एक्झिक्युटिव्ह मॅचमेकिंग - भाग १ : मंजूडी

Submitted by संयोजक on 28 August, 2010 - 23:07

2010_MB_Ganesha3_small.jpg

मितुल शाह चिडला होता, रागावला होता, संतापला होता, कोपला होता.

मी त्याच्याकडे पोचवलेल्या त्या दुष्ट बातमीचे परिणाम एवढे भयानक होतील ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी केबीनमध्ये असतानाच त्याची रागारागाने असंबद्ध बडबड चालू झाली होती. रागाचा रोख माझ्यावर नाहीये हे कळल्यावर माझ्या जरा जीवात जीव आला. पण ती बडबड हिंस्त्र झाल्यावर मात्र माझ्या बालमनावर विपरीत परीणाम होऊ नयेत म्हणून मी हळूच केबीनबाहेर सटकले आणि आता जागेवर बसून केबिनमधली सर्कस पाहत होते.

असले भन्नाट घोळ झाले होते ना... स्टॅम्प ड्युटीचं पेमेन्ट अर्जन्ट आहे, दोन दिवसात झालंच पाहिजे नाहीतर पेनल्टी बसेल अशी आज्ञा वरून येऊन एक आठवडा झाला होता. पेमेन्ट अर्जन्ट असण्याची कारणं शोधण्यात द ग्रेट मितुल शाहने दोन दिवस घालवले. तोपर्यंत आम्ही अगदी शहाण्या मुलासारखं काम करून पेमेन्ट स्लॅब्स कोणी सांगायच्या आधीच तयार ठेवल्या तर वर्किंग राँग आहे, स्लॅब्स बदलल्यात, री-वर्किंग करा अशी आज्ञा लायजनिंग डिपार्टमेन्टकडून झाली. त्यात आणखी दोन दिवस गेले. खरं म्हणजे स्लॅब्स लायजनिंग डिपार्टमेन्टनेच द्यायच्या आणि आम्ही फक्त पेमेन्ट प्रोसेस करायचं असा शिरस्ता... पण 'माकड म्हणे......' ह्या स्वभावापायी ते काम आमच्या साहेबावर आणि पर्यायाने आमच्यावर येऊन आदळलेलं....

नव्या नियमाप्रमाणे स्लॅब्स करून पेमेन्ट प्रोसेस करून ते अप्रूव्ह होऊन चेक तयार करून झाला, त्यावर पहिली सही झाली आणि एक दुष्ट बातमी आम्हाला मिळाली की दुसरी सही करणारा केतन पारेख पंधरा दिवस सुट्टीवर आहे... बोंबला!!

पेनल्टी काही साधीसुधी नव्हती... रुपये १,६८,५४०/- निव्वळ पेनल्टीपोटी भरायचे, थोडक्यात, फुकट घालवायचे हे मितुल शाहच्या चांगलंच अंगाशी येणार होतं.

सिग्नेटरीजनी आमच्या परवानगीने सुट्टीवर जावं असं मितुल शाहचं म्हणणं.. आणि प्रत्येक सिग्नेटरीच्या अ‍ॅव्हेलेबिलिटीची खबर ठेवणं ही मितुल शाहची जबाबदारी आहे असं मॅनेजमेन्टचं म्हणणं... खुदा बचाये मितुल शाहको!

मितुल शाह भन्नाट हातवारे करत केबिनमध्ये फेर्‍या मारत होता. फोनचा रिसीव्हर उगाचच उचलून आपटत होता. एकदा तर की-बोर्ड पण धरून आपटला. त्याच्या एकूण हालचालीकडे पाहता हा आता थोड्याच वेळात अंगात आल्यावर घुमतात तसा घुमायला लागेल अशी भिती मला वाटू लागली असतानाच माझ्या डेस्कवरचा फोन वाजला. कॉलर आयडीवर रितूचा नंबर... तिलाही ही सगळी सर्कस दिसतच असणार....

"जल्दी से जल्दी कॅन्टीन में चली आ.."

आँ!! सुकूर??

मी उभं राहून रितूच्या क्युबिकलकडे पाहिलं तर सुकूर, अ‍ॅन्डी, दिव्या, योगेश ही सगळी माकडं रितूच्या टेबलवर बसलेली होती.

