सारेगमप मराठी - लिटल चॅम्प्स २

Submitted by Adm on 2 August, 2010 - 09:42

पुन्हा एकदा लिटल चॅम्प्स !!! सारेगमप मराठी पुन्हा एकदा त्यांचा हुकमी एक्का घेऊन येत आहे. लिटल चॅम्प्सचे दुसरे पर्व आज पासून सुरु होत आहे. हा धागा लिटल चॅम्प्स पर्वातल्या गाण्यांविषयी चर्चा करण्यासाठी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>यावेळी पल्लवी, तिचे मराठी आणि ते महान कपडे नाही हा केवढा रिलिफ आहे << या साठी आपण उभे राहून टाळ्या वाजवल्या पहिजेत. Happy

ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे - मस्त. मला आवाज आवडला.
साक्षी - दिस चार झाले जरा चोरुन गायल्या सारख्या वाटले. पण जाईल पुढे. Happy
तो प्रतिक चौसाळकर लै भारी आहे.

उज्वल लै भारी, पहिलं गाण तर सुंदरच पण ते इनके लिये पण काय खतरा म्हणाला.पण त्याचा आवाजामुळे त्याला लेबल लागणार ह्याचे वाईट वाटते. मला आवडला. Happy

काल पहिल्यांदा लिटील चँप्स पाहता आलं, अर्थात पूर्ण पाहता आला नाही, थोडा पाहिला, त्यात लहान मुलांकडून काहीही करवून घेतायत. कुणी एक मुलगा मुग्धाच्या पाया पडून आशिर्वाद काय मागतोय आणि कुणी एक मुलगी त्या अँकर मुलाला किती गोड आहेस रे वगैरे म्हणतेय. Sad आत्ता अपवादानेच असे प्रकार घडलेत तर बरं नाहीतर पर्त्येक भागात उगाच कायच्या काय प्रकार करून (गाण्याव्यतिरिक्त).

परिक्षक राहुल देशपांडे आणि स्वप्निल बांदोडकर हेच असणार आहेत काय?

रविवार लोकसत्ता : लोकरंगमधील हा लेख.

