क्रोशा प्राथमिक माहीती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

क्रोशा हा विणकामाचा प्रकार ज्यांनी कधीच केला नाहीये त्यांच्यासाठी इथे प्राथमिक स्वरुपाची माहीती देत आहे.

दोरा: क्रोशाचे काम दोरा वापरुन करता येते. पांढरे तसेच इतर रंगाचेही दोरे मिळतात. पण हे काम करायला दृष्टी उत्तमच हवी. Happy टेबलवर, टीवीवर घालायचे रुमाल, लेस (आपण शिवणकामात साडीला ड्रेसला लावायला लेस वापरतो ती) दोरा वापरुन केलेले सुरेख दिसतात.

लोकरः क्रोशाचे काम लोकर वापरुन पण करता येते. स्वेटर, टोप्या, शाल, अनेक प्रकारचे रुमाल, पर्स असे बरेच प्रकार करता येतात.

सुई: दोरा आणि लोकर काम करण्यासाठी लागणार्‍या सुया वेगवेगळ्या असतात. दोर्‍याचं काम करण्यासाठी स्टीलच्या सुया असतात. सुया वेगवेगळ्या नंबरच्या असतात. कोणत्या क्रमांकाची सुई आहे त्यावर सुई किती जाड / बारीक आहे ते ठरते. मी अजून वेगवेगळ्या सुयांवर क्रोशाकाम करुन पाहीलेले नाहीये त्यामुळे विणीत कसा फरक पडतो ते मी आत्ता तरी सांगू शकणार नाहीये.

क्रोशामधे जे प्रकार किंवा टाके म्हणू यात विणले जातात ते खालीलप्रमाणे

  • साखळी
  • मुका खांब
  • खांब
  • मुखरी

आंतरजालावर अनेक ठीकाणी क्रोशा बिगीनर लेसन उपलब्ध आहेत.
http://crochet.about.com/od/learnbasics/ss/stchain.htm - साखळी
http://crochet.about.com/od/learnbasics/ss/sc_6.htm
http://crochet.about.com/library/bldoublecrochet.htm - खांब (यात सुरुवातीला एक टाका सुईवर असतो मग एक वेढा आणि जो टाका विणायचा आहे त्या साखळीत सुई घातल्यावर सुईवर तीन टाके दिसू लागतील. मग वेढा घेऊन पहील्या टाक्यातून तो वेढा ओढून घेणे शाळेत याला आम्हाला 'तीनाचे तीन' असं शिकवलं होतं. मग पुन्हा वेढा घेणे वर सुईवरच्या दोन टाक्यातून तो काढणे. याला 'तीनाचे दोन' असं म्हणलंय. मग पुन्हा वेढा आणि सुईवरच्या दोन्ही टाक्यातून तो काढणे. म्हणजेच 'दोनाचा एक'. इतकं झाल्यावर एक खांब विणून पूर्ण झाला.)

मुखरी - खांब साखळी खांब असा संच (उदा - दोन खांब एक साखळी दोन खांब, एक खांब एक साखळी एक खांब)

मुका खांब हा प्रकार मला आंतरजालावर सापडला नाही. हा खांबाचाच प्रकार. फक्त यात तीनाचे तीन न करता तीनाचे दोन आणि दोनाचा एक करणे.

सुरुवात करताना साखळी आणि खांब घालण्याचा खूप सराव करावा लागतो. साखळीमधली प्रत्येक साखळी सारखी दिसणं आवश्यक आहे. एखादी घट्ट एखादी सैल असं झालं तर त्यावर केलेलं विणकाम चांगलं दिसणार नाही. तसेच खांबाचेही, सगळे खांब सारखे दिसायला हवेत. जास्त घट्ट विणकाम केलं तर ते कडक होतं. (पुरीच्या पिठाच्या केलेल्या पोळ्यांसारखं.. )

तर ही झाली क्रोशाबद्दल प्राथमिक माहीती. आंतरजालावर उदंड माहीती आणि चलचित्रपट उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांना अजिबात क्रोशा येत नाही त्यांनी त्याचा आधार घेऊन वर सांगितलेले प्राथमिक टाके शिकायला हवेत. खरं तर क्रोशाकाम हे असं वाचून करण्यासारखं कामच नाही ते बघूनच शिकायला हवं Happy हां एकदा का टाके आले की मग लिहीलेले पॅटर्न वाचून हव ते विणणं शक्य होईल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मीन्वा छान माहिती.
मला यातलं काहीच येत नाही. करायचा पेशन्स पण नाही. लहानपणी कधितरी चालु केलेली सगळी प्रोजेक्ट अर्धिच राहिली होती!

नमस्कार,
मी नेहमी प्रमाणे खूप खटपट करून पासवर्ड मिळवला आहे.
एकंदर वाचनात येणारे लेख खूप छान आहेत. निरनिराळ्या कलांबद्दल
चांगली माहीती मिळते आहे.
धन्यवाद.