"अरे घोड्यांनो, तुम्हाला टेबलवर बसलेलं मितुलने पाहिलं तर हाकलून लावेल तुम्हाला.."

ही सगळी मुलं ट्रेनी म्हणून जॉईन झालेली... कसलंच गांभीर्य म्हणून नाही.

"छोड यार, उसको अभी केतन के सिवा कोई नही दिख रहा है, तू अभी नीचे चल, एक बात करनी है"

"सुकूर..."

"अरे सेकंड सिग्नेटरी छुट्टी पे है तो तू उसको आसमाँन से पैदा करेगी क्या? चल नीचे.."

मी आपली मितुल शाहची लॉयल असिस्टन्ट असल्याच्या थाटात, 'सर, मैं जरा नीचे जाके आती हूं" असं सांगून निघाले.

हो, आपण पापभिरू माणसं... फट् म्हणता ब्रम्हहत्या नको.

"ये योगेश को एक लडकी अच्छी लगती है, उसकी इन्फो निकालनी है..."

पुढ्यातली मॅगी जमेल तशी काट्याने आणि उरलेली हाताने तोंडात सारत अ‍ॅन्डी बोलला.

"वो 'C' ब्लॉक के कॅन्टीनमें दिखती है हमेशा.."

"ये सुकूर हर कॅन्टीनमें आनेवाली हर लडकी की खबर रखता है.."

"चूप बैठ दिव्या... ऐसा कुछ नही. एक दिन योगेशनेही मुझे दिखाया था.."

"और तुम दोनों हमें टांग देके उधर कभी गये थे?"

"वो......वो पराठा खाना था हमें, जो तुम्हें अच्छा नही लगता"

सुकूर आणि दिव्याची जुंपली होती. मी आणि रितू इमानेइतबारे श्रोत्याची भूमिका बजावत होतो.

आणि हे सगळं बोलणं ज्यांच्यासाठी चालू होतं ते योगेशमहाराज आपलं सँडविच संपवून बोलते झाले,

"फोटो है उसका मेरे पास.... मोबाईल से लिया है मैने"

आँ????????

"चार दिन पहले उसको फॉलो भी किया था| वह 'C' ब्लॉकमें सेक्रेटरियल डिपार्टमेंट में घुस गयी.. मै वह मेहतासर की डिपार्टमेंटमें एक लडकेकी पहचान निकालकर दो बार घूम आया लेकिन उस दिन के बाद वह मुझे दिखी ही नही|"

अरे बापरे!! हे म्हणजे फारच रुतलेलं प्रकरण दिसत होतं... पण एकतर्फीच!!

"फोटो दिखा बे... "

"हां, ये देखो... "

सगळे अक्षरशः त्या मोबाईलवर तुटून पडले.

सगळ्यांच्या हातातून फिरत फिरत मोबाईल माझ्याकडे आला तेव्हा स्क्रिनवरचा फोटो पाहून मी भडकलेच...

"कोई दुसरा मिला नही क्या सुबहसे? एक तो मेरे बॉस पे इतनी बडी नौबत आयी है और तुम लोगोंको भी आजही ये मजाक सूझ रहा है..."

"क्या हुवा? क्यूं इतना घुस्सा होती हो?"

"घुस्सा होती हो मतलब... यह बिल्ली का फोटो दिखाने के लिये कॅन्टीनमें लेके आये क्या मुझे?"

"बिल्ली? कौनसी बिल्ली?"

"ये बिल्लीकी इन्फो निकालनी है क्या? ऐसी कोई बिल्ली नही है अपने ऑफिसमें... " हातातला मोबाईल अ‍ॅंडीच्या नाकावर धरत मी किंचाळले.

"बिल्ली?"

"कौनसी बिल्ली?"

"योगेश, उसकी कॅटआईज है क्या?"

"अरे बाबा, वह फोटो स्क्रोल हो गया रहेगा.. मोबाईलमें मेरे घर के भी फोटोग्राफ्स है.. स्क्रोल करके देख तो सही..."

