भरली झुकिनी - Bharli ghosali

Submitted by तृप्ती आवटी on 30 August, 2015 - 22:17
bharali ghosali
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एका झुकिनीचे साधारण तीन पेर लांबीचे तीन तुकडे होतील एवढ्या लांबीच्या तीन झुकिनी.

मसाल्यासाठी: १ वाटी बेसन, १ वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट, १ चमचा तीळ, २ डाव तेल, मीठ, कोथिंबीर, प्रत्येकी अर्धा मसाल्याचा चमचा: तिखट, गरम मसाला, धणेजिरे पूड (ऐच्छिक), आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा लिंबाचा रस (ऐच्छिक).

क्रमवार पाककृती: 

बेसन थोड्या तेलावर भाजून घ्यावे. त्यात मसाल्यासाठी सांगितलेले इतर साहित्य घालून सगळा मसाला नीट हलवून घ्यावा. कोरडा वाटत असेल तर तेल घालावे. तेल घालण्याचा धीर होत नसल्यास पाण्याचा हात लावावा.

vxdmcv5.JPG

स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या झुकिनीचे सारख्या लांबीचे प्रत्येकी तीन तुकडे करावेत. त्यातला गर काढून टाकावा. हा पदार्थ ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा बनवला त्याच व्यक्तीनं आपला तो हा शब्द अस्तित्वात आणला असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.

h4vugry.jpeg

झुकिनीच्या तुकड्यांना पाणी सुटतं. ते पुसून घ्यावं आणि अफजलखानाला तोफेच्या तोंडी द्यायचं आहे अशा आवेशात एकेका तुकड्यात मसाला ठासून भरावा.

nwoonva.jpeg

पसरट कढईत किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात हे तुकडे सोडावेत. (झुकिनीच्या) पाठी सगळ्या बाजूंनी छान खरपूस भाजून/तळून घ्याव्यात.

gkf4deh.jpegcoarwno.jpeg

पाठी शेकल्यावर सगळे तुकडे उभे करून बुडं (झुकिनीची) शेकावीत.

g1yz1ba.jpeg

उरलेला मसाला भाजीवर भुरभुरवून, कढई/पॅनवर झाकण ठेवून मंSSSद आचेवर भाजी शिजू द्यावी. आवडत असल्यास तीळ पण घालावेत. तो मसाला पण छान खरपूस होतो.

1imcsru.JPG

पोळीसोबतच चांगली लागते ही भाजी.

वाढणी/प्रमाण: 
साधारण २-३ तुकडे एका व्यक्तीला
अधिक टिपा: 

_मसाल्यात तेल जेवढं जास्त असेल तेवढी भाजी चविष्ट लागते.
_भारतात हडाळ (बहुतेक भाजून घेऊन) दळून आणलेलं जे बेसन असतं ते भाजलं नाही तरी कच्चट लागत नाही. इथे मिळणारं मात्र कच्च लागतं म्हणून भाजून घ्यावंच
_मीठ आपल्या चवीनं घालावं, न जमल्यास टीनाला विचारावं
_बेसन आणि दाण्याच्या कुटाऐवजी बेसन+तिळाचा कूट पण चालेल
_भारतात राहाणार्‍यांनी 'हमारे पास मां है, घोसाळी है, पिछले आंगन मे घोसाळे का वेल भी है...' म्हणत अशीच भाजी घोसाळ्यांची करावी
bharli ghosali recipe marathi

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओट्याचा एक कोपरा आहे तिथे नॅचरल लाइटमुळे कशाचेही फोटो छान येतात>>>> मग सेल्फि विद कोपरा होत असेल ना अधी मधी Proud

रेसीपी अन फोटो एकदम कातील दिसताय.

मस्त दिसतेय.

गोडा मसाला आणि वरचे बहुतेक घालून दुधी, पडवळ केलीय. घोसाळे नाही केली पण करेन आता. झुकीनी इथे मिळते कि नाही माहिती नाही.

धन्यवाद Happy

स्वाती, तीळ नुसतेच वरून टाकलेत चवीसाठी. मसाल्यात फक्त दाकु आणि बेसन आहे.

कांदा-लसूण घालून सात्विक करून सोडाल भाजीला. नका हो असं करू Wink

मृण, योग्य हत्यारं नसतील तर आपले ते हे कच्चे असताना कोरून काढायला जरा अवघड जाईल. उकडून सालं काढून घेतले तर जमेल बहुतेक. लखनवी दम-आपलेतेहे असेच कोरून मसाला भरून बनवतात ना?

