१ वाटी चणाडाळ,
१/४ वाटी दूध,
१/२ वाटी तूप(पावूण डाळरवा भाजायला, उरलेले गूळासाठी)
१/४ वाटी किसलेला गूळ्(मला कमी गोड लागते, तेव्हा तुम्ही ज्यास्त टाकू शकता),
केसर, वेलची,काजो,बेदाणे,

----------------------------------------------------------------
१) चणाडाळ मस्त मंदाग्नीवर भाजून झाली की रवाळ वाटून घ्यायची.
२) हा रवा मस्त्त तूपात परतून घ्यायचा, मग त्यात कडकडीत दूध घालायचे. हे केल्याने बेसन फुलते, जाळी पडते. तूपात डबडबलेले एका बाजूने चपटलेले लाडू न होता मस्त रवेदार बेसन लाडू(ते ही रवा न टाकता) होतात.

३)हाताने छान मळून घ्यायचे कोमट झाल्यावर. मळल्याने घशात बसत नाही. 
४) आता दुसर्या टोपात किसलेला गूळ वितळवून घ्यायचा. किंचितसे तूप टाकून गूळ जसा वितळला की हे मिश्रण टाकून ढवळून गॅस बंद करून ठेवायचा.
५) मग रोजचेच वेलची वगैरे टाकून वळून घ्या. खमंग लागतात.
६) डायबीटीस लोकांसाठी स्प्लेडा नाहीतर आयडियल साखरेचे प्रमाणः
१/४ पेक्षा किंचित कमी स्प्लेन्डा मुसती मिक्स करून मळून लाडू बांधणे. तर आयडियल शुगर १/४ घेवून नुसती मिक्स करून लाडू बांधणे. माझ्या मते आयडीयल शुगर जरा स्पेल्न्डा पेक्षा बरी आहे(mark the words, बरी आहे म्हणून). खरे तर स्प्लेन्डा वर बरेच रिसर्च एवढे सपोर्ट करत नाही.
त्यापेक्षा स्टीवीया(natural plant sugar) चांगली आहे. पण स्टीविया एकदम घशात वेगळी टेस्ट सोडते. असो.
अ)ह्या लाडवाची खासियत हीच तर बेसन कच्चे रहात नाही व टाळूस चिकटले हा प्रॉबलेम नाही कारण डाळ सुद्धा आधी भाजलेली असते. ब) पाक करावा लागत नाही. क) टिकतात. तूप कायच्या काय ओतावे लागत नाही मग पातळ झाले लाडू आता काय करू अशी धावाधाव नाही.
तसेच रोज रोज काय ती साखर खायची. मला तसेही तूपटलेले, चपटलेले एका बाजूने ,घशात घास बसणारे लाडू कोणाचेच आवडत नाहीत व आवडायचे नाहीत बेसनाचे असतील तर. बेसन लाडू फक्त माझ्या आईच्याच हातचा खावा. आई वरील पद्ध्तीने करायची म्हणून मीही तसेच करते व करून पहा मस्त लाडू होतात. गूळाची चव छान लागते.
वरती लिहिले आहे तेच. वरील फोटो आताचा नाही. आधी लाडू केले तेव्हा काढला होता.
आर्च तु बेसन वापरलेस की
आर्च तु बेसन वापरलेस की चण्याची डाळ भाजुन वाटुन केलेस?
सहिच... मी आत्ताच बेसन लाडु
सहिच... मी आत्ताच बेसन लाडु करायला जात होते आता ह्याच पद्धतीने करते. डाळीपासुन सुरवात..
रवाळ बेसन वापरलं.
रवाळ बेसन वापरलं.
मनुस्विनी, तुझ्या पध्दतीने
मनुस्विनी,
तुझी रेसिपी रॉक्स !!

