मेथी-मटर-मलई

Submitted by सायो on 29 September, 2009 - 11:57
methi malai matar
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मोठी जुडी मेथी, १ वाटी ताजे/फ्रोजन मटार, १ टे.स्पू. तूप, बारीक चिरलेला कांदा-पाव ते अर्धी वाटी, हळद १ टी स्पू, आलं लसूण पेस्ट- १ टी.पू. प्रत्येकी, गरम मसाला- एक टी स्पू., लाल तिखट चवीप्रमाणे, अर्धी वाटी खवा, फ्रेश क्रिम चवीप्रमाणे(साधारण अर्धी वाटी), चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. अगदी बारीक न चिरता जाडसर चिरावी. कात्रीने कापली तरी चालेल. कांदा अगदी बारीक चिरावा जेणेकरुन भाजीत अजिबात दिसणार नाही.
नॉनस्टीक कढईत १ चमचा तूप गरम करुन त्यात कांदा परतावा. रंग बदलला की त्यात हळद, आलं लसूण पेस्ट,गरम मसाला घालून परतावे. व बारीक गॅसवर शिजू द्यावे. थोड्या वेळाने तूप सुटून बाजूला झालं खवा परतावा. नंतर त्यात मेथी घालावी व मटार घालावेत व झाकण घालून बारीक गॅसवर शिजू द्यावं. त्यात चवीप्रमाणे लाल तिखट घालावं. मेथी शिजल्यासारखी वाटली की त्यावर फ्रेश क्रिम घालावं व झाकण घालून चांगली वाफ काढावी. चवीप्रमाणे मीठ घालावं व गरम गरम खावं.

वाढणी/प्रमाण: 
२,३ जणांकरता
अधिक टिपा: 

मेथीचा कडवटपणा जायला थोडं पनीर घातलं तरी चालेल.
गरम मसाला अगदी नावापुरताच घालावा. ह्या भाजीला फार मसाले चांगले लागत नाहीत.
दिपच्या फ्रोजन मेथी मटर मलईचे जिन्नस बघून त्या चवीच्या जवळ जायचा प्रयत्न केलाय. नाहीतर नेटवर भरपूर रेसिपी मिळतील.

माहितीचा स्रोत: 
बहुतेक दीपच्या फ्रोजन पाकिटावरचे जिन्नस पाहून स्वतःच्या मनाने भर टाकून, गाळागाळी करुन केलीय असं आठवतंय.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, फोटो मस्त आलाय.
छान होते या रेसेपीने भाजी. आमच्याकडे ही आणि सायोची पनीर माखनी आवडत्या भाज्या. आणि हो सोबत मलई बर्फी. Happy

सायो,

अप्रतिम होते या रेसिपीनं भाजी.......... कालच केली होती... पहिल्यांदाच असं काहितरी वाचून try करत होते... नवरा जाम खुश!!!!!!! म्हणाला, माझ्या मित्रांना जेवायला बोलावेन तेंव्हा हीच भाजी कर Happy

खाली काही फोटो देतेय मी केलेल्या मेथी मटर मलईचे....

भाजी शिजत असताना....
130720111578copy.jpg

हे तयार झालेलं ultimate outcome!!!!!!!!!!! Lol

130720111581copy.jpg

धन्स!!!!!!!!! रेसिपीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!!!!!!!!

खतरनाक फोटो!!

सायो तुझ्या सगळ्याच रेसिप्या भन्नाट असतात.
( कल्लोळाला तु ़ काय बनवून आणले होतेस, महत्वाचे म्हणजे ते मला खायला मिळाले होते का हे आठवणारी बाहुली)

आज या रेसिपीने भाजी केली. मी गरम मसाला जरा जास्तच घातला. भन्नाट चव आली. फ्रेश क्रीम घालून उकळी काढली की मसाला छान मुरतो मग दहा मिनिटांनी पानं वाढायची. यम्म!

आज केली गं सायो ही भाजी.. पुन्हा एकदा धन्यवाद इतक्या सोप्या रेसिपिकरता.. मस्त झाली होती. फोटो पण नाही काढला Happy थोडं पनीर पण घातलं.

छान पाकृ. सोपी वाटतेय करुन पहातो. फ्रेश क्रिम म्हणजे सायच ना? ती जमवावी लागेल आधी. की मिळते सु.मा. मध्ये फ्रेश क्रिम?

Pages