छान फोटो आणि रेसिपी

झुकिनीला हलके ग्रिल, बेक किंवा सॉते करूनच खाल्लीय, अशीही करून पाहीन आता

स्टफ्ड झुकिनी बेक करूनही छान लागते.
या तोफेच्या गोळ्यांना 'अमन की आशा' म्हणून झब्बू देईन आज वेळ मिळाला की Happy

घोसाळीची डाळ घालून केलेली भाजी. अहाहा. फारच कंटाळा आला तर मी कच्चे घोसाळे आणि कच्ची डाळ खातो::फिदी:

भारीच तोंपासु कृती आणि फोटो !. तोफांमध्ये दारुगोळा ठासून भरलेला आहे अगदी Lol

गर टाकून द्यायचा का ? मी बहुतेक पडवळाची करुन बघेन. घोसाळं आवडतं पण जरा जास्तच लिबलिबीत असतं. भज्यांमध्ये मस्त लागतं.

अगो, घोसाळ्याची पीठ पेरून भाजीही छान लागते. लिबलिबीतपणा कमी होतो व बेसनाचा खमंगपणा चवीत उतरतो. शिवाय घोसाळ्याच्या भजीपेक्षा कमी तेल वापरल्याचा आनंद! Proud (चव साधारणपणे पीठ पेरून केलेल्या सिमला मिरची भाजीच्या जवळपास जाते, सिमला मिरचीचा तिखटपणा उणे करून)

तिखटपणा उणे करून >> अकु, मग तशी चव तर पीठ पेरून केलेल्या खोडरबराच्या भाजीचीही लागेल! Proud
मलाही घोसावळ्यांची भजीच जास्त आवडतात. आणि एकाने डब्यात तिखटजाळ रस्साभाजी आणली होती तशी करून बघणार आहे.

सिमला मिरचीचा तिखटपणा >>>सिमला मिर्ची तुला तिखट लागते अकु? अगं अशानं तुझं विदर्भात कसं निभावणार मग?

व्हय जी.

शिराळे- दोडके
घोसाळे- गिलके

गिलक्याची भजी खाल्लीव काय कदी खाल्लीवं ? नाय नां मंग करुन बगा.....

आशूडी, अस्सं खर्रंखुर्रं बोललं तर वेताळ मानगुटीवर बसून आजन्म खोडरबराची भाजी खायला लावतो अशी भयप्रद वार्ता नुकतीच कानावर आली आहे! Lol

मामी, आपण घरी केलेली सिमला मिरचीची भाजी सात्त्विकच म्हणायची अशी टिफिनातली सि.मि. भाजी चमचमीत व तिखटाळ वर्गात मोडणारी असते. त्या प्रकारे केलेल्या भाजीला बेसन लावलेले असेल तर तेवढाच जरा दिलासा मिळतो! भावणाओंको समझो! Proud आमच्या शेजारी एकांकडे जळगाव स्पेशल टिफिन यायचा. त्यातील उसळी-भाज्यांवरचे तेलाचे बोटभर उंचीचे थर व लालभडक रंगाचा तवंग बघूनच माझ्या डोळ्यांतून टच्चकन् पाणी यायचं! Proud

फोटो आणि लिहायची पद्धत मस्त आहे. पण मला आयती खाऊन पाहावीशी वाटतेय. करायचा पेशन्स नाही अजिबात. आमच्याकडे झुकिनीचे लांबच्या लांब मिडियम जाडीचे काप करून ऑऑ, व्हिनेगर, सॉ-पे इ. वापरून ग्रीलवर टाकायची आणि फारच फार वरून आवडीचं चीज टाकून खायची अशी एकमेव प्रथा आहे.

आमच्याकडे झुकिनीचे लांबच्या लांब मिडियम जाडीचे काप करून ऑऑ, व्हिनेगर, सॉ-पे इ. वापरून ग्रीलवर टाकायची आणि फारच फार वरून आवडीचं चीज टाकून खायची अशी एकमेव प्रथा आहे.>> ते काप उरले चुकुन तर सॅन्डविचातही भारी लागतात.

ही भाजी करून बघितली होती पण इथे निरोप द्यायचा राहिला होता. सुपर्ब चव होती! थँक्स सिंडी ( तृप्ती) , झुकिनी परत परत बनवावीशी वाटते Proud

काल केली होती, मस्त लागते, तेलात कजुषी करता येत नाही, आमच्या झुकिन्या दाणगट होत्या त्यामूळे मौ व्हाव्या म्हणून रेसिपीच्या मध्यावर पेशन्स सपुन आम्ही सुरीचे वार चालवुन अजुन( एक घाव २) तुकडे केले शिबाय पाण्याचे हबके मारुन त्याना जाग्रुतही केले, मातोश्रिच्या मते कान्दा-खोबर भाजुन वाला मसाला पण भारी लागेल, थोडा रस्साही करता येइल.
काल तान्दळाच्या भाकरीही होत्या
फोटोसाठी सजावट करायची होती पण पेशन्स सन्पला होता jhukini.jpg

Pages