नानकटाई

Submitted by मनःस्विनी on 13 October, 2009 - 14:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ही नानकटाई जुन्या माबोवरची पाककृती, एका माबोकरणीने विचारले म्हणून इथे देत आहे पुन्हा.

४ वाट्या कणीक किंवा मैदा २ वाटी आणि २ वाटी रवा
( जर तु मैदा आणि रवा घेतलास तर रवा चांगला भीजत ठेवुन कुटावा लागतो थोडा ज्यास्त त्रास आहे मैदा मिश्रित रवा असेल तर )

जरास आंबट दही ४ टेबलस्पून,
पिठीसाखर २१/२ वाट्या,

देशी घी पावणे तीन वाटी, use same वाटी for measurement of all ,

बेकिन्ग सोडा १ टेबलस्पून आणि बेकिन्ग पॉवडर १ टेबलस्पून अस घे,
जायफळ १/२ टीस्पून वेलची बदाम तुकडे वरती लावायला

क्रमवार पाककृती: 

मी ही माझी recipe देत आहे कमी कॅलरीजची आहे, पण तुला हवे असेल तर तु मैदा घालुन कर.
माझी आई मैदा आणि रवा समप्रमाणात घेवुन करायची त्याने ती छान खुस्खुशित आणि जराशी कुरकुरी चव येते आम्ही भट्टीत भाजुन आणायचो

पण तु oven मधे करु शकते
ही घे
कृती :तूप परातीत चांगला फेसुन घे हळु हळु साखर टाकत फेसत रहा मग जायफळ दही, वेलची टाक
सगळ्यात शेवटी हळु हळु मैदा आणि रवा किंवा कणीक टाकुन mix कर.

मैदा आणि रवा असेल तर खुप मळावे लागते अगदी हात दुखतात
बदामाचे काप वर लाव छोत्या चपट्या गोळ्या बनवुन.

३५० डेग्री वर १५ १८ मीनिटे भाज किंचीत लाल्सर छटा आल्यावर
मस्त खुस्खुशीत नान्कटई झाली तयार, कणीकेची पण तुला आवडेल.
जरूर कळव केल्यावर .

अधिक टिपा: 

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/136576.html?1200547756
हा बीबी वाचा अधिक माहीतीसाठी. Happy

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लेंडरने फिरवले तर चालेल पण ते तूप खूप गरम होते व पातळ होवून सेम इफेक्ट येणार नाही. हे कसे मस्त फेसाळलेले क्रीमी सफेद एकजीव असे मिश्रण पाहिजे. पातळ गरम झाल्याने तितके चांगले होणार नाही.

साखर मस्त फेटायची तूपात मग वास येत नाही तूपाचा मग दही हळू हळू टाकावे.
अर्थ बॅलेंन्सचे वेगन स्प्रेड मिळते ते वापरून बघ.

अरे वा आयडिया मस्त आहे असे चेहरे बनवण्याची. छाण दिसताहेत.

सांची, तुला कुठली आवडली मैद्याची की कणिकेची?

मैद्याच्या जरा जास्त तुपकट वाटल्या मला.. बेक करताना पेढ्याइतक्या पिठाचा गोळा इडली एवढ्या फुगल्या. पाहुणे मंडळींना खूप आवडल्या. घरी बनवल्या आहेत ह्यावर विश्वास बसेना. Happy

पण मला मात्र कणकेच्याच मस्त वाटल्या. डायेट नानकटाई.. त्याला तुपही कमी वापरले होते. Happy

अरे वा आयडिया मस्त आहे असे चेहरे बनवण्याची>>> माझ्या पिल्लूची खाण्याची कुरबुर असते ना.. मग असे काहितरी.. स्माईली फेस कुक्कीज बनवले की झाले. Happy