कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका १ : फराळी कचोरी - manjud

Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 20:38

प्रवेशिका १ : फराळी कचोरी

मूळ कविता : कविता

कूकरात शिट्ट्या करूनही न उकडलेला बटाटा
खलबत्त्यात टाकूनही न कुटली गेलेली आलं-लसूण-मिरची
पुदिना, कढीपत्ता आणि शेंगदाणे घालूनही न वठलेली फोडणी
या सार्‍याचं शेवटी होईल जेव्हा
मीठाशिवाय कालवण,
तेव्हा तुझ्या बेसन भरल्या हातातून
त्याचा गोळा गरम तेलात पडेल आणि त्या धूरातही
मी पाहू शकेन थेट स्टोव्हवरच्या कढईत
मला कधीच न आवडणार्‍या तुझ्या फराळी कचोर्‍या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy