शाकाहारी खीमा

Submitted by तृप्ती आवटी on 21 October, 2009 - 12:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कांदा अर्धा कप बारिक चिरलेला, सुकं खोबरं १-२ टेस्पून, ओलं खोबरं १-२ टेस्पून, लवंग ६-८, दालचिनी २-३ काड्या, वेलची ६-७, खसखस १ टेस्पून, काळे मिरी दहाबारा, १ टी स्पून शहाजिरं, एक टी स्पून जिरं, एक टे स्पून धणे, असल्यास थोडं दगडफूल, एक तेजपत्ता.

मध्यम कांदे दोन, ३-४ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, २ मध्यम टोमॅटो, १ वाटी हिरवे वाटाणे किंवा १ वाटी हिरवे चणे, एक भोपळी मिरची बारीक चिरुन (१ वाटी), १ मध्यम बटाटा बारीक चौकोनी चिरुन. आवडत असल्यास १ वाटी पनीर कुस्करुन किंवा किसून.

क्रमवार पाककृती: 

सुकं खोबरं, ओलं खोबरं थोड्या तेलावर वेगवेगळं खरपूस भाजून घ्यायचं. मग थोड्या तेलावर लवंग, दालचिनी, वेलची, खसखस, काळी मिरी, शहाजिरं, जिरं, धणे, दगडफूल, तेजपत्ता भाजून घ्यायचं. सगळं बारीक वाटायचं.

तेलावर एक-दोन लवंगा टा़कून बारि़क चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण परतून घ्यायचं, कांदा मऊ झाला की बारीक चिरलेले टॉमेटो घालून परतुन घ्यायचे. मग पनीर शिवाय इतर भाज्या घालून एक वाफ काढायची. मग एक मसाल्याचा अथवा चहाचा चमचा वाटण, एक चमचा धण्याची पावडर आणि चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ घालुन भाज्या अर्ध्या अधिक शिजवुन घ्यायच्या. त्यात पनीर घालुन पुन्हा एक वाफ येऊ द्यायची. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर अन लिंबाचा रस पिळायचा अणि हाणायचा पोळीबरोबर नाहीतर पावाबरोबर.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. खिमा मसाल्याचं वाटण कशाबरोबरही छान लागतं हा शोनुचा सल्ला मानुन मी भाज्या घालुन करुन बघितला. मस्त लागतो म्हणून इथे डकवते आहे.
२. तेल थोडं सढळ हाताने घालावं.
३. पानात वाढायच्या अर्धा तास आधी तरी खीमा तयार असावा. तो मसाला इतका छान मुरतो सगळ्या भाज्यांमधे.
४. वरील प्रमाणात बराच मसाला तयार होतो. दोन तीन वेळेला तरी पुरतो.

माहितीचा स्रोत: 
शोनु
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तरी हिरवी घालते.

मिलिंदा, खीमा हा प्रकार मुघलई असावा. पण इथे तसा पर्याय नाहीये. त्यातल्या त्यात जवळचा पर्याय म्हणुन पारंपारिक मराठी सेलेक्ट केला.