Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 August, 2010 - 03:18
'' धर्म ''
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?
आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही
धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही
धर्म मार्तंडा पहावे वाकुनी तू
सांग तू केले कधी दुष्कर्म नाही ?
नग्न मी झालो जरी धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?
डॉ.कैलास
गुलमोहर:
शेअर करा
वा! क्या बात है डॉक्टर साहेब
वा! क्या बात है डॉक्टर साहेब
बहूत खूब
बहूत खूब डॉक्टरसाहाब..!!
१,२,४,५ फारच आवडले.
बेहद आवडली...
बेहद आवडली...:)
खणखणीत डॉ. साहेब.............
खणखणीत डॉ. साहेब.............
मतला सॉलिड भारी
मतला सॉलिड भारी जबरदस्त!!!
दुसरा शेरही आवडला.
जबरदस्त!
जबरदस्त!
संपले जीवन कळाला धर्म
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?
सुरेख.
फारच सुरेख.
वाचतो तेव्ह्ढ्यावेळा वाटते अत्यंत सुरेख.
माझ्या मित्रांमधील मैत्रीचा हाच एक समान धागा असतो, आपल्या धर्माचा अभिमान बाळगायचा असेल तर खुशाल बाळगा पण इतरांच्या धर्माचाही आदर करा. वाद व्हायचे कारणच नाही. कोणत्या जाती-धर्मात जन्म घ्यायचा हे माणसाच्या हातात नाही. भारतीयत्व आणि माणुसकी हीच फक्त धर्म आणि जात असावी.
वैयक्तिक विचार.
गझल अप्रतिम.
आपल्या आजपर्यंतच्या गझलेतली मला आवडलेली सर्वश्रेष्ठ गझल.
एकदम छान!!!
एकदम छान!!!
कैलास मतला मस्त आहे ४थ्या
कैलास मतला मस्त आहे
४थ्या मध्ये गडबड आहे. कधीच मधला 'च आणि कुकर्म मधला 'कु' मिळून एक गुरू केल्याने लय जात आहे
पुलेशु
छान ...
छान ...
डॉ. कैलास, १. मतला व दुसरा
डॉ. कैलास,
१. मतला व दुसरा शेर समजले.
२. यमक आवडले. (नावीन्यपूर्ण)
३. मतला आवडला.
४. शर्म - शरम असे मनात आले.
कधीच - याबाबत मिलिंदने लिहीले आहे त्याच्याशी सहमत!
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
धन्यवाद मंदार, धन्यवाद
धन्यवाद मंदार,
धन्यवाद मुटेजी,
धन्यवाद भ्रमर,
धन्यवाद अमित,
धन्यवाद हणमंतराव,
धन्यवाद राजेश्वर,
अनिल..., आपले विशेष धन्यवाद... विस्तृत प्रतिसादाबद्दल,
धन्यवाद गणेश,
धन्यवाद सायली,
मिल्या जी अन भूषणराव,
आपल्या मुद्द्यांशी एकदम सहमत....,
४ था शेर बदलून असा लिहितोय,
धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू
सांग तू केलेस वाइट कर्म नाही ?
भूषणजी,मिल्या.... मनःपूर्वक धन्यवाद.
डॉ.कैलास
संपले जीवन कळाला धर्म
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?
>>> लाजवाब...!!!
'दुष्कर्म'! एक आपला पर्याय!
'दुष्कर्म'!
एक आपला पर्याय!
-'बेफिकीर'!
डॉक्टराहेब, राहावलं नाही
डॉक्टराहेब, राहावलं नाही म्हणून आपल्या उत्तम गझलेचे येथे पोस्टमार्टेम केले आहे. गोड मानून घ्या. http://www.maayboli.com/node/18947
धन्यवाद मून.. भूषणराव... आपला
धन्यवाद मून..
भूषणराव... आपला बदल ''भन्नाट'' आहे..... त्यानुसार बदल केला आहे.... मनःपूर्वक धन्यवाद.
कौतुकराव...... तुमची ''ही'' दाद आवडली. धन्यवाद.
डॉ.कैलास
डिलीटेड
डिलीटेड
कैलास साहेब, कविता नाहि
कैलास साहेब,
कविता नाहि आवडली. कारण अर्थ कळला पण हेतु दडला.
माबोकरानी स्तुती करावी म्हणुन केलेला अट्टाहास होय.
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?> मुळिच नाही, धर्म कळायला प्रयत्न करावे लागणार ना सर!!!
आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही>> नाहि सर, आरती आणि वंदना एकदा खरच अटेंड करा. दोघात जमिन आसमनचा फरक आहे. एक दगडाकडे नेते तर दुसरी दिव्यत्वाकडे नेते.
धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही> धर्माने दिलेले घाव किती खोल आहेत ते बघण्यासाठी एका तरी पिडिताला भेटलात का ?
धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू
सांग तू केले कधी दुष्कर्म नाही ?> नक्किच नाही.
नागडा मी जाहलो धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?> या वर काय बोलु.............!
हे माझं मत आहे. माझं मत तुम्हाला आवडलं नसल्यास कळवावे. मी हा प्रतिसाद काढुन तिथे एक टिंब दयायला तयार आहे.
मधुकरराव....., माबोकरांनी
मधुकरराव.....,
माबोकरांनी स्तुती करावी म्हणून मला न रुचणारं काव्य मी कसं प्रसवेन?जे मला रुचलं/रुचतय्,ते मी शब्दात मांडलं......... हेतु कोणता दडला? मी स्पष्टपणे लिहिलं आहे..... हेतु न दडवता....
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?> मुळिच नाही, धर्म कळायला प्रयत्न करावे लागणार ना सर!!!
कोणताहि धर्म न कळता मी सुखी असेन ... तर काय करायचं धर्म समजून.?.... धर्म हे जीवन जगणे सुकर करण्याचा एक मार्ग आहे असे माझे स्पष्ट मत आहे...... धर्म जर अनेक बंधने लादत असेल्,धर्म जगण्यात अवरोध निर्माण करत असेल्,तर धर्म न जाणणेच योग्य... ( हे मी प्रत्येक धर्माबाबत बोलतोय.... कोणत्याही विशिष्ट धर्माबाबत नाही ).आणि आपण म्हणता त्याप्रमाणे मी माझा धर्म जाणतो... प्रयत्नपूर्वक....
आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही>> नाहि सर, आरती आणि वंदना एकदा खरच अटेंड करा. दोघात जमिन आसमनचा फरक आहे. एक दगडाकडे नेते तर दुसरी दिव्यत्वाकडे नेते.
मधुकर जी,...... मूर्तिपूजा बौद्ध धम्मीयांस वर्ज्य आहे..... हे सत्य आहे..... आणि त्याहून मोठे सत्य हे आहे की जगात सर्वात जास्त मूर्त्या ह्या तथागताच्याच आहेत..... देवास दगड मानणारे आपण्,त्रिशरण पंचशील वंदना बुद्ध्मूर्तीसमोरच म्हणतो....दगडाच्या. त्यामुळे मी म्हणेन... कसलं दगडाकडे जाणे आणि कसलं दिव्यत्व..?
धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही> धर्माने दिलेले घाव किती खोल आहेत ते बघण्यासाठी एका तरी पिडिताला भेटलात का ?
मधुकरजी.... आपणांस एवढंच म्हणेन...... मी स्वखर्चाने खैरलांजी येथे ''खैरलांजी हत्याकांडा नंतर '' महिनाभर वास्तव्यास होतो..... पी.एम. रिपोर्ट्स्,कायदेशीर बाबी.... आदि गोष्टींवर सखोल अभ्यास करुन माझेपरीचा ''हातभार '' पिडिताच्या अन्याय निर्मूलनासाठी लावला आहे..... हे उदाहरण वानगीदाखल दिलेय.... अन्यथा मी उजव्या हाताने केलेल्या सत्कृत्याचा डाव्या हातास पत्ता लागू देउ नये ह्या मताचा आहे.असो.
धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू
सांग तू केले कधी दुष्कर्म नाही ?> नक्किच नाही.
हा शेर मी आपणांस उद्देशून अजिबात लिहिला नाही... परंतु आपण नक्कीच नाही असे म्हणालात.... क्षणभर ''चोर की दाढी में....'' वगैरे म्हण आठवली....
तरी सुद्धा आपण नाही म्हणालात म्हणून विचारतो..... आपण बुद्धाच्या पंचशीलाचे पूर्ण पालन करता?
सुरामेरयमज्ज पमाद ठाणा वेरमणी'' पूर्णता: पाळता?
आपण मांसाहार करत नाही?
आपण कधीच खोटे बोलला नाहीत?
( कोण्त्याच धर्माचं १००% पालन ही अशक्यप्राय गोष्ट आहे.... मी फक्त काही गोष्टीच म्हणालोय मधुकर...... पण आपणच काय इतरही कुणी त्यांच्या धर्माचं पूर्णता: पालन करत नसणार हे निर्विवाद सत्य आहे. )
नागडा मी जाहलो धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?> या वर काय बोलु.............!
ह्यावर आपण म्हणू नका..... मीच विवेचन करतोय मित्रा..... माझ्या धम्माचं मी पालन करत नाही..... हे मी उघडं होउन सांगितलं तरीही मी बे शरम ठरत नाही.... कारण ... कारण मी मानव धर्माचं पालन करतोय...
