मायबोलीत मोठा चमत्कार आहे!

Submitted by मंदार-जोशी on 21 August, 2010 - 16:15

ह.बा. यांना स्वप्नातही वाटले नसेल की त्यांची ही रचना ह्या अशा कामासाठी वापरली जाईल Proud

पुढील रचनेची प्रेरणा सगळे सुज्ञ आहेत तेव्हा आपल्याला समजली असेलच.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मायबोलीत मोठा
चमत्कार आहे
अघोरी असा रोज
काव्यात्कार आहे

जरी शुद्धलेखनाची
बोंब तरीही
गुलमोहरात रोज
टायपात्कार आहे

कित्येक समजूत
घालून गेले
तरी निर्मिती रोज
भंगार आहे

दिसताच काव्यकमोड
बसता तयावर
होतो मग रोज
काव्यातिसार आहे

toiletsmiley.gif

जरी मारती रोज
बाटा तरीही (म्हणजे सुजाण मायबोलीकर रोज शाब्दिक चपला-बूट मारतात, तरीही...)
म्हणती टाटाचा
पुरस्कार आहे

जरी 'संघर्ष' संपला
एक तरीही
अशांशी रोज मायबोली
'झुंज'णार आहे

कवी हा नवा रोज
उगवे कसा हो
नवीन आय.डी. चा
अवतार आहे Light 1

वा मंदार.....

कोण तो म्हणतोय की मंदार काव्य कमोड कडे सरकत चाललाय म्हणून...? Happy

जरी मारती रोज
बाटा तरीही (म्हणजे सुजाण मायबोलीकर रोज शाब्दिक चपला-बूट मारतात, तरीही...)
म्हणती टाटाचा
पुरस्कार आहे

मंद्या, बारशाच्या दिवशी हा काव्यबहार........... अरे बाळाला चांगलेच "बाळकडु" आहे. Rofl
सहिच आहे.

__/\__

मस्त Happy

मंदार शुद्धलेखनाची बोंब तर ...खरंच अगदी वाचवत नाही. डोळ्याला खटकतं. काही कथांमधेही शुद्धलेखनाचा खून पाडलेला असतो.

जरी मारती रोज
बाटा तरीही
म्हणती टाटाचा
पुरस्कार आहे

सॉलिड रे!!!

मूळ गझलेत मी राजकारण, लोकशाही इ. विषय मांडला आहे. तो देशाच्या दृष्टीने जितका महत्वाचा आहे तितकाच सध्या माबोवर काव्यात्कारी मंडळींच्या अत्याचारांचा तिढा गहन आहे.... तेव्हा, तू गझलेचा सार्थ वापर केलास मित्रा....

- ह बा

मंद्याला झालेला हा सर्वात मोठा साक्षात्कार आहे............
सही रे मंदार अगदी अचुक हेरलं आणि अचुक मारा केलास Lol

>>यालाच 'आंतरीक वेदनेचा हुंकार' म्हणावे काय?

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी ही आंतरिक वेदना....शेवटी सांगितलंच, हुंकारासह Proud

Proud

Pages