त्या टचस्क्रिन मोबाईलवर मी बोटं फिरवली... चार-पाच फोटो लागोपाठ हलले आणि काहीतरी झालं... मी कुठल्या प्रश्नावर 'येस' दाबलं मला कळलंच नाही..

"कुछ तो हुआ, कोई देखो तो.."

सुकूरने मोबाईल हातात घेतला आणि माझ्यावर दयार्द्र नजर टाकून म्हणाला, "लगता है फोटो डिलीट हो गये|"

हाय रे दैवा!!

माझ्या तोंडावर अपराधी भाव, शंभर सशांची व्याकुळता वगैरे... बाकी सगळे स्टॅच्यू पोझमध्ये आणि योगेशचा राजेश खन्ना झालेला...

NOKIA शिवाय दुसरी कुठली कंपनी मला झेपत नाही हेच खरं..

"अरे यार, कल तेरे हॅंडसेट का बॅक-अप हमने लिया था वह नया सॉफ्टवेअर यूज करके... तेरे कॉम्प पे रहेंगे सारे फोटो.. मेल में अ‍ॅटॅच करके फॉरवर्ड कर सबको"

माझी सख्खी मैत्रिण रितू माझ्या मदतीला धावून आली.

माझ्या तोंडावर कृतज्ञता ओतप्रोत भरलेली... बाकी सगळे सैलावलेले आणि योगेशचा पुन्हा जुगल हन्सराज झालेला..

क्युबिकलमध्ये पाऊल टाकतेय तोच बॉसचा मेसेज कॉम्पवर... socho, kuchh to socho

आता काय डोंबल सोचायचं... कधीचे सांगतोय आम्ही दोनच नकोत, चार तरी सिग्नेटरीज् हवेत... पण ज्युनिअर्सची सजेशन्स सरळ सरळ शिफ्ट+डिलीटच करायची असतात.. मी आपला ok sir चा रीप्लाय देऊन टाकला.

तेवढ्यात एक नविन इ-मेलचं नोटिफिकेशन आलं.

मेलबॉक्सवर क्लिक करेपर्यंत स्क्रिनवर बॉसचा अजून एक मेसेज... we'd aviod penalty...

अर्रे!! माझी सही चालेल का चेकवर? तर करते बापडी..

we can't make pmt from any other a/c असा रीप्लाय दिला... वैतागेल आता.. पण मी तरी काय करू?

तोपर्यंत दुसरा मेसेज बॉक्स ब्लिंक व्हायला लागला : photo dekha kya?

लागोपाठ पहिला मेसेज बॉक्स स्क्रिनवर : good idea!! try to convience SKP for inter company transfer

दुसरा मेसेज बॉक्स : are dekh to sahee

मी : How can I?

कुठलातरी मेसेज बॉक्स : pls reply

कुठलातरी मेसेज बॉक्स : don't u have eyes?

कुठलातरी मेसेज बॉक्स : no reply from u

अरे ह्हो!! श्वास घ्यायला तरी वेळ द्या.. टाईप करण्यासाठी केवळ 'हात' या अवयवाचाच उपयोग होऊ शकतो....

जरा दोन घोट पाणी पिऊन शांतपणे सगळे मेसेज बॉक्स पाहिले.. नेहमीप्रमाणेच गोंधळ झालेला.. बॉसच्या मेसेजचा रीप्लाय सुकूरला दिला गेलेला आणि बॉस बोंबलतोय रीप्लाय दे, रीप्लाय दे...

I can speak to SKP's secy..not SKP directly

असा मेसेज पाठवून दिला जेणेकरून बॉसचा आत्मा शांत व्हावा...

मेलबॉक्स उघडला.. बॉसने मला cc करून SKP च्या Secy ला मेल पाठवून ठेवलेला. नशीब!!

तिला फोन केला तर तिचा फोन बिझी आणि नंतर व्हॉईसमेलवर रीप्लाय 'SKP is not in town my dear'...

छान!सुंदर!!अत्युत्तम!!!

आज एकेक दुष्ट बातम्या पोचवायचं काम माझ्या राशीत लिहिलं होतं बहुतेक....

I m busy ..will c photo later असा मेसेज सुकूरला पाठवून दिला.

बॉसच्या केबिनमध्ये जाऊन पुन्हा एकदा दुष्ट बातमी देण्याचं कार्य पार पाडलं.

तो एकदम ब्लँक होऊन बघत राहिला माझ्याकडे.. सुन्न!!

"एक काम करते है, सेक्रेटरीयल में बोलके सिग्नेटरीज् ही चेंज कर डालते है| एक साईन आप करो और एक साईन मैं करूंगा|"

"सर???"

पेनल्टी भरण्याच्या दडपणापायी बॉसच्या लहान मेंदूवर अतिशय भार आलेला दिसत होता.

"अरे आपके उपर कोई जिम्मेदारी नही रहेगी| आप सिर्फ साईन करो... बाकी सब झेलने के लिये मै तैय्यार हूं| चाहो तो लिख के देता हूं|"

"लेकिन सर, ये कैसे.."

"कोई टेन्शन मत लो| ये सिग्नेटरीज साईन करते है तो उनको क्या मालूम रहता कौनसा पेमेंट है..... हम दोनों साईन करेंगे तो अ‍ॅट लिस्ट ब्लाईंड सिग्नेचर तो नही होगा ना...|"

"सर, वह सब ठीक है| लेकिन यह चेक पर तो केतन सर का सिग्नेचरही लेना पडेगा|"

"वही तो मैं बोल रहा हूं आपको की सिग्नेटरीज बदल डालते है, काम हो जायेगा अपना|"

"सर, वह सिग्नेटरीज बदलने की प्रोसेस एक घंटे में तो पूरी नही होगी... कमसे कम सात दिन लगेंगे उसके लिये| तब तक तो स्टँप ड्युटी भरने की तारीख निकल जायेगी..."

अरे ह्याला कोणी बसवलं रे ह्या व्हाईस प्रेसिडेंटच्या जागेवर??

"हम्म्... कभी कभी आप मतलब की बात करती हो|"

घ्या!!! आता यावर काय बोलणार कप्पाळ?

"वो इंटर कंपनी ट्रान्स्फर के लिये क्या प्रॉब्लेम है?"

"सर, SKP is not in town ये लविनाका मेसेज मैंने अभी दो मिनीट पहले आपको दिया|"

मी मनातल्या मनात आकडे मोजणी सुरू केली. नाहीतर मलाच आकडी यायची पाळी आली असती.

"साले सब डायरेक्टर साथ में व्हेकेशन पे जाते है क्या?"

"........"

"?????"

"सर, केतन पारेख भी out of town है क्या? छुट्टी पें होके भी अगर इधरही रहेंगे तो किसी को भेजके उनका साईन ले सकते है क्या?"

"अरे येस्...ये बात अ‍ॅक्च्युअली मेरे दिमाग में आई थी लेकिन आपके वो इंटर कंपनी ट्रान्स्फर के झमेले में मै भूल गया|"

येssक देऊ का लगावून??....... श्या!! मराठीत आकडे मोजून झाले... इंग्लिशमध्ये, हिंदीमध्येही मोजून झाले.... माचूपिचूंची भाषा यायला हवी होती, चांगलं तोंडसुख घेता आलं असतं.

"I will speak to Ketan Parekh's secretary, meantime you try to use your resources"

बॉस इंग्रजीत बोलतो तेव्हा सिरीयसली कामाला लागतो.

"My resources means?"

"अरे आपका नेटवर्क बहुत स्ट्राँग है ना...जरा पता करनेकी कोशिश करो| अ‍ॅटलिस्ट इतना तो करो..."

संताप, अवहेलना आणि चरफडाट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मी बाहेर येऊन रागारागाने क्यूबमधली सगळी बटणं बंद करून टाकली. माझ्या डोक्यावरचे दिवे, कॉम्प्युटर, सीपीयू, फॅक्स मशीन सगळंच बंद झालं. मी असंच करते बर्‍याचदा राग आला की... असतील नसतील ती सगळी बटणं बंद करून टाकायची. सारं कसं शांत शांत!!

"प्रिंटर बंद किया क्या... मेरा अ‍ॅग्रिमेंट प्रिंट हो रहा था एटी पेजेस का..." माझ्या शेजारचं क्यूब जोरात किंचाळलं.

