करणार आहेत.

प्रभाकर पणशीकर यांनी या नाटकाचे 'अवनु ननल्ला' (Avanu Nanalla) या नावाने कन्नडमध्ये भाषांतर करून घेतले होते. कन्नड नाटकातही तेच भूमिका करत होते.

या नाटकावर आधारीत 'नान अवनिल्लाई' (Naan Avanillai) (१९७४) हा तमिळ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात जेमिनी गणेशन यांनी भूमिका केली होती. तमिळ भाषेत हाच चित्रपट २००७ साली याच नावाने पुन्हा एकदा तयार केला गेला. यात जीवन याने भूमिका केली होती.
'बुद्धिवंत' (Budhdhivantha) (२००८) हा कन्नड चित्रपट २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'नान अवनिल्लाई' या तमिळ चित्रपटाची कन्नड आवृत्ती होती. यात उपेंद्रने भूमिका केली होती.

या नाटकावर आधारीत 'वो मैं नहीं' (१९७४) हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात नवीन निश्चल यांनी भूमिका केली होती.

अमिता, आपण कळवलेल्या माहितीप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.
या व्यक्तिरेखा साकारणार्‍या कलाकाराचे नाव माहित आहे का ?

मंगेश मिनल खूप खूप आभार.
तुमचा अभ्यास खरच खूप सुंदर आहे.
I m impressed.

दिलिप प्रभावळकरांचे 'हसवा फसवी' कसे काय विसरलो?

त्यातही त्यांनी विविध भुमिका केल्या होत्या. मी पाहिले नसल्याने जास्त लिहू शकत नाही.

मुग्धा, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण दिलेली दाद वाचून आनंद झाला.

अमिता, माहितीबद्दल धन्यवाद. यादीत सुधारणा केली आहे.
'हसवाफसवी' खूप सुंदर नाटक आहे. यातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिलीप प्रभावळकरांनी पूर्वी नाट्यदर्पण रजनीच्या कार्यक्रमांत वेगवेगळ्या वर्षी सादर केल्या होत्या. या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची गुंफण नाटकात खूप छान केली आहे.

'थरार' या नाटकात सतीश पुळेकर यांनी दुहेरी भूमिका केली होती. 'दोन सतीश पुळेकर एकाच वेळेला रंगमंचावर' अशा आशयाची जाहिरात गाजली होती.
यादीत सुधारणा केली आहे.

विजय कदम आणि रसिका ओकच्या नाटकाचे नाव, हलकं फुलकं. (मी बघितलेय ते नाटक, रसिकाची जोगेश्वरी काकू, विसरता येणे शक्यच नाही ) थरार मधे सतीश बरोबर बहुदा स्वाती चिटणीस असायची.
रणांगण मधेही, एक स्त्री कलाकार दोन तीन भुमिका करत असे.

दिलीप प्रभावळकर आणि सुहास जोशीच्या, चूक भूल द्यावी घ्यावी मधे, निर्मिती सावंत, सासुबाई, प्रेयसी आणि दाक्षिणात्य शेजारीण, अश्या तीन भुमिका करत असे.

दिनेशदा, कळवलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. यादीत सुधारणा केली आहे.

अमिता यांनी कळवलेल्या नाटकाचे नाव कळले. हे नाटक पूर्वी 'प्रभात' वाहिनीवर पाहिले होते.

'चूक भूल द्यावी घ्यावी' हे नाटक आधी दूरदर्शनपट स्वरूपात दाखवले होते. दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित हा दूरदर्शनपट होता.

'रणांगण' नाटकातील स्त्री कलाकाराचे नाव माहित झाल्यावर कळवा.

खुप छान माहीती दिलि आहे सर्वानिच ... बहुरुपी मधे हि प्रशांत ने दुहेरी भुमिका केलि आहे .. खरच प्रशांत चे कौतुक करावे अशिच ही भुमिका आहे ... खुप छान केले आहे पुर्न नाटक ...

ह्या मध्ये मु पो बोंबीलवाडी येइल का ते माहिती नाहि.
पण त्यात हिटलर आणि त्याचा डमी म्हणुन एक मुलगा अस काहिस आहे.

निल्या कुलकर्णी व झकासराव, कळवलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
माहितीप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.

झकासराव, हिटलर व त्याचा तोतया या भूमिका करणार्‍या कलाकाराचे नाव माहित आहे का ?

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
'गंमत जंमत' नाटकात अरुण नलावडे व रसिका ओक यांच्याबरोबर सोनाली चेऊलकरने विविध भूमिका केल्या आहेत.
यादीत सुधारणा केली आहे.