किलबिल - लेगो गणेश

Submitted by पन्ना on 11 September, 2010 - 16:30

लेगो गणेश

नाव : हर्ष
वय : साडेनऊ वर्षे
माध्यम : लेगो ब्लॉक्स
मदत : मॉडेल म्हणून गणपतीचा फोटो शोधून देणे.

आज सकाळी मायबोली गणेशोत्सवाबद्दल घरी सांगत होते तेव्हा त्याला एकदम मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात दिलेल्या चित्राची आठवण झाली. ह्या वर्षी चित्राऐवजी दुसरं काहीतरी म्हणून मग लेगोचा गणपती करायचा ठरवला. आणि अवघ्या १/२ तासात हा बाप्पा तयार झाला Happy

IMG_2838_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

अरे,
मी आत्ता पाहतेय हे.
मला आधी लेगो म्हणजे काय माहीतच नव्हते. फोटो बघून कळले. Happy

हर्षचे कौतुक करावे तितके थोडेच. आरतीच्या पुस्तकावरचे नुसते चित्र पाहून अशी creativity दाखवणे म्हणजे खरंच कमाल आहे. Happy

लहान मुलांचे डोके कसले सुपीक असते नै!!

मला पण सुळे कुठले लावलेत असा प्रश्न पडला होता फोटो पाहिल्या पाहिल्या. शार्कचे सुळे लावलेत हे वाचून हर्षच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावीशी वाटते. :शाबासकी:

Very Creative. डिटेलींग पण जबरी केलय. सोन्डेवर लाल ठिपके, गळ्यात जानवं, रत्नखचीत मुकूट.... मस्त! Happy
पन्ना लेगोच्या साईटवर पाठवून दे हा फोटो.

Pages