टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ११ - दीपांजली

Submitted by संयोजक on 21 September, 2010 - 19:48

गणापती बाप्पाच्या डिझाइन नी सजवलेलं वॉल हँगिंग.

वापरलेले टाकाउ सामान :
1. मुव्हिंग करताना एका खोक्यातून आलेला जाड पुठ्ठा
2. पेपर नॅपकिन/ टिशु रोल्स ची नळकांडी
3. फेस्टिवल साठी मेन्दी डिझाइन्स् ची पोस्टर बनवताना उरलेले ऑड साइझ चे रंगीबेरंगी छोटे तुकडे
4. रंगु शकत नाहीत असे जुने मेन्दीचे कोन
5. एका व्यक्ती साठी वापरल्यावर पुन्हा दुसर्‍या त्वचेवर वापरु शकत नाही असे अर्धवट उरलेले बॉडी पेन्ट्स चे कोन.
6. जुन्या तुट्लेल्या वॉल हॅगिंग चे गोंडे.

फिनिशिंग यावे म्हणून वापरलेले इतर साहित्यः
मणी, रंगीत क्रिस्टल्स, ग्लॉसी फिनिश कोट.

कृति:
१.सर्व प्रथम निरनिराळे ऑड साइझ चे उरलेले रंगेते कागद नळाकांड्यांना चिकटवले.
२.नळकांड्यांचा मध्यभाग मोजून सुई दोर्‍याने ओवण्यासाठी भोकं पाडली.
३.पॅकिंग मधून आलेल्या खाकी पुठ्यालाही रंगीत कागद चिकटवून घेतला.
४. नळकांड्यांवर वाया गेलेल्या जुन्या मेन्दीच्या कोनानी फ्री हॅन्ड नक्षीकाम केलं, चमकणारे रंगीत क्रिस्टल लाऊन थोडा गेट अप आणला.
५. मोठ्या पुठ्ठ्या वर पुन्हा एकदा वाया गेलेल्या मेन्दीच्या कोनांनी , बॉडी पेन्ट्स च्या रंगीत कोन्स नी गणपतीच्या थीम वर फ्री हॅन्ड डिझाइन, इतर नाजुक नक्षीकम केलं. रंगीत क्रिस्टल्स लाऊन गेट अप आणला.

TT_DJ2_p7.jpg
( पहिल्या इमेज मधे टकाउ साहित्या बरोबर सजवलेल्या नळकांड्याची इमेज एन्लार्ज करून क्रॉप केली आहे.)

६. नळकांडी आणि गणापतीचा पिस वाळल्यावर ग्लॉसी फिनिश कोट दिला ज्यामुळे मेन्दी , इतर रंग अगदी नखाने खरवडले तरी निघणार नाहीत.

TT_DJ2_p4.jpg
दुसर्‍या इमेज मधे फक्त एन्लार्ज्ड गणपतीचा पार्ट आहे ( वॉल हँगिंग चा सर्वात टॉप चा तुकडा.)

७. हे सगळं जाड सुई दोर्‍यानी ओवून घेतलं, मधे मणी ओवले आणि जुन्या तुटक्या वॉल हँगिंग चे गोंडे वापरून फिनिशिग टच सकट ब्रॅन्ड न्यु वॉल हँगिंग तयार !
लास्ट इमेज मधे पूर्ण वॉल हँगिंग आहे ( फोटो मधून फार कल्पना येत नाहीये, नम्तर हस्तकला वर मोठ्या इमेज लिंक्स दुसरीकडे टाकून देइन.)

TT_DJ2_p9.jpg

Note : स्पर्धेच्या नियम क्र. ६ प्रमाणे 'भेटवस्तु म्हणून देउ शकता आली पाहिजे' याकडे विशेष लक्ष देऊन नवीन मणी नवीन वापरले, नाही तर जुन्या माळेचे मणीही वापरता आले असते पण फिनिशिंग टच आला नसता आणि भेटवस्तु म्हणून देताना जरा विचित्रं वाटलं असतं :).

टिप्सः
इथे टाकाउ वस्तु वापरायच्या म्हणून मी जे होते ते उरलेले रंगीत पेपर वापरले पण नवीन म्हणूनच करणार असाल तर नळाकांड्यांना वेलेवेट चे कागद, छोटे आरसे, किंवा बांधणीचे कापड फॅब्रिक ग्लुनी चिकटवून त्यावर नाजुक सोनेरी लेस गुंडाळली तरी छान दिसेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून फोटो टाक ना , डिझाईन नीट दिसेल.
जेवढं दिसतंय तेही खासच वाटतंय गं, फिनीश खूपच मस्त आलाय आणि टाकाऊ पासून केलंय असं अजिबात वाटत नाहीये इतकं attractive झालंय.

अगदी आर्टीस्टीक आहे हं. गणपती काय सुंदर आहे.

आपल्या अंगात काय काय कला नाहित हे जाणवून देतेस मला. Happy

थँक्स सायो, जुई, ऋयाम, आशु, धनुडी, वर्षा, मंजु, ज्ञाति, पूनम, पन्ना सगळयांना :).
ज्ञाति,
जे असामीला सांगितलय तेच तुला, काहीतरी सिलिब्रेट कर आणि आमंत्रण पाठव Proud

Pages