समूहाची सांस्कृतिक हिंसा
दत्ता पाटील ,रविवार १५ ऑगस्ट २०१०
आपण सारे आता करमणूकप्रधान झालो आहोत. रंजनप्रधानतेच्या आहारी गेलेली समाजव्यवस्था यापूर्वी एवढय़ा टोकाला गेली नसावी. कलेच्या प्रभावी प्रचारातून त्यातील गुणवत्ताशोधनाचं निमित्त करून वापरल्या जाणाऱ्या माध्यमातून कथित गुणवत्तेचं ‘लाऊड’ सार्वत्रिकीकरण झाल्याचं दिसू लागलं आहे. गीतरंजन, चित्ररंजन (या जोडीलाच जाऊन बसलेलं वृत्तरंजन) इत्यादी सारं नव्या समूहाला संमोहित करण्याच्या प्रयत्नातून नवनव्या फॉर्मच्या शोधात प्रयोग करू लागलं आहे. म्हणूनच ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या मंचावर जाण्याचं स्वप्न उराशी बाळगत, प्रत्येक घरात गायक, डान्सर अथवा अभिनेता घडविण्यासाठी टोकाची धडपड सुरू झाली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे गुणवत्तेचं सार्वत्रिकीकरण करण्याच्या नादात सामाजिक प्राथमिकता बाजूला पडून, जातीय दुफळी माजविण्याची क्षमता असू शकणाऱ्या अस्मिता जोर धरू लागल्या आहेत.
हा गंभीर विचार करायला भाग पाडले ते झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नाशिकमधील महाअंतिम सोहळ्याने. ‘सारेगमप’ने गेल्या काही वर्षांत मराठी संगीत रसिकांवर खरोखर मोहिनी घातली आहे. मराठी संगीताची नव्या पिढीमध्ये रुची निर्माण करण्यात आणि मराठी संगीताला नवी झळाळी प्राप्त करून देण्यात या कार्यक्रमाचा सिंहाचा वाटा आहे, यात वाद नाही. पण या ‘निर्विवादा’ला दूषित करणारे पडसाद उमटायला लागतात; तेव्हा मात्र यावर गांभीर्यानं विचार करण्याची वेळ येते. एखाद्या सकारात्मक नव्या व्यवस्थेचे पडसाद थोडय़ा प्रमाणात नकारात्मक पडणे, हे समजण्यासारखे आहे. परंतु त्यातील स्पर्धेच्या ठसठशीत अधोरेखनातून समोर हजारोंच्या संख्येनं संगीत मैफलीचा आनंद लुटण्याच्या निमित्तानं आलेला रसिक समूह हिंसक होऊ लागल्याची अनुभूती परवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आली. कला-संस्कृतीच्या प्रसाराचे हे नकारात्मक पडसाद घातक ठरू पाहात आहेत. या सांस्कृतिक हिंसक मानसिकतेतूनच रसिकांमध्ये तट पडू लागले आहेत. राजकारणाचा अजून फारसा स्पर्श न झालेल्या या क्षेत्राला ‘कम्युनल कोल्ड वॉर’चं स्वरूप प्राप्त होऊ लागलं आहे. मराठी- अमराठी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशा अनेक गटातटांमध्ये विभागलं जाण्याचं दुर्भाग्य आता सांस्कृतिक क्षेत्राच्या वाटय़ालाही येऊ लागलं आहे. म्हणूनच कोणीतरी अनिरुद्ध जोशी जिंकतो तेव्हा त्याला मिळालेले एसएमएस हे ‘जातीय’ पाठबळावर मिळाल्याचा आरोप उघडपणे होऊ लागतात. त्यावर कडी म्हणजे परीक्षकांच्या आडनावांचा शोध घेऊन त्याचे दाखलेही दिले जाऊ लागतात. कुणीतरी राहुल सक्सेना हरतो- तेव्हा तो अमराठी असल्याचा त्याला फटका बसल्याची चर्चाही केली जाऊ लागते. बरं, अशा चर्चा एकदोघांत झाल्यात तर दुर्लक्षिण्यासारखं आहे, पण जागोजागी अशाच चर्चा ऐकू येऊ लागतात; तेव्हा मात्र या अशा उपक्रमांचा ‘व्यापक सांस्कृतिक उद्धारा’चा हेतू आता धुळीस मिळू लागल्याचे समजण्यास हरकत नाही.
खरं तर गुणवत्तेचा शोध न घेता समूहाला आवडणाऱ्या कलाकाराचा शोध घेणारी ही स्पर्धा, समाजाच्या सांस्कृतिक आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू लागली आहे. म्हणून तर अनिरुद्ध जोशीच्या अजिंक्यपदाऐवजी चर्चा सध्या राहुल सक्सेनाच्या पराभवावरच अधिक होतेय, हे दुर्लक्षून चालणार नाही. (लिटिल चॅम्पस्च्या महाअंतिम फेरीत कार्तिकी गायकवाड विजेती म्हणून घोषित झाल्यानंतर स्टेजच्या समोरून सुजाण दिसणाऱ्या २०-२५ रसिकांचा एक मोठा गट ‘आर्या आंबेकर झिंदाबाद’च्या घोषणा देत, नाराजी व्यक्त करीत मोर्चाने बाहेर निघून गेला होता. ते फक्त २०/२५ जण होते म्हणून दुर्लक्ष करायचं का?) त्यामुळे कोणी कितीही नाकारलं तरी रसिक समूहात जातीय, प्रांतीय गट पडल्याचं वास्तव दुर्लक्षून चालणार नाही.
