चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. २ : इश्श! बील काय म्हणेल? - Arch

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 11:20

चित्र क्रमांक ३

hilary-clinton-aamir1.jpg

अमीर : काय म्हणताय हिलरी ताई?

हिलरी : ताई काय म्हणतोस?

अमीर : मग काय अक्का म्हणू?

हिलरी : ए मी काय पार्ल्याच्या बीबी वरची वाटले की काय? कधी लंचचा मेनु टाकायला आलेली पाहिलं आहेस मला? कधी तिकडे चक्कर टाकलीच तर कोण काय वाचतय किंवा कोण कोणाला काय टोमणे मारतय एवढच पहायला येते. परदेश दौर्यावर तेवढच कामाला येतं.

अमीर : अरे टोमणेच ऐकायचे असले तर त्या पुण्यातल्या पुणेकर बोर्डावर जात जा. समोरच्याला लक्षातपण येणार नाही. पण चार जागी त्याची चर्चा होईल. कदाचीत ते तसेच वापरलेत तर ओबामा तुम्हाला कुठे गेला असाल तेथून ताबडतोब परत बोलावून घेतील. त्यामुळे जरा जपूनच.

हिलरी : अरे परत अहो काय म्हणतोस? मी काही एवढी मोठी नाही. पण काय रे मायबोली नाव असून तेथे काही लोकं इंग्लीशमध्ये का लिहितात?

अमीर : (खुदुखुदु हसत) अग, त्याच काय आहे हिलरी, काहींना तीच त्यांची मायबोली वाटते. Do you know what is अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणं ?

पण तू बाकी मराठी छान बोलतेस. मायबोलीच्या लघुलेखन स्पर्धेत पण भाग घेऊ शकशील.

हिलरी : (किंचीत लाजून)कसच कसच. काय रे अमीर, तुझं लग्न बिग्न झालं आहे की नाही? नाही तुझ्या बोटात अंगठी दिसत नाही म्हणून विचारलं. का तूपण बीलसारखाच? नाही म्हणायला बील अंगठी मात्र घालतो हो.

अमीर : अग, एक सोडून दोन झाली आहेत. बरं ते जावू दे. माझ्या नवीन मूव्हीबाद्दल ऐकल आहेस की नाही? "आम्ही खान". त्यात माझा लीड रोल आहे त्याची तयारी चालली आहे. शहारुखला व्हिलनच्या रोलबद्दल नुसतं विचारलं तर यु.एस. ला जावून केवढी अ‍ॅड करून आला त्या नूअर्क एअरपोर्टवर.

हिलरी : त्याबद्दल विशेष काही नाही वाटल. ह्या टॅक्टीक्स तर आम्ही एलेक्शनच्यावेळी हमखास वापरतो. पण तुझी नवी लीड लेडी कोण? मी सुचवू का तुला? चेलसी कशी वाटते?

(अमीर : (मनातल्या मनात) त्या कॅमेरामनला सांगितलं आहे सगळं रेकॉर्डींग करायला. कुठे कुठे बरं द्यावी ही फिल्म? शहारुखला म्हणावं पब्लिसिटी स्टंट कशाशी खातात ते माहित तरी आहे का? एक डान्स रेकॉर्ड झाला की खूप. नाहितर ही बया त्या चेलसीला गळ्यात मारायला बघायची. सेक्रेटरी ऑफ द स्टेट आहे न? निगोशिअन्समध्ये पक्की असणार. पण तिला माझी टेक रिटेकची आयडिया माहितच नाही.)

अमीर : I will think about it. अरेच्चा! म्युझीक सुरु झालं की. मग काय हिल्स, May I have this dance with you?

हिलरी : इश्श! बील काय म्हणेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

May I have this dance with you? ...खरच ईश्श्य चे भाव दिसतायत हिलरीआज्जींच्या चेह-यावर आता आमीर विचारतोय म्हटल्यावर न लाजयला काय झालं म्हणा Proud Lol

संयोजक आणि या लेखाचे जे कुणी लेखक/लेखिका असतील ते,

कृपया गैरसमज नसावा, पण या लेखात चित्रात दर्शवलेल्या प्रसंगाचा उल्लेख नाही. स्पर्धेच्या नियमावलीत क्र.३ च्या नियमात तसं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे.

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! Happy