गण गण गणात गणपती - अनादी तू अनंत तू (गणेश स्तवन)- योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:00
2010_MB_Ganesha3_small.jpg

'गण गण गणात गणपती' हा श्री गणरायांवरील संगीत अल्बम निव्वळ २१ दिवसात शब्द, सूर, गीत, संगीत, रेकॉर्डींगसकट पूर्ण झाला हा एक चमत्कार म्हणावा लागेल. गणरायाची कृपा अन खुद्द श्रींचीच इच्छा असल्याने हे काम पूर्णत्वास गेले असे मी मानतो. गणरायाच्या चरणी ही सेवा अर्पण करताना अत्यानंद होत आहे. गणरायाचे आशीर्वाद अन आपणां सर्वांच्या शुभेच्छा अशाच सतत आमच्या पाठीशी राहतील अशी आशा करतो. याव्यतिरिक्त माझी पत्नी सारीका व आमची छकुली दीया यांच्या मदतीमुळे व पाठींब्यामुळे हे काम यशस्वीरित्या पार पडले हे नमूद करू इच्छितो.

पंडीत शौनक अभिषेकी यांच्या शुभहस्ते ९ सप्टेंबर रोजी ठाणे येथे या अल्बम चे यथोचित प्रकाशन झाल्यावर मायबोलीच्या गणेशोत्सवात या अल्बममधील सर्व गीते देताना मला अधिक आनंद होत आहे. गणरायावर रचलेली स्तवने, वंदना, पोवाडा, भजन, गजर, निरोप गीते ई. रचना सर्व मायबोलीकरांच्या पसंतीस उतरतील अशी आशा करतो. निव्वळ भक्तीगीत म्हणून मर्यादित न ठेवता लोकगीत, भावगीत, अशा वेगवेगळ्या अंगाने श्री गजाननावर ही गीते रचली आहेत. यात मायबोलीकर जयवी (जयश्री अंबासकर) व पेशवा (जयवंत) यांची दोन गीते समाविष्ट आहेत.

गीत १ : अनादी तू अनंत तू (गणेश स्तवन)
गीत, संगीत : योग
गायक : योग, सारीका व समूह


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद!
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रीयेची आम्ही वाट पहात आहोत.
(तांत्रिक कारणांमूळे हेडफोन किंव्वा स्पिकर्स वरून गाणी अधिक चांगल्या प्रकारे ऐकू येतात असे माझ्या लक्षात आले. शिवाय ऊर्वरीत गीते खास गणपतीच्या ऊत्सवासाठी असल्याने रेकॉर्डींग आणि ईतर तांत्रिक कामही मोठ्या सिस्टीम वर लावायच्या दृष्टीने केले आहे.)

बाप्पा मोरया रे!

मस्त झालंय रे स्तवन. अभिनंदन तुम्हा दोघांचं Happy छोट्या उस्तादांच्या आवाजातपण एखाद बाप्पाचं गीत ऐकवं आता Happy

संगीत , स्वर, अध्यात्म शब्दांची अतूलनीय भेट आहे हि... खरोखर... त्या श्री गणेशाची अपरंपार अगाध अशी लिला तुमच्यावर राहुदेत हिच श्री चरणी प्रार्थना.

मस्तच!! सकाळी सकाळी स्तवन ऐकून खूपच प्रसन्न वाटले! Happy

निव्वळ २१ दिवसात शब्द, सूर, गीत, संगीत, रेकॉर्डींगसकट पूर्ण झाला>> जबरी! योग आणि टीम, हार्दिक अभिनंदन! Happy

खुपच मस्त झालंय स्तवन.
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतंय. आवाज आणि संगीत खुपच गोड आहे.
योग आणि टिमचे मनापासुन हार्दिक अभिनंदन!!!!!

क्या बात है गुरु...सही !! मस्तच Happy
सारिकाचा आवाज एकदम खास ........जबरी रेंज आहे....फार फार गोड !!
इतक्या लवकर सगळं करणं म्हणजे सोपं काम नाहीये......ग्रेट !!
गणपती बाप्पा मोरया !!!!!!

गणेश स्तवन सुरेख झाले आहे. सर्व सबंधितांचे अभिनंदन! मायबोलीकरांना गणेशोत्सवानिमित्त सर्व गाणी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. पुढचे ऐकायची उत्सुकता आहे. Happy
मोरया!

सुरेख....स्वर. भाव्,शब्द्,संगीत गीत-संयोजन सगळं अप्रतिम आहे...

Pages