शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ११

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:55

मदुराईचे मिनाक्षी मंदीर, कॅलिफोर्निया मिशन्समधली चर्चेस, दिल्लीची जामा मशिद, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही आहेत काही प्रार्थनास्थळे. कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या प्रार्थनास्थळाचे फोटो या झब्बूमध्ये अपेक्षित आहेत.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - प्रार्थनास्थळ

कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा (मंदिर ते चर्च) फोटो इथे टाकावा.

2010_MBZabbu-Prarthana-Sthale-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आम्ही आहोत.. पण गोयंची देवळं टाकताना गावातालुक्यासकट टाका. Happy

हे एक अजून आडगावीचे देऊळ... छोटेसेच पारावरचे देऊळ पण तो तिठा आवडला म्हणून काढलेला फोटो. Happy

nhaichi-aad.jpg

IMG_0558.JPG
ज्योतीभास्कर जयंत साळगावकरांनी त्यांच्या घराच्या जागी बांधलेले मेढा, मालवण येथील सुवर्ण गणेश मंदीर (मागील बाजुने)

नेरूरचं कलेश्वर आणि वालावलचं आदिनारायण आहे का?

वालावलचं आदिनारायण. श्वासमधली फ्रेम. मी काढलेला फोटो नव्हे पण माझ्या फिल्ममधली फ्रेम. Happy

shwaas-madhale-deul.jpg

कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा (मंदिर ते चर्च) फोटो इथे टाकावा. या संयोजकांच्या विनंतीला मान देऊन हा फोटो टाकत आहे.
IMG_1526.JPG
जामा मस्जिद, हैद्राबाद

इथे फक्त प्रार्थनास्थळांचे फोटो (बाहेरून) अपेक्षित आहेत. आतल्या देवांचे नाहीत.

मायबोलीकर, तुम्ही तो जो चपलांचा फोटो टाकलायत तो काढून टाकलात तर बरं होईल.

भावे आडोंबातलं(कोंकण) ग्रामदैवत. शंकराचं देउळ

0108.JPG

अगदी लालू, माहित असतील तर कुठली देवळं ते लिहा लोकहो.

Pages