डाळ इडली

Submitted by प्राची on 6 September, 2008 - 05:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कप मुग डाळ
1/2 कप उडीद डाळ
2-3 सुक्या मिरच्या
2-3 लसुण पाकळ्या
जिरे
मीठ

क्रमवार पाककृती: 

रात्री दोन्ही डाळी धुवुन भिजत घालाव्यात. मिरच्या आणि लसुणही त्यातच भिजत घालावे.
दुसरे दिवशी हे सगळे मीठ व जिरे घालुन बारीक वाटुन घ्यावे.
नंतर इडलीपात्रातुन इडल्या वाफवुन घ्याव्या.
हे मिश्रण आंबवायची गरज नसते. त्यामुळे या इडल्या झटपट होतात. यात आपण आवडीप्रमाणे भाज्या घालु शकतो. अश्या या सोप्या,पौष्टिक इडल्या.

वाढणी/प्रमाण: 
दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराच्या 15 इडल्या होतात.
अधिक टिपा: 

डाळी भिजण्यास लागणारा वेळ सोडला तर इडली 20 मिनिटांत तयार होते.
अजून एक.. इडली करण्यापुर्वी मिश्रणात हिंगमोहरीची फोडणी घातली तर इडल्या मस्त खमंग लागतात.

माहितीचा स्रोत: 
माझी तमिळ मैत्रीण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सोपी वाटतेय हि ईडली. ह्या २-३ दिवसात नक्की करुन बघेन

प्राची,
या इडल्या फुगतात का नेहमीच्या डाळ-तांदळाच्या इडल्या सारख्या, त्यासाठी यात काही सोडा वगैरे घालावा लागतो का? या दोनच डाळी घालायच्या का हरबरा, तूर पण घातल्या तर?

त.टी: ही पाककॄती गणेशोत्सवात टाक तिकडे झटपट, पौष्टीक नाष्टा अशीच स्पर्धा आहे नाही तरी. Happy

मुग डाळ आणि उडिद डाल ह्या दोन्ही डाळी लवकर भिजतात तरी रात्र भर भिजत ठेवण्याची गरज असते का?

रुनी, चांगल्या प्रतीची उडद डाळ असेल तर इडली चांगली फुगते. सोडा नाही लागत.
अखी, डाळी साधारण 3-4 तास तरी भिजवाव्यात.

रुनी, चांगल्या प्रतीची उडद डाळ असेल तर इडली चांगली फुगते. सोडा नाही लागत.
अखी, डाळी साधारण 3-4 तास तरी भिजवाव्यात.

कृपया सांगाल का की,हे पीठ फ्रिजमध्ये किती दिवस राहतं?

सुप्रिया, माझ्या मते २-३ दिवस तरी राहिल. पीठ थोडे आंबले तरी फरक पडत नाही.

मी करुन बघीतली हि इडली, मस्तच झाली Happy
धन्यवाद!

खुप छान वाटतीये
करुन पहीली पाहीजे .........
Happy

*************************************************************
मनापासुन.............मनापर्यंत
*************************************************************
प्रिया

झक्कास रेसिपी! कसली मस्त होते ग. एका मैत्रिणीने केली आणि मला सांगितले मी लग्गेच केली आज. आत्ताच खाउन ताट खाली ठेवले. मस्तच एकदम Happy

DaalIdli.jpg

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

मिनोती, फोटो मस्तच.
लसूण आणी लाल मिरच्या तू पण डाळीबरोबर भिजत घातलेल्यास का जस वरती प्राची ने लिहिलय?

हो तसेच केले. मी गाजर पण घातले होते. त्यामुळे रंग केशरी आला.
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

प्राची,
आजच तुझी ही रेसीपी ट्राय केली.एकदम भारी झाल्या होत्या इडल्या.झटपट करायला मस्त आहेत्.मी तर डाळ जेमतेम ४-५ तासच भिजवली होती तरीपण मस्त फुगल्या इडल्या.

मी परवाच करून पाहिल्या ह्या इडल्या. स्टँड मध्ये पीठ घालून आत ठेवेपर्यंत त्याच्या भोकातून दोन-तीन पीठाचे थेंब खाली पडले. थोडक्यात पीठ पुरेसे सैल होते. पण इडली तेवढी फुगली नाही. थोडी दडदडीत वाटली. आणि चवीला किंचित कडवट लागल्या. काय कारण असेल?
मग उरलेले पीठ इडलीसाठी न वापरता आज त्यात वाटीभर रवा, थोडी लसणीची चटणी, गरजेप्रमाणे मीठ घालून डोसे केले. मग चवीला चांगले वाटले.

कडू कशी झाली ते नाही सांगू शकत. पण हलक्या होण्यासाठी पीठ बारीक वाटले गेल्यावरही ५-६ मिनीटे नुदते मिक्सरवर्/फूड्प्रोसेसर वर फिरु द्यावे त्याने हलकेपणा येतो.

हे पिठ थोडेतरी आंबायला हवे. डाळी वेगवेगळ्या भिजत घालून, उडीद डाळ अगदी बारिक व मूगडाळ भरड वाटली तरी चालेल. ( न आंबवल्यामूळे कडवट चव येते ) पिठ खुप फेटणे पण आवश्यक आहे. त्याने ते फुगेल.
बाकि चव छानच येणार, यात शंका नाही. हलक्या होण्यासाठी, काकडी किंवा दुधी बारीक किसून घातला तरी चालेल.

सोनचाफा,
मूग डाळीला तसाही एक उग्र वास असतोच. त्यामुळे असेल. वाटून झाल्यावर 'हातानेच' एकाच दिशेने फेट. हाताने फेटलेले ज्यास्त चांगले.

मागे कोणी तरी लिहिल् होतं न कि साउथ मधे लोक इनो टाकतात इडली करताना, ते आठवून मी या डाळ इडली करताना टाकते कधी कधी, मस्तं जाळीदार , हलकी होते ढोकळ्या प्रमाणे :).
जर जास्तं कडक झाली इडली तर त्याची फोडणीची इडली करायची , झकास होते !(कढीपत्ता टाकून फोडणी, त्यात बारीक कांदा, काळा मसाला,कोथिंबिर, हिंग वगैरे टाकून.)

>>जर जास्तं कडक झाली इडली तर त्याची फोडणीची इडली करायची , झकास होते !(कढीपत्ता टाकून फोडणी, त्यात बारीक कांदा, काळा मसाला,कोथिंबिर, हिंग वगैरे टाकून<<<

हे अमिरी खमन म्हणून खपू शकते आरामात जर काळा मसाला न टाकला तर. तडतडीत हिरव्या मिरचीची फोडणी,लि.न्बू, कोथिंबीर वगैरे डिजेने लिहिले तसे....

हो ! आम्हीही बारा इडल्यांपैकी चार पाच जेमतेम चटणीशी खाल्या बाकीच्याची फोडणीची इडली करून खाल्ली. सगळ्यांच्या इडल्या चांगल्या झाल्या आणि माझ्या नाहीत म्हणून विचारू की नको असा विचार करत होते. इडल्या दिसायला वरील प्रमाणेच होत्या पण हलक्या न झाल्याने शेवटी विचारावे म्हटलं.. पुढच्या वेळेस जास्त फेटून करून बघेन. कडवटपणा न आंबवल्याने आणि मूगडाळीच्या उग्रपणामुळेच असणार. Happy