"चालू किया है अब...वापस देना प्रिंट" माझा थंड आवाज ऐकून निमूटपणे परत कामाला लागलं.

दहा मिनीटांनी कॉम्प परत चालू करून मेल-बॉक्स उघडला. सुकूरची मेल ओपन करून अ‍ॅटॅचमेंट उघडली आणि स्क्रिन भरून एका सुंदर मुलीचा ब्लर झालेला फोटो!! फोटो क्लिअर नव्हता पण तिचे शार्प फिचर्स नजरेत भरत होते.

"अरे ये तो रुची है!!"

मी दचकून मागे वळून पाहिलं तर बॉस!! क्यूबमधला काळोख पाहून मला केबिनमध्ये बोलवायचं धारिष्ट्य झालं नव्हतं बहुतेक त्याचं..

"ये है मिस रुची केतन पारेख... मैने आपको केतन पारेख की अ‍ॅव्हेलेबिलिटी देखने के लिये कहा, तो आपने उनकी फॅमिली डिटेल्सही निकाली क्या?"

संताप आणि अवहेलनेची जागा आता आश्चर्य, अनपेक्षित जिव्हाळा, कौतुक, उत्सुकता ह्यांनी घेतली. पण जोडीला चरफडाटही दुर्दैवाने होताच..

"सर, ये केतन पारेख की लडकी है? ये तो अपने ऑफिसमें है.."

"हां हां.. अपनेही ऑफिसमें है मेहता के डिपार्टमेंटमें ट्रेनी करके..."

'C' ब्लॉक, सेक्रेटरीयल डिपार्टमेंट, मेहतांचं डिपार्टमेंट.... तुकडे जुळले की जिगसॉ पझलचे!!

"अच्छा, देखो मैने पता करवाया है....केतन पारेख घर पर ही है| उनकी सिग्नेचर हो सकती है..उनकी सेक्रेटरी उनसे बात करनेवाली है, आप उनसे अ‍ॅड्रेस लेके सिग्नेचर लेके आना..."

"सर, मैं? मै सिग्नेचर लेने के लिये जाऊं??" शेजारणीसारखं मला किंचाळायला का येत नाही??????

"अपना काम है भई... अपनेकोही करना पडेगा"

पुढच्या पंधराच मिनीटात माझी वरात निघाली सही घेण्यासाठी.. बॉसने त्याचा रथ आणि चक्रधर उदार मनाने देऊ केले त्यामुळे मित्रपक्षास वर्दी न देताच आम्हांस प्रस्थान ठेवावे लागले.

गाडीतच वेणीफणी उरकून घेतली. डायरेक्टरच्या घरी जायचं होतं... कॉर्पोरेट लूक दिसायला हवा आपला!!

चक्रधराला असल्या चक्रमपणाची सवय असणारंच..

डायरेक्टर साहेबांचं घर देखणंच.. पाय रुतणारी कार्पेटं, दिवसाही लावलेले पिवळे मंद दिवे, डौलदार पडदे, भिंतींवर अगम्य चित्रं, ह्या भिंतीवरच्या चित्रावर त्या भिंतीवरून आणि त्या भिंतीवरच्या चित्रावर पाचव्याच भिंतीवरून प्रकाश सोडणारे दिवे, न दिसणार्‍या एसीची थंडगार हवा, आमच्या घराच्या किंमतींएवढी किंमत असणारे सोफे, बैठका, सेंटर टेबल, कॉर्नर टेबल इत्यादी इत्यादी...

मला सोफ्यावर बसायला सांगून नोकर कुठेतरी आत गुल झाला.

"हाय!! आप योगेश मेहता की डिपार्टमेंटमें हो ना?"

देहापेक्षाही वरताण नाजूक आवाजात माझ्यामागून कोणीतरी किणकिणलं.

मी मागे वळून पाहिलं तर रुची!! थोडीफार कल्पना नशीबाने आधीच मिळाली होती त्यामुळे मला अगदी नाजूकसाच धक्का बसला.

