"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ३

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:06

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

zabbu_flying_birds.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा अवघड आहे... कालच माझ्या खिडकीच्या बाहेर ग्रिलवर टाकलेल्या लाकडी फळीवर २ अंडी घालून ती उबवत कबुतर बसलं होतं. दुपारपर्यंत त्या अंड्यांच्यासकट सगळं गायब झालं. का कोण जाणे. त्याचा फोटो काढून ठेवायचा राह्यला.. नाहीतर आज टाकता आला असता.. Sad

चला इथेही देवु लगेहात झब्बु.
संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय येथे काढलेला फोटु.
साइज कमी करण्यासाठी स्ट्रेच & स्क्यु केलाय.
हा एक देखणा पक्षी. Happy

mor.JPG

हे पिल्लू पंखात दुखलेलं..
झाडावरून गच्चीत येऊन पडलेलं. मग तिथल्या बच्चेकंपनीसाठी दिवसभराचा उद्योगच होता त्याला मांजरापासून वाचवायचा.. त्या घरातली पोरं इतकी पिल्लूमय होती की मी मुंबईहून पोचतेय तिथे तो हातपाय धुवायलाही उसंत न देता... 'काकी गच्चीत चल पिल्लू बघायला' करत मला ओढून घेऊन गेली..

chhotula-pakshi.jpg

व्वाह!! झब्बू झकासच.

>>>>>>>बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात..
मिने, तुला 'कावळ्यांची माळ फुले..' असं म्हणायचय ना.. Wink

'कावळ्यांची माळ फुले >>> कावळे नाहीयेत ते.. बगळे प्रकारातलाच पक्षी.. केरळ आलेप्पी ला काढलेला फोटु..

'कावळ्यांची माळ फुले >> किर्‍या Happy कावळे असे गटाने कधी उडतात का ? एकाकी असतात बिचारे Wink

bird.jpg

Pages