Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 August, 2010 - 03:18
'' धर्म ''
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?
आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही
धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही
धर्म मार्तंडा पहावे वाकुनी तू
सांग तू केले कधी दुष्कर्म नाही ?
नग्न मी झालो जरी धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?
डॉ.कैलास
गुलमोहर:
शेअर करा
गझल आणि त्यापेक्षाही जास्त
गझल आणि त्यापेक्षाही जास्त विवेचन आवडले....विशेषतः वर्म नाही...
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही
यातून पहिल्या वाचनात 'धर्म कळला/अनुसरला तर सुख निसटते " असा अर्थ जाणवला...अर्थात पुढे वाचताना(विवेचन नाही, गझलच ) हा शेरही नव्याने कळत गेला.
तुमच्या आतापर्यंत वाचलेल्या बहुतेक रचनांतली सहजता आवडली.
धन्यवाद विद्यानंदजी, धन्यवाद
धन्यवाद विद्यानंदजी,
धन्यवाद पद्मजाजी.
डॉक्टरसाहेब, आज ही गझल पुन्हा
डॉक्टरसाहेब,
आज ही गझल पुन्हा एकदा वाचली. यापूर्वीच वाचली होती, परंतु गझल या प्रकारात मी अनभिज्ञ असल्यामुळे स्वत:चे अज्ञान प्रकट होऊ नये यासाठी प्रतिक्रिया दिली नव्हती. आज पुन्हा एकदा वाचून आपले विवेचन देखील वाचले. आता कुठे अर्थ समजल्यासारखा वाटतोय. ही गझल व आपण केलेले विवेचन सुंदर आहे.
गझल छान आहे...effort genuine
गझल छान आहे...effort genuine आहे..heartfelt आहे...फक्तं सहजता थोडी कमी पडते आहे असं वाटतं...वाईट वाटून घेऊ नका...
आपल्यात खरच खूप potential आहे...keep it up..
-परीक्षित
डॉ. कैलास, १ला आणि ३रा शेर
डॉ. कैलास,
१ला आणि ३रा शेर आवडले.
बाकी गझल मला फार आवडली नाही.
धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू
झाकुनी का लिहिले आहे? वाकुनी बरोबर वाटते.
शेवटचा शेरातील 'नागडा' हा शब्दप्रयोग आपल्या आजपर्यंतच्या माझ्या मनातील प्रतिमेस धक्का लावणारा....
शेवटी निर्णय गझलकाराचाच.
धर्म मार्तंडा पहावे झाकुनी
धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू
स्वःतामधे झाकून पहा की तू कधी सुष्कर्म केले नाहीस का? हे अपेक्षित असल्याने झाकूनी वापरले आहे.
''नागडा'' हा एकदम अंगावर येणारा शब्द आहे हे एकदम मान्य. मी यात दुरुस्ती केलीय. आपल्या प्रतिक्रियेने फार बरे वाटले.
डॉक, गझल आणि त्यापेक्षाही
डॉक,

गझल आणि त्यापेक्षाही जास्त विवेचन आवडले
कुठलाही धर्म पुर्णपणे काटेकोरपणे पाळणं आजच्या जगात एवढं सोप राहिलेलं नाही ...
शेवटी खरं बोलणं,वागणं हाच सगळ्यात मोठा धर्म मानला तरी सगळ्या धर्माचं पालन होईल ..
गझल ठीकठाक... पहिला शेर black
गझल ठीकठाक...
पहिला शेर black commedy सारखा वाटला आणि आवडलाही.
वर्म चा प्रयोग काफिया जुळवण्यासाठी अधिक वाटला...
बाकी शुभेच्छा!
>>स्वःतामधे झाकून पहा की तू
>>स्वःतामधे झाकून पहा की तू कधी सुष्कर्म केले नाहीस का?<<
माझ्यामते झाकणे हे क्रियापद एखादी गोष्ट लपविण्यासाठी वापरले जाते.
आपलं ठेवतात झाकून, दुसर्याचे बघतात वाकून ... अशी एक म्हण आहे बघा.
वर्मचा शेर अगदी योग्य. जुळवाजुळव तुम्हालाच माहीत. मला जाणवले नाही. कारण, घाव आणि वर्म यांचा संबंध आहेच.
बहुध डॉ कैलास यांनी
बहुध डॉ कैलास यांनी हिंदी/उर्दूतला झाकना वापरलाय. ताक्-झाक करना, झांकी..पहाअॅण या अर्थी.
गझल आवडली
गझल आवडली
अनिल्,नचिकेत...धन्यवाद. भरत..
अनिल्,नचिकेत...धन्यवाद.
भरत...... अपने अंदर झाँकना/ स्वतःत झाकून पहाणे हे मला अपेक्षित आहे.... ताक -झाँक करना जरा वेगळ होईल.....
षडजपंचम..... धन्यवाद.
हो पण तो मराठी शब्द आहे का?
हो पण तो मराठी शब्द आहे का? ताक झाँक फक्क्त शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी दिले....
ओह... अगदी खरंय..... झाकून
ओह... अगदी खरंय..... झाकून म्हणजे मराठीत लपविणे असा होईल....... ''झाकून'' हा शब्दप्रओग चूकच आहे.
धन्यवाद अजयजी आणी भरत..... ''वाकून'' जमेल्,पण अपेक्षित अर्थात थोडा कमी पडेल... असो. मी सध्यातरी ;;वाकून'' वापरतोय...... भरत नी आणि अजयजींनी सांगितल्याप्रमाणे '' झाकून'' मराठीत चूकच आहे. माझ्या हे लक्षात यायला उशीर लागला.
कैलाशजी, गझल आवडली.
कैलाशजी, गझल आवडली. विश्लेशणही छानच आहे.
आरती अन वंदनाही सारखी मज गर्व
आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही
--------------खुप छान्......केवळ अप्रतिम....
सावरी
नग्न मी झालो जरी धम्मा
नग्न मी झालो जरी धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?
यातील का ची आवश्यकता वाटत नाही
बाकी सुरेख
विचार म्हणून ठीक आहेत पण एक
विचार म्हणून ठीक आहेत पण एक ग़ज़ल म्हणून विचार केला तर मला नाही आवडली असे मी म्हणेन.
Pages