या साऱ्या स्पर्धात्मक हिंसेचा सर्वाधिक वाईट परिणाम होतोय तो गुणवान स्पर्धकांवर. त्यांच्या कलेच्या विकसनाच्या प्रवासातील या महत्त्वाच्या टप्प्यातच त्यांच्या मनावर याचे खोलवर ओरखडे उमटताहेत. म्हणून तर वर्ष-दीड वर्षांत प्रयत्नानं मराठी बोलायला शिकणारा हरहुन्नरी राहुल परवाच्या पराभवाचं दु:ख लपवू शकला नाही. आणि उलटसुलट चर्चेच्या गदारोळात गुणवान अनिरुद्धलाही विजयाचा निर्भेळ आनंद लुटता आला नसावा. कलेला जात नसते, असं कितीही म्हटलं जात असलं तरी ज्या रसिक समूहासाठी ती सादर केली जात असते किंवा अस्तित्वात आणली जात असते, त्या समूहाची आस्वादकताच जात-पात, प्रांतवादाचा अंगीकार करत गढूळ होऊ लागते. नि मग कथित कलासंवर्धनाचे आणि प्रसाराचे हे सोहळे आता आटोपते घ्यावेत किंवा याचं स्वरूपच समूळ बदलावं, असं सुज्ञांना वाटू लागलं आहे. समूह आपल्या कोणाला तरी एकाला निवडतो, तेव्हा अन्य स्पर्धकांच्या मनात डावललेपणाचा न्यूनगंड बळावण्याची भीती असते. परीक्षक अंतिम फेरीसाठी त्यांना निवडतात, तेव्हा त्या सर्वाची गुणवत्ता एकसारखी असल्याची भावना त्यामागे असते; परंतु अशा ‘महाअंतिम’ सोहळ्यातून जनसमुदायाला त्यातून एक विजेता निवडण्यासाठी ‘चेतविले’ जाण्याचे प्रयोग कलेच्या प्रांताला हितावह नाहीत. परवाच्या सोहळ्यात सूत्रसंचालन करणाऱ्या जितेंद्र जोशींनी प्रेक्षकांत येऊन ‘कोण जिंकेल’, यासाठी प्रेक्षकांचे ‘स्टँडिंग व्होटिंग’ घेतले आणि अपूर्वा गज्जलाचं नाव घेतल्यावर उपस्थित तीन हजारांच्या जनसमुदायापैकी पाच-दहाच रसिक उभे राहिले, तेव्हा या गुणी गायिकेला वा तिच्या पालकांना काय वाटले असेल? त्या वेळी स्पर्धा तर पुढे बरीच बाकी होती. ज्या राहुलचं नाव घेतल्यावर सबंध प्रेक्षागृहच उठून उभं राहिलं, त्याच राहुलला रसिकांच्या कमी व्होटिंगमुळे विजेतेपद गमवावं लागलं; तेव्हा या हरहुन्नरी गायकाच्या मनाची अवस्था काय झाली असेल?
आक्षेप कार्यक्रमावर नाही. समूहाचं पाठबळ अथवा व्ह्यूवरशिप मिळविण्याच्या अट्टहासापोटी केल्या जाणाऱ्या अशा प्रयोगांवर आहे. त्यामुळे समूहाचं रंजन आणि त्यातून जमलंच तर प्रबोधन एवढय़ापुरतं मर्यादित स्वरूप ठेवण्याची वेळ आली आहे. समूह एरव्ही ‘एक’ असल्यासारखा ‘बिहेव’ करतो, पण चेतवला जातो तेव्हा तो गटांमध्ये विखरून ‘आपापला’ माणूस निवडण्यामागे लागतो. हा अर्थातच या समूहावर अलीकडच्या काळातील राजकारणानं केलेल्या ‘संस्कारा’चाच एक भाग आहे! म्हणून तर त्याला निर्विवाद ‘नेताही’ निवडता येऊ नये, याची पुरेपूर काळजी या संस्कारानं घेतली आहे. या गटातटांमुळेच समूहाला नेता न मिळता मिळतो तो गटातटांचा प्रतिनिधीच! या राजकीय व्यवस्थेचं संक्रमण किमान सांस्कृतिक क्षेत्रात तरी व्हायला नको. स्पर्धेतून विजेता वा महाविजेता ठरविण्याचा सर्वाधिकार हा परीक्षकांनाच दिला जावा. जनतेला नको. जनतेला या सांगीतिक मैफिलीचा निकोप आनंद घेऊ द्यावा. संगीत हे सामाजिक एकोप्याचं सर्वात प्रभावी माध्यम समजलं जातं. अशा सांगीतिक स्पर्धात्मक मैफिलीतून तरी जातपात, गटातटांच्या चर्चा न होता, एकोपा राखण्याचे प्रयत्न केले जावेत, हीच सुज्ञांची अपेक्षा आहे.