तुझ्या पध्दतीने केलेल्या लाडवांचा फोटो.
एकदम मस्त झाले आहेत.
फिओना, मस्त दिसताहेत लाडू.
फिओना,
मस्त दिसताहेत लाडू. छान एका साईजचे वळलेस. तूही चणाडाळ भाजून केलेस?
हो, अगदी तु सांगितल्याप्रमाणे
हो, अगदी तु सांगितल्याप्रमाणे केलेत. फक्त गुळ थोडा जास्त टाकला.
मुगाचे पण याच पध्दतीने करुन पाहीन आता.
फिओना, हे लाडू साखरेपेक्षा
फिओना, हे लाडू साखरेपेक्षा खूप छान लागतात ना? एक वेगळी चव येते ना मधुरशी.
हो ना, मला ते टिपीकल बेसनाचे
हो ना, मला ते टिपीकल बेसनाचे लाडु अजिबात आवडत नाहीत. बर्याचदा ते तुपकट लागतात.
या लाडवांना गुळामुळ्ये छान वेगळी चव येते.
मी पण पुन्हा एकदा केले. एकदम
मी पण पुन्हा एकदा केले. एकदम सही झाले. लाडू बेसन विकत आणायची आयड्या दिल्याबद्दल मिनोतीला विशेष धन्यवाद
काजू नको होते
काजू नको होते
हा मी केलेला एक
हा मी केलेला एक प्रयत्न.
यशस्वी झाला असा म्हणायला काही हरकत नाही.
घरी हे लाडू सर्वाना प्रचंड आवडले.
धन्यवाद
थँक्स मृदुला. दिवाळीच्या
थँक्स मृदुला. दिवाळीच्या आधीच केले मग आता परत करावे लागणार... कारण मी केले होते घरी तेव्हा नवर्याने एका आठव्ड्यात लाडू संपवले दोन दोन खावून दिवसाला.
मनु, हे लाडू किती दिवस
मनु, हे लाडू किती दिवस टिकतील?? मागच्या वेळी केले होते. जबरी झाले होते एकदम. पण २-४ दिवसातच संपले. ह्यावेळी जरा जास्त करीन.
ओला हात नाही लावलास (म्हणजे
ओला हात नाही लावलास (म्हणजे दूधाचा/पाण्याचा) तर आरामात टिकतात तीन चार महिने लपवून ठेवलेस तर(पण लाडूच इतके चविष्ट होतात रहातच नाहीत). बेसन चांगले शिजलेले असते दूध टाकले तरी. दुसरे म्हणजे गूळ वितळवून घेतो पाणी न टाकता. त्यामूळे नासायचा प्रश्णच येत नाही.
मला लपवयाला लागतात घरच्या उंदरापासून असे काही गोड पदार्थ.
म्हणजे टिकण्यासाठी दुध न
म्हणजे टिकण्यासाठी दुध न टाकता तसेच करायचे का? पण मग दुध नाही टाकलं तर रवा फुलणार कसा?
वरच्या कृतीमध्ये दुध टाका लिहलंय ना? म्हणून विचारलं.
अग दूध टाकायचेच पण ते टाकले
अग दूध टाकायचेच पण ते टाकले की छान परतायचे. मग परत वळताना वगैरे दूधाचा हात व हबका मारू नकोस.
अच्छा. थँक्यु ग. केले की
अच्छा. थँक्यु ग. केले की सांगते कसे झाले ते.
मनःस्विनी तुमच्या रेसीपी एकदम
मनःस्विनी

तुमच्या रेसीपी एकदम सही असतात हं. आवडतात मला.
ह्या वेळी ह्याच प्रकारचे आणि झटपट रवा लाडुच करणार.
धंन्स
थॅंकु.
थॅंकु.
सिंडे तू बेसन वापरून लाडू
सिंडे तू बेसन वापरून लाडू केलेस मग त्यात दूध किती घातलेस? आणि बेसन किती वाटया घेतलेस सांगतेस का?
मी रुचिरा पद्ध्तीने करते दर वेळी पण या वेळी गुळाचे ट्राय करायचे आहेत.
लाडू बेसन आणले होते. गूळ थोडा
लाडू बेसन आणले होते. गूळ थोडा जास्त घातला. बाकी सगळे प्रमाण हेच ठेवले होते. एक वाटी डाळीचा साधारण तेव्हढाच रवा निघतो.
मी काल रात्री तुझे हे लाडू
मी काल रात्री तुझे हे लाडू साखर घालून केले. भावाला गूळ आवडत नाही म्हणून!! पहील्यांदाच केले कुठले लाडू!! एकदम छान झालेत. रवाळ झालेत अगदी. सर्वांना खूपच आवडले. तुला त्यानी धन्स सांगितले आहेत पाक्रु बद्दल!!
रोचीन, धन्यवाद.
रोचीन, धन्यवाद.
मनु, गुळाच्या ऐवजी ब्राऊन
मनु, गुळाच्या ऐवजी ब्राऊन शुगर वापरून होतील का ग? वितळवून घेईन बाऊन शुगर.
हो आर्च, वापरु शकतेस ना.
हो आर्च, वापरु शकतेस ना.
मनु माझे बिघडले लाडु गुळ
मनु माझे बिघडले लाडु गुळ घालुन घट्ट झाले ?
घट्ट म्हणजे? गूळ वितळवायचा की
घट्ट म्हणजे?
गूळ वितळवायचा की लगेच टाकायचे मिश्रण. पाक नाही होवु द्यायचा. तूप टाकले नी ज्यास्त वेळ गूळ हाय टेंप वर ठेवला की पाक होतो.
एकदम टण़क झाले का? असेल तर एकदा गरम कर जरा दूधाचा हबका मारून. मग कुस्करतो का बघ.
मनु काल पुन्हा हे लाडू केलेत.
मनु काल पुन्हा हे लाडू केलेत. झकास झालेत. धन्यवाद परत एकदा.
मनु हे बघ, ह्यावेळेस पण केले
मनु हे बघ, ह्यावेळेस पण केले तुझ्या पद्घतीने लाडू. मस्त झालेत.
मस्त रंग दिसतोय. तू पण
मस्त रंग दिसतोय. तू पण चण्याची डाळ भाजून केलेस ना?
Pages