Submitted by मिल्या on 23 November, 2009 - 02:09
जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी
कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी
फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी
कळेल का तुला सखे, मिळे न प्रेम सारखे
घडेल का असे कधी, फुले वसंत नेहमी?
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?
नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी
अजून खेळ हा तुझा सुरूच खेळवायचा
तुझा... तुझाच डाव हा! तुझीच लागते रमी
रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मोसमी
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू म्हणा दिलीस जीवना हमी?
गुलमोहर:
शेअर करा
सारेच शेर खूप सुंदर.
सारेच शेर खूप सुंदर.
मस्त आहे. मनापासून आवडली.
मस्त आहे. मनापासून आवडली.
सगळे शेर आवडले .छान .
सगळे शेर आवडले .छान .
ह्म्म्म्म मिल्या सह्ही!
ह्म्म्म्म मिल्या सह्ही! इन्स्पीरेशन काये?
ह्या आधीची ही सह्हीच होती आय मीन आहे 
मॅड म्हणजे मॅड झालीये गजल,
मॅड म्हणजे मॅड झालीये गजल, मिल्या! जियो!
खळ्या, नकार आणि हमी तिन्ही आरपार आहेत...
त्यातही खळ्या... अगदीच आयहाय!
सिम्पली ग्रेट. मस्त.
सिम्पली ग्रेट. मस्त.
झकास रे !
झकास रे !
एक मस्तवाल गझल.... जियो
एक मस्तवाल गझल.... जियो बॉस... बहोत बढीया !!!
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांनाच भरपूर धन्यवाद पुन्हा एकदा
लय छान आहे..
लय छान आहे..
आयला ही वाचलीच नव्हती
आयला ही वाचलीच नव्हती मी..
सही रे मिल्या... सगळे शेर आवडले..
सुंदर आहे..
सुंदर आहे..
जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत
जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी>> मस्त रे...
आवडली.
आवडली.
वाह! नावापासून सगळीच.... खास.
वाह! नावापासून सगळीच.... खास.
मस्त गझल रे!!! चालीत बांध
मस्त गझल रे!!!
चालीत बांध आता आणि मृदु आवाजात रेकॉर्ड कर...
नखशिखांत आवडली... निवडक एक
नखशिखांत आवडली... निवडक एक शेर सांगणे कठीण...
ग्रेट, सुपर्ब, क्लास,
ग्रेट, सुपर्ब, क्लास, जबरदस्त....संपली विशेषणं
मस्त म्हणजे मस्तच!!!! शब्दच नाही...सगळे शेर एक से बढकर एक..
धन्यवाद परत एकदा चालीत बांध
धन्यवाद परत एकदा
चालीत बांध आता आणि मृदु आवाजात रेकॉर्ड कर... >>>

अमृते पुण्यात ये म्हणजे तुझ्या मृदु आवाजात रेकॉर्ड करू आपण
मस्त....
मस्त....
मिल्या, तुझ्या अप्रतिम गझलेला
मिल्या, तुझ्या अप्रतिम गझलेला माझी दाद. http://www.maayboli.com/node/12682
जियो मेरे यार. मस्त..
जियो मेरे यार. मस्त..
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
खास..! अप्रतिम गझल आह.
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
वाह !
प्रत्येक शेर आधीच्यापेक्षा
प्रत्येक शेर आधीच्यापेक्षा सुंदर वाटावा आणि पूर्ण गझल पुन्हा पुन्हा वाचावी अशी.
कुठे कुठे दाद देणार.
गझलेची बांधणीही खूप नीटस. कुठेही शब्दांची ओढाताण नाही कि जागा भरायला व्यर्थ शब्द घतलेले नाहीत.
वाहवा वाहवा
निवडक १० मधील माझी पहिली निवड
निवडक १० मधील माझी पहिली निवड
बातमी, खळ्या, अत्तरे.... हे ३
बातमी, खळ्या, अत्तरे.... हे ३ शेर अगदी खल्लास आहेत.... खुप आवडली गझल!
सहीये! ९३.५४६७८९ %
सहीये!
९३.५४६७८९ %
खूप आवडली! खुळ्या, कळ्या,
खूप आवडली!
खुळ्या, कळ्या, खळ्या!!!
सहजसुंदर, सत्यवाचक, ओघवती
सहजसुंदर, सत्यवाचक, ओघवती रचना. आवडली! खूपच आवडली!!
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू म्हणा दिलीस जीवना हमी? >> खरंय. पण, करार तरी कुठला म्हणायचा?
Pages