अनुष्का शंकर - राइज

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

गेल्या महिन्यात अनुष्का शंकर आणि रवि शंकर ह्या दोघांच्या लाईव्ह परफॉरमन्सला गेलो होतो. अनुष्काला पहिल्यांदाच लाईव्ह ऐकले. (जरा उशीरच झाला) जैसा बाप वैसी बेटी. हॅटस ऑफ टू हर.

नंतर ओघानेच तिच्या सर्व अल्बमसचा शोध घेने, वारंवार ऐकने हे आले. शोधता शोधता मला तिने संगीत दिलेला राईज अल्बम मिळाला. तिचा हा ऐकुन तिसरा अल्बम. ह्या अल्बम मध्ये ती आपल्याला ट्रान्सच्या जवळपास नेऊ शकते. ह्यातील महादेवा हे काम्पोझीशन तर उच्चच आहे. मला त्यासोबत नेकेड, बिलव्हेड, व्हॉईस ऑफ मून, ऐन्शंट लव्ह ही ही देखील जास्त आवडली. कधीही ऐकावी अशी अवीट कम्पोझिशन्स आहेत ही.

फक्त भारतीय शास्त्रीय संगीत प्रेमी साठींच हा अल्बम नाही तर हा अल्बम काढताना तिने सर्व प्रकारचे प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवले आहेत. टिपीकल भाषेतच बोलायचे झाले तर वेस्टर्ण आणी इंडीयन यांचे फ्युजन आहे.

येत्या काही वर्षात ती वडिलांसारखीच लिजंड होनार ह्यात दुमत नसावे.

तिला लास्ट ऐफ ऐम वर ऐकता येईल.

विषय: 
प्रकार: 

ऐकायला हवा... पं. शिवकुमार शर्मा यांच्या चिरंजीवांचेही काम मला आवडते... स्वीट रोमान्स हा माझा खूप आवडता अल्बम आहे राहुल शर्मा चा... त्यामानाने त्याने एका हिन्दी चित्रपटात अगदीच सुमार संगित दिले होते...
_________________________
-Impossible is often untried.

ह्यातील महादेवा हे काम्पोझीशन तर उच्चच आहे. >> एकदम बरोबर रे !!!

इथे वाचून लगेच ऐकतेय. मस्तच आहेत कॉम्पोझिशन्स एकदम. मी तिचा कार्यक्रम १९९५ मधे पाहिला होता. तेंव्हासुद्धा काय तयारीने वाजवलं होतं !

मला पण आवडते अनुष्का शंकर....

ही एक youtube clip आहे... ८ मिनिटांची आहे... पहायला आणि ऐकायला खूप मस्त वाटतं...

http://www.youtube.com/watch?v=3HqQoLq5c2c

वा बरं झालं सांगितलंस.. नक्कीच ऐकेन..

आजकाल मला राहुल शर्माची संतुर ऐकायचे व्यसन लागलय.. गिरीराज स्वीट रोमान्सबद्द्ल सांगितल्याबद्द्ल धन्यवाद..

हे पण बघा. यान्नी नंतर मला आता ग्रँड माईस्ट्रो म्हणून पण ती आवडायला लागेल. Happy तो बासरी वाजवनारा यान्नी सोबत पण असतो.

[video:http://www.youtube.com/watch?v=DIa0g--sdcA]

गिरी राहुल मलाही आवडतो. त्याची आणि शिवकुमार शर्मांची जुगलबंदी ऐकलीये. शिव हारी पण तसे टिपीच संगीतकार होते. त्यांनी फक्त क्लासीकल वाजवून आपल्यासारख्या रसिकांना समाधीत न्यायच. Happy