"परस्पर संबंध ओळखा" स्पर्धा क्रमांक ५

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 16:42

कोडं क्रमांक ५ :

खालील चित्रांमधून एक भौगोलिक माहिती मिळते. ती ओळखा.

quiz5_a.jpgquiz5_b.gifquiz5_c.jpgquiz5_d.jpgquiz5_e.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिण ध्रुवाशी संबधीत असेल.स्कॉट ने पहिली अयशस्वी चढाई केली होती.ज्यात तो मरण पावला.अ‍ॅमुंडसेन नॉर्वेचा.

अमुन्डसेन आहेत मला वाटते पहिला मानव्.कारण अमुन्डसेन आणि स्कॉट यांच्यात स्पर्धा होती. स्कॉट वादळात सापडला आणि जिकिरीने दक्षीन धृवाजवळ पोचला तिथे तो न पोचताच मेला पण त्याच्या आधी अमुन्डसेन पोचला होता आणि त्याचे निशाण फडकत होते ते स्कॉटने दुरुनच पाहिले् .ही कथा आम्हाला टेक्स्ट बुकात होती कोठेतरी. त्यामुळे अमुन्डसेनाची मोहीम यशस्वी झालेली आहे.

बुर्किना फासो आणि पेनेलोप वरून सहारा वाळवंटाचा काही संबंध?
बुर्किना फासो बहूतेक फ्रान्सच्या अंमलाखाली होतं त्याचा आयफेल टॉवरशी काही संबंध?
सहारा आणि दक्षिण ध्रुवावर अनुक्रमे पृथ्वीवरील अतिउष्ण आणि अतिशीत तापमान आहे तसा काही दुवा?

१. बुर्किना फासो. = रिपब्लिक ऑफ अप्पर वोल्टा =इलेक्ट्रीसिटी.
२. साउथ पोल = मॅग्नेटिक पोल
३. एफेल टॉवर = पहिला इलेक्ट्रीक रेडिओ संदेश /सगळ्यात जास्त वेळा वीज पडलेली वास्तु.
४. पेनेलोप क्रुझ = जी फोर्स सिनेमा. - गुरुत्वाकर्षण. ??
५. लेक वोल्टा , घाना.
६. वोल्टाइक पाइल.

पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाशी/ विद्युत चुंम्बकीय क्षेत्राशी / विजेशी /मॅग्नेटशी संबंधीत. पण नीट परस्पर संबंध लागत नाही.

बो विश, बरोबर उत्तर! अभिनंदन!!

कोडं क्रमांक ५ चे उत्तर :

शून्य अंश रेखावृत्त / मूळ रेखावृत्त. चित्रांनी सूचित केलेल्या देशातून/प्रदेशांतून जाते.

चित्र १ : बर्किना फासो या आफ्रिकन देशाच्या नकाशात त्यांचा झेंडा दाखवला आहे.
चित्र २ : अंटार्टिका
चित्र ३ : पॅरीसचा आयफेल टॉवर. पॅरीस हे शहर फ्रान्स या देशात आहे.
चित्र ४ : पेनेलोपी क्रुझ ही स्पॅनिश अभिनेत्री.
चित्र ५ : डावीकडील भाग म्हणजे आफ्रिकेतील व्होल्टा सरोवराचे उपग्रहीय प्रकाशचित्र. उजवीकडील भाग म्हणजे व्होल्टा सेल. या तलावातून मूळ रेखावृत्त जाते.