गण: आमच्या गणाला गणपती आले

Submitted by पाषाणभेद on 2 September, 2010 - 22:30

गण: आमच्या गणाला गणपती आले

आमच्या गणाला गणपती आले
वंदन करूनी मस्तक झुकले ||धृ||

रिद्धीसिद्धीचा स्वामी तू गणपती
शरण आलो आम्ही अल्पमती
कार्यारंभी दावूनी उपस्थीती
दयाबुद्धीने आम्हा पाहीले
आमच्या गणाला गणपती आले ||१||

कलाकारां होवोनी स्पुर्ती
जगावेगळी मिळण्या किर्ती
कला आगळी सादर करण्या
कलाकार सारे एकच झाले
आमच्या गणाला गणपती आले ||२||

सारी विघ्ने गेली सारूनी
संकटे सारी गेली हारूनी
पुढला अंक सुरू कराया
गणात नमन गणाला केले
आमच्या गणाला गणपती आले ||३||

०३/०९/२०१०

गुलमोहर: 

पाषाणभेद,
अहो थोडे दिवस थांबायचे ना! दरवर्षी मायबोली गणेशोत्सव होतो तिथे स्वरचित आरत्या विभाग असतो त्यासाठी हे चालेल.