आपलं मत आवडलं/नावडलं असं मुळीच नाही...... आपल्या मताचा पूर्ण आदर आहे..... पण आहे हे असं आहे.
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
डॉ.कैलास गायकवाड.
डॉ कैलास, आपले विचार आवडले.
डॉ कैलास,
आपले विचार आवडले.
क्या बात है डागदरबाबु... गज़ल
क्या बात है डागदरबाबु... गज़ल छान आहे...
पेशव्यांशी एकदम सहमत... आपले विचार खुप आवडले ... ब्राव्हो अन किप इट अप्प्प्प्पप्प!!!!
शेवटाचा शेर मात्र थोडा वेगळ्यान मांडता आला असता असे वाटले मेनली तुमच प्रतिसादातलं चिंतन वाचुन जी पर्सनॅलीटी समोर उभी राहीली त्यावरनं अस वाटल... चुभुदेघे
पेशवा शी सहमत!!
पेशवा शी सहमत!!
डॉ. कैलास, छान आहे. आवडली.
डॉ. कैलास,
छान आहे. आवडली.
धन्यवाद पेशवा, धन्यवाद
धन्यवाद पेशवा,
धन्यवाद गिरीश..... शेवटचा शेर एकदम अंगावर येणारा झालाय.... मलाही त्यात बदल करावा वाटतोय.... बघू या.
नचिकेत... मनःपूर्वक आभार,
मनोजराव... धन्यवाद.
गजल आवडली. तिच्यातला
गजल आवडली. तिच्यातला प्रामाणिकपणा आवडला. उगाच कुठेही कसल्याही अभिनिवेशाचे बुडबुडे नाहीयेत. हा नितळपणा का आलाय माहित आहे? तुम्ही फक्त मानवधर्म हाच श्रेष्ठ धर्म मानताय म्हणून आणि त्याच धर्माचा अभिमान बाळगताय म्हणून. जेव्हा माणूस फक्त आपलाच धर्माच्या नावाखाली स्वतःच्या मनात द्वेष पोसतो तेव्हा तो स्वतःच्या धर्मापासूनही खूप दूर गेलेला असतो कारण कुठलाच धर्म द्वेषाची शिकवण देत नाही.
मला कुणी झापड मारली तर मीही तिथल्या तिथे परतफेड करेन. माझ्यात तेवढी शक्ती नसेल तर मी माझ्या पद्धतीने युक्तीने प्रतिकार करेन. पण मारणार्याच्या मुलाला, नातवाला, पणतूला, खापरपणतूला मारत बसणार नाही कारण माझा गुन्हा त्यांनी केलेला नसेल.
------
धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही >>>> हा शेर फक्त मला नीट क्लियर झाला नाही. तो मी तुम्ही त्याबद्दल केलेल्या स्पष्टीकरणातून समजून घ्यायचा प्रयत्न केलाय.
पुलेशु. असेच कुठलंही बिरुद चिकटवून न घेता, एक चांगला माणूस म्हणूनच लिखाण करा
धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी
धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही..
खरं तर हा जरा संदिग्धच शेर झालेला आहे..... त्यामुळे येथे त्याचा अर्थ देणे सयुक्तिक ठरेल.
मी निधर्मी आहे...त्यामुळे माझा धर्माभिमान जागृत करण्यासाठी काही लोकं मला '' धर्मवेडा'' म्हणतात.... आपण अमुक धर्माचे.... त्यांच्या अमुक सणाला तू जाउ नको.... त्यांनी आपल्या वर अनन्वित अत्याचार केलेयत...वगैरे,वगैरे......
पण हे सांगून माझा धर्माभिमान जागृत होणार नाही हे त्यांना कळत नाही...... कारण धर्माभिमान हे माझं वर्म नाही........ ''ते चुकीच्या ठिकाणी प्रहार करत आहेत '' हे मला सूचित करायचं आहे... असो.
अश्विनि,आपण मनःपूर्वक ही गझल वाचलीत आणि वेळ देउन इतका चांगला प्रतिसादही दिलात ,याबद्दल आपला खूप आभारी आहे.
कैलास साहेब... तुमची गझल
कैलास साहेब... तुमची गझल आवडली. त्याही पेक्षा जास्त मला त्यात असलेला प्रामाणिक पणा आवडला. त्या प्रामाणिक पणाला दंडवत.
धन्यवाद उदयजी
धन्यवाद उदयजी
आज पुन्हा वाचली, अधिक आवडली
आज पुन्हा वाचली, अधिक आवडली
कैलाशजी, तुम्ही केलेलं
कैलाशजी, तुम्ही केलेलं विश्लेशन भावलं,
आणि निश्चितच निर्मळ काळ्जातुन उतरलेलि ही गझल आहे हे कुणीही टाळू शकनार नाही....
Pages