<<पालकांना किती हौस असते स्वतःच्या बछ्ड्यांना अस ताटकळत ठेवायच मग २-३ तासानंतर नंबर, मग ऑडिशन आणि त्यातुनही सिलेक्ट नाही झाले तर त्यांचे केविलवाणे चेहर>> ते ऑडिशन चे एपिसोड न दाखवलेलेच बरे.

<<त्यात लहान मुलांकडून काहीही करवून घेतायत. कुणी एक मुलगा मुग्धाच्या पाया पडून आशिर्वाद काय मागतोय आणि कुणी एक मुलगी त्या अँकर मुलाला किती गोड आहेस रे वगैरे म्हणतेय. आत्ता अपवादानेच असे प्रकार घडलेत तर बरं नाहीतर पर्त्येक भागात उगाच कायच्या काय प्रकार करून (गाण्याव्यतिरिक्त).>> १००% अनुमोदन.

त्या मुग्धाला साडी निसणे गरजेचे होते का? लहान मुले त्यांच्या dress code मधे आलेली बरी दिसतात.

काहिही म्हणा... मुग्धा आणि परीक्षकांना पल्लवी आणि अवधूत कडून थोडे धडे घेतले पाहिजे Happy

यात सिलेक्ट झालेल्या ३२ मुलांपैकी किमान ८ मुले जुनीच आहेत. मागे येऊन गेलेली....... काही पुढपर्यंत पोचली होती काही मधेच गळाली. सराफ, वेदा नेरुरकर, भाग्यश्री टिकले ई.

भ्रमर हे तर होणारच.... जोपर्यंत वयाच्या अटीत बसत आहेत तोपर्यंत परत परत येणारच की..

त्या मुग्धाला साडी निसणे गरजेचे होते का? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>हो मला पण नाही समजले मुग्धा साडी नेसून कशासाठी आली होती ..... आणि बंर तिने नेसली तर त्या मुलाने पण पारंपारिक पोशाख करून यायला पाहिजे होते ... अँकर दोघेही जण आहेत न... मग दोघांनी एक-मेकांना किमान match होईल असे तरी कपडे घालणे अपेक्षित होते...

मुग्धा गोड दिसत होती साडी नेसून.. अथर्व आणि तिची मराठी भाषा पल्लवीपेक्षा नक्कीच चांगली आहे. वयानुसार उत्स्फुर्तता कमी पडेल कदाचित, पण निरागसतेमुळे लपून जाईल तेही..

भाग्यश्री टिकले काल केवढी वेगळी दिसत होती, छान गायली. काल बाकी गाणी बघता आली नाहीत, पावसामुळे डिश टिव्हीचं नेटवर्क गंडलं होतं.

पल्लवी नाही म्हणून हुश्श केलेलं ना? आता मुग्धाच्या साडीवर बोलायचंय का? Uhoh
मुलं छानच गातायत सारी. राहुल आणि स्वप्नीलही सो फार सो गुड. काल राहुलचं 'काटा रुते कुणाला' काय लागलं! इतक्या वेळेला ऐकलंय हे गाणं पण तरीही 'आक्रंदतात' आणि 'फूल' ला जो अर्थ दिलाय त्याने, जवाब नही! देवकी म्हणायची तसं, सूर ताल तर आवश्यकच पण शब्दातला अर्थ दरवेळेस जाणवायला हवा तो असा.

मुग्धा वैशंपायन सुत्रसंचालक!!
wtf2.gif
सांग तुला काय देऊ... प देऊ प???
प-पल्लवीचा??? नको त्यापेक्षा मुग्धाचा म बरा smileyvault-cute-big-smiley-animated-013 (1).gif

टाळीवाल्या बाईला रजा दिलेली पाहून आनंद झाला...

समूहाची सांस्कृतिक हिंसा >>> पाटील यांनी अगदी योग्य शब्दात आधुनिक समाजाचे रुपडे मांडले आहे.

मला अभिषेक सराफ का काय तो माजी रे! गायलेला त्याच्याबाबतीत पार्शिअलिटी झाली असं वाटलं..

श्रीनीधीचं कांदेपोहे काही खुप छान झालं नाही तरी तिला "ध" मिळाला..ऑडिशन्स च्या वेळीही तिला टेन्शन आलं म्हणुन दुसरं गाणं म्हणायला सांