किलबिल : रेन शेकर - जुई भावे

Submitted by संयोजक on 15 September, 2010 - 22:46
रेन शेकर

मायबोली आयडी : अमृता
नाव : जुई भावे
वय : ८ वर्षे


उन्हाळ्यात पावसाचा आवाज ऐकावासा वाटतोय?? स्वतःच्या म्युझिकवर नाचावसं वाटतय? बनवा रेन शेकर. :).

वापरलेले साहित्य : पेपर रोल संपल्यावर उरलेली गोल नळकांडी, इथुन तिथुन जमवलेली डेकोरेशन सामग्री, रंग, अल्युमिनीयम फॉईल.
१) सर्वप्रथम नळकांडीला आपल्याला आवडेल तो रंग द्यावा. त्यावर आवडेल ते डिझाईन काढावं.
२) अ‍ॅल्युमिनीयम फॉईलचे साधारण ४ इंच व्यासाचे ६ गोल कापावेत.
३) नळकांडीच्या एका टोकाला ३ फॉईलचे गोल एकत्र करुन लावावेत.
४) नळकांडीच्या दुसर्‍या टोकातुन मुठभर तांदुळ आत टाकावेत.
५) ते टोकही ३ फॉईलचे गोल एकत्र करुन बंद करुन टाकावे.


रेन शेकर तयार :) आता शेक करा आणि नाचा.

Kilbil_JuiBhave_RainShaker.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

धन्यवाद दोस्तांनो.
प्राची Proud
विडिओ ऑडीओ मधे कनवर्ट केल्याबद्दल मिनीला स्पेशल शाबासकी आणि धन्यवाद. Happy

Pages