शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ११

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:55

मदुराईचे मिनाक्षी मंदीर, कॅलिफोर्निया मिशन्समधली चर्चेस, दिल्लीची जामा मशिद, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही आहेत काही प्रार्थनास्थळे. कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या प्रार्थनास्थळाचे फोटो या झब्बूमध्ये अपेक्षित आहेत.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - प्रार्थनास्थळ

कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा (मंदिर ते चर्च) फोटो इथे टाकावा.

2010_MBZabbu-Prarthana-Sthale-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार सॅम, नीधप, मायबोलीकर
खास लोकाग्रहास्तव, गोव्यातील तामडी सुर्ला. हे देऊळ ७०० वर्षे जूने आहे, पण अजूनही सुस्थितीत आहे. तिथे अजूनही पूजा होते. परिसर अत्यंत रम्य. बाजूनेच छोटी नदी वाहते. गोवा सरकारतर्फे, दूधसागर धबधब्याची जी सहल जाते, त्यात हे दाखवतात.
पा परिसरात गेल्यावर, आपण दोन चार शतके मागे गेलो असे वाटते. कमालीची शांतता आहे इथे. जायचा रस्ता पण अत्यंत रम्य. पण पूर्ण दिवस द्यावा लागतो.

tamadee surla.jpg

गोव्यातील डिचोली (बिचोलीम ) गावातल्या इंडष्ट्रियल एरिया मधले हे आजोबांचे देऊळ. हो या देवाचे नाव आजोबा. (गोव्यात आई आणि मावशी, या नावांची पण गावं आहेत ) मूर्ती खुप भव्य आहे. पण देऊळ मोठे नाही. बाहेरुनच सर्व मूर्ती दिसते.
हे आजोबा म्हणजे तिथले रक्षणकर्ते. मूर्तीकडे बघून दरारा आणि आदर, वाटतोच.

aajoba.jpg

दिनेशदा, हा फोटो बाद ठरेल कदाचित, प्रार्थना स्थळांचे बाहेरच्या बाजूने काढलेले फोटो टाकायचे आहेत असं पोस्ट आहे वर संयोजकांचं ..

सगळे फोटो मात्र फारच छान, तडक उठून प्रवासाला निघावं असे वाटणारे .. Happy

सशल, तो बाहेरुनच काढलेला फोटो आहे. बाहेरुनच सर्व मुर्ती दिसते. (मागची मोकळी बाजू पण दिसतेय.)

हे आहे म्हापश्यातील रुद्रसंस्थान. म्हापसा सर्कलच्या बाजूलाच आहे. हि रोषणाई खास सरकारतर्फे केली आहे. रुद्राची मुर्ती व आतील सजावटही देखणी आहे.

maharudra.jpg

सशल |-)

हे आहे नागेश्वराचे देऊळ. अर्थात गोव्यातीलच. पणजीहून फोंड्याला जाताना, महालसा देवळाच्या जवळच हे आहे. टॅक्सीवाला जाणकार असेल, तर आवर्जून इथे नेतो.

nageshwar.jpg

सॅम, वाटच बघत होतो.

हे आहे उत्तर गोव्यातील सप्तकोटीश्वर, (गोव्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन ठळक भाग आहेत, ते वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या राजकीय अंमलाखाली होते. भाषेत किंचीत फरक आहे.) हे देऊळ जरा रस्त्याच्या खाली आहे. आडबाजूला आहे, पण प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून भेट द्यावे असे हे देऊळ आहे, कारण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी, या देवळाला भेट दिली होती...

saptakoTeeshwar.jpg

मथुरा

mathura.jpg

हे व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) चे स्तिफन्सडोम,
दुसर्‍या महायुद्धात बर्‍याच स्मारकांची पडझड झाली होती. याची पुनर्बांधणी अजुनही चाहू आहे.

न्यूयॉर्कमधलं एक चर्च. ख्रिस्मसच्या सुमाराला सूर्यास्तानंतर 5th Avenue वर फिरायला मजा येते. गणपती-दिवाळीला आपल्याकडचे बाजाराचे रस्ते कसे रोषणाईने आणि गर्दीने फुलून येतात, त्याची आठवण होते.
गेल्या वर्षी असेच तिथे फिरत असतांना चर्चच्या मागे पौर्णिमेचा चंद्र दिसला म्हणून पटकन आयफोनने काढलेला फोटो.

church.jpg

पॉम्पेइ (इटाली) येथिल अपोलोचे मंदिर...
साधारण दोन हजार वर्षांपुर्वी हे शहर जवळील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राख आणि दगडात बुजून गेले. १५९९ साली अचानक याचा शोध लागला.

हे आहे मळे येथील मारुतीचे देऊळ. (मये नाही, मयेंला मोठे तळे आहे ) हे पणजीपासून जवळच आहे आणि पणजीहून दिसतेही. रात्री उत्तम रोषणाई असते. जरा उंचावर आहे, पण देवळाचा परिसर उत्तम आहे.

maLe maruti.jpg

हे पिसाचे कॅथेड्रल. (मागे पिसाचा कललेला मनोरा)
असं म्हणतात की इथे तरुण गॅलिलिओ एकदा प्रार्थनेला आला असताना त्याने झुंबर हलताना बघितले. आपल्या नाडीचे ठोके वापरून त्याने हे निरिक्षण केलं की "it's period of oscillation is independent of its amplitude"... पुढे त्याने लंबकाबरोबर बरेच प्रयोग करून पहिले लंबकाचे घड्याळ तयार केले.

स्वाती, अमृता धन्यवाद! दिनेशदांकडुन प्रेरणा घेऊन जागेच्या नावाबरोबर थोडी माहिती पण लिहिली.
दिनेशदा... संपले का फोटो?
हे फ्लोरेन्स (इटली) चे चर्च

सॅम, दिनेशदा छान फोटो व माहिती. कोकण अजुनही पाहिलेले नाहिये... फार फार इच्छा होत आहे तिथे भेट द्यायची आता Happy

सॅम - तुमचे सगळेच फोटो खूप छान आहेत.

हे अटलांटाचे BAPS मंदिर. संपूर्ण मंदिर संगमरवरी आहे आणि अविश्वसनिय सुंदर कोरीव काम आहे. संपूर्ण काम भारतात करवून इथे जिगसॉ पझल सारखे जुळवले गेले.

Atlanta_Temple.jpg

Pages