टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र.६ - रोझा

Submitted by संयोजक on 16 September, 2010 - 13:37

TT_Roza_aai-b1.jpg
दहा पंधरा वर्ष वेगवेगळ्या प्रसंगाच्या आठवणींसाठी म्हणुन बाटल्या ठेवल्या. त्या माळ्यावर साठविल्या होत्या. नंतर नविन बंगला बाधल्यावर कंपाउंडच्या भिंतीवर लावण्यासाठी त्या सर्व नेल्या. पण त्याआधिच भिंतीचे प्लॆस्टर झाले होते, त्यामुळे त्या तशाच खालच्या कपाटात राहिल्या. भंगारवाल्याच्या एक रुपयाला एक बाटली देण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता.
TT_Roza_aai-b4.jpg
एक दिवस रिकाम्यावेळी मनात आलं बाटली रंगवावी, सहज म्हणुन त्यातल्या ३ बाटल्या गरम पाण्यात भिजत घातल्या. त्यावरचे कागद काढले. कोरड्या केल्या. नंतर पांढरा अ‍ॅक्रेलीक रंग बाटलीला दिला. एखाद्या कागदावर नक्षी काढावी त्याप्रमाणे बाटलीवर डायरेक्ट ब्रशने निळ्यारंगाचे डिझाईन काढले. ब्लू पॉटरी प्रमाणे ती बाटली दिसायला लागली. त्याच निळ्या रंगात तिनही बाटल्या रंगविल्या. त्यांचा एक छान ग्रुप तयार झाला. पांढर्‍या निळ्या खोलीत ठेवल्यावर त्या अधिकच खुलल्या. तेव्हापासुन माझा रोजचाच उद्योग झाला.
TT_Roza_aai-b2.jpg
फक्त अ‍ॅक्रेलिक रंग व ब्रश एव्हड्याच साहित्यात या बाटल्या रंगतात. कधी त्याच्यावर आरश्याचे तुकडे चिटकविले, कधी टिकल्यांनी, जयपुरी स्टोनने डिझाईन केले. अ‍ॅक्रेलिक रंग हे धुता येतात, झटपट वाळतात व काचेवर चांगले बसतात. कोणीही हे काम करु शकतं. मेमेंटो म्हणुन देता येतात. थोडीशी कल्पनाशक्ती, थोडे रंग व रिकामी बाटली. अगदी सॉसची सुद्धा चालेल. स्वयंपाक घरात ठेवण्यासाठी तुम्ही तिच्यावर फळा, भाजी चे चित्र काढु शकता. करुन पहा. माझे तर फारच कौतुक झाले, तुमचेही होईल.
TT_Roza_aai-b3.jpg

तळतिप: (माझी मुलगी वर्षा नायर हिने मला ह्या स्पर्धेमधे मी भाग घेण्यासाठी खुप आग्रह केला, व तिनेच माझ्यासाठी त्यामुळे मायबोलीचा आयडीदेखिल घेतला.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच आहेत. Happy काळ्या - पांढर्‍या आणि मनीप्लँटवाली विशेष आवडली. ते पान अगदी खरं वाटतंय.

मला सर्वच आवडल्या. थेट बाटल्यांवर रंगवलेय, हे खासच.
इजिप्त मधे वेगळ्या प्रकारे सजवलेल्या बाटल्या मिळतात. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाची रेती वापरतात. बाटलीच्या आत रेती भरतात. आणि वरून एका काडीने, ती बाटलीच्या कडेला अशी काय बसवतात, कि त्याचे चित्रच तयार होते. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्यातली कला कळत नाही. या बाटल्या बघून त्यांची आठवण आली.

काय एकेक कलाकार आहेत मायबोलीवर.
सगळ्याच बाटल्या सुंदर.मलाही काळ्या पांढर्‍या सगळ्यात जास्त आवडल्या.
ते मनीप्लँट मलाही खरंच वाटलं. Uhoh

सुंदर Happy ज्यांना ह्या बाटल्या भेट म्हणून मिळतील ते किती lucky ! ( माझी चित्रकला अगाध असल्याने स्वतः रंगवणे अशक्य आहे. )
मनीप्लँट, फुलांच्या सगळ्याच, घुंघट घेतलेली बाई ह्या विशेष आवडल्या Happy

वा काय मस्त आहे आयडीया. खुपच सुंदर दिसताहेत. त्या काळ्या पांढर्‍या तर अप्रतिम.
आता बाटल्या शोधेनच करायला.

Pages