"हॅलो!!" मी गोड हसून अदबीने परतफेड केली. डायरेक्टरची मुलगी... वयाने लहान असली तरी मैत्रीखात्यातलं 'हाय!' तिला कसं म्हणणार?

"आप... आप योगेश की डिपार्टमेंटमें हो ना?"

तिने टाकलेल्या 'दूसरा'ने मी पाsssर गांगरून गेले. तिच्या नाजूक आवाजात आणि दिसण्यात विरघळून गेल्याने माझ्या मेंदूने तिच्या पहिल्या प्रश्नाचा चक्क अनुल्लेख केला होता.

"आप... जानती हो उसको?"

"जानती तो नही.. मालूम है| वह CS रँकर है ना? मुझे दो साल सिनियर है|"

अरे देवा!! योगेश हिची इन्फो काढतोय, ही बया त्याची कुंडली काढून मोकळी...

तेवढ्यात त्यांचा नोकर पाणी घेऊन आला.... आलेल्याला पंधरा मिनीटं बसवून ठेवल्यावर मग पाणी का आणतात बड्या लोकांकडे कोण जाणे.. मी उगीचच पाहिलं, ट्रे, ग्लास काही उंची वगैरे नव्हता. उंची ग्लासातून वेगळंच द्रव्य भरतात ते सोडा, म्हणजे राहू द्या, सोडा असतोच त्यात... पण मी साधी एक्झिक्युटिव्ह.. माझ्यासाठी उंची ट्रेमधून पाण्याचा ग्लास आणायला मी कोण लागून गेले होते?

"मैं अ‍ॅक्च्युअली चेक पर सिग्नेचर लेने के लिए आई थी|"

तिने हिंदीतून सुरूवात केली होती बोलायला, म्हणून आपली मी पण..

"हां, मालूम है... हर्षा मॅडम का फोन आया था| योगेश अभी MBA कर रहा है ना?"

अरे वा!! वडिलांच्या सेक्रेटरीला मॅडम म्हणतेय.. वळण चांगलं दिसतंय.

"योगेश MBA करनेवाला था.. लेकिन अभी LLM करने की सोच रहा है|"

"ओह गॉड!! फायनान्स फिल्ड छोडेगा क्या? वह इधर अकेलाही रहता है क्या?"

चांगल्या वळणावर डेड एन्ड!!!

"हां.. यहां पर अकेलाही रहता है.. उसके मम्मी-डॅडी तो अहमदाबाद में है, उनका वहाँ पर मशीनोंका बडा कारोबार है|"

"मालूम है, योगेश यहाँ पर सिर्फ एक्सपिरिअन्स के लिए आया है| दो-चार साल बाद अहमदाबादमें ही वापस जायेगा| मेरी बडी सिस्टर अभी वही पे तो है|"

योगेश नक्की कोणाच्या ओळखीचा? पहिल्या दोन वाक्यांचा तिसर्‍या वाक्याशी संबंध काय? हे मला कसले सिग्नल्स मिळताहेत?

तेवढ्यात अगदी घरगुती वेषात डायरेक्टरसाहेब अवतीर्ण झाले म्हणून मला माझं रडार बंद करावं लागलं.

क्रमशः......

एक्झिक्युटीव्ह मॅचमेकींग - भाग २

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहेस, एकदम खुसखुशीत Happy भाग २ ची वाट पहातेय Happy

नशीब, आपलेआपणच सिग्नेटरीज बदलले नाहीत त्यांनी सेक्रेटेरियलचा अनुल्लेख करून! Wink Biggrin

शॉल्लीड लिहिलेत मॅडम..... दोन प्रवाह मस्त जाताहेत समांतर.... Happy

वाचताना आपलेच हाफिस येत होते डोळ्यासमोर.... हे असले प्रॉब्लेम्स आपल्या हाफिसात सगळीकडे येतात... इथे सिग्नेटरीजचा इश्यु, आम्च्याकडे ऑथोरायजेशनचा.. बिच्चा-या गरीब जंतेला एका ऑथोरायजेशनसाठी दिवस दिवस रखडावे लागते, काम असते एका मिनिटाचे पण...... Happy

इंद्रा तु कशाला उसासतोय्स??? Proud

Happy छान