बोल आणि अबोल

Submitted by harish_dangat on 7 October, 2010 - 23:51

फुकाचेच बोल परी
तयासी आहे मोल
जयाचा स्वभाव अबोल
तयासी लावती बोल

सोन्यासम विकती चिंध्या
वाचाळता ज्याचे मुखा
अंतर्मुख अन अबोल
सोने न कोणी घेई फुका

जे करीती व्यर्थ बडबड
वाटती ते महाज्ञानी
खोल निशब्द डोहाचे
वाटते उथळ पाणी

ज्याचे चाले अखंड रडणे
त्यास माय देते पान्हा
आईच्या मायेस मुकतो
शांत जो राहतो तान्हा

-हरीश दांगट

गुलमोहर: 

निव्वळ अप्रतिम... Happy
पण उखंड असा शब्द आहे का साहित्यात? Uhoh
तिथे अखंड सुद्धा चालेल ना हरिश?

बाकी कविता आवडली... Happy
बोलणार्‍याचे सातू विकले जातात, न बोलणार्‍याचे गहु सुद्धा कोणी घेत नाही.
ही म्हण आठवली..

सुंदर कविता. Happy

या निमित्ताने मला माझा एक शेर आठवला.

लपेटून चिंध्यांत घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी
लपेटून चिंध्यांस रेशीमवस्त्रे, अशी होय गर्दी, हटेना कुणी

वरवरच्या गोष्टींना आणि जाहिरात बाजीला
भुलणारेच अनेक असतात हा आशय मस्त उतरलाय कवितेतून