"परस्पर संबंध ओळखा" स्पर्धा क्रमांक ६

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 16:51

कोडं क्रमांक ६ :

खालील चित्रांमधील परस्पर संबंध ओळखा.

quiz6_a.jpgquiz6_b.jpgquiz6_c.jpgquiz6_d.jpg

कोडं क्रमांक ६ ची हिंट :

hint6_a.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चारही चित्रे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणार्‍या स्त्रीयांची आहेत Proud

दीपु.:हहगलो:
परवीन बाबी,पुनम आणि सेलिना ओळखल्या.चौथी कोण?
बहुतेक vogue मासिकाच्या फ्रंट पेजवर ह्यांचे फोटो आले होते. किंवा मिस ईंडिया झाल्यावर सिनेमात आलेल्या.

संगीता बिजलानी चा एखादा छान फोटो टाकायचा न्,हा असा काय टाकलाय.किती छान दिसते ती.चौघी मीस ईन्डीयाच .पण ईतक सोप्प नाही देणार हे संयोजक.आणखी काही असणार.

काय हे क्सा!!! नाही रे बाबा..
ओळखीच्या तिघींनी ज्यांच्याबरोबर काम केलंय त्यांच्यात एक समान धागा दिसतोय .. पण ही चौथी कोण हे लक्षात येत नाहिये त्यामुळे नक्की नाही अजून!

मला वाटेते मुद्दामच तसा फोटो टाकला असणार.. ती बहूतेक संगीताच आहे किंवा सोनु वालिया पण असू शकते..

ही लिंक पहा आणि हुडका यातून http://en.wikipedia.org/wiki/Category:Femina_Miss_India_winners Proud

यान्चे नवरे खेळाडू आहेत का?
तो चौथा फोटो ओळखता येत नाही
(मात्र ती मौशुमी चटर्जी नक्कीच नाही रे भो, मौशुमीच्या गालावर खळ्या हेत, अन ती दिस्तेही गोड)

नवरे नाही.. क्रिकेटपटूंच्या बरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं असण्याची एक शक्यता आहे. ती नक्की नाही कारण चौथी नटी माहिती नाही.. पण जेटली बाई, धिल्लों आणि परवीन बाबी मध्ये बाकी काही सूत जुळण्याची शक्यता कमी वाटतेय!

सगळ्यांच्या आडनावांचा काही संबंध आहे का?? सगळ्या आधी मिस इंडीया झाल्या व नंतर फिल्म लायनीत व खेळाडुंशी संबंधीत वगैरे.

(अत्ता रडु का मग असे भाव असलेली) बाई कोण?????>>>> Lol पर्फेक्ट वर्णन!

ती बाई कोण हे मीही नाही ओळखलेलं, पण या सर्व मॉडेल्सचा आणि क्रिकेटचा संबंध आहे, हे हिन्टवरून वाटतंय. (प्रियांका चोप्रा ही हिन्ट घेतली, तर ती मॉडेल नव्हती, मिस इन्डियाही नव्हती- रनर अप होती. )त्यामुळे हिन्ट क्रिकेटच आहे असं वाटत आहे.

क्ष चा अंदाज बरोबर वाटतोय..
केप्या परवीन बाबीचे लग्न नव्हते रे झाले.. त्यामुळे नाव वैगेरे बदलण्याचा प्रश्ण येत नाही Proud

या तिघीही क्रिकेटपटूंच्या पदार्पण हिंदी चित्रपटातील (डेब्यू फिल्मस)अभिनेत्री आहेत.
परवीन बाबी : सलीम दुरानी चित्रपट : चरित्र
पूनम धिल्लो : सुनील गावस्कर चित्रपट :मालामाल
सेलीना जेटली : अजय जडेजा चित्रपट : खेल
याच धर्तीवर, मोहसिन खानचा पहिला चित्रपट : बटवारा. त्यात शशिकला, लीला चिटणीस व निरुपा रॉय होत्या. नि. रॉ. नाहीच. इतर दोघींपैकी तिसरी असू शकेल.

संदीप पाटील, किरमाणी वैगेरेंचे पण सिनेमे येउन गेले... त्यातली कुठलीतरी एक असेल
आशु यांचे लॉजिक पर्फेक्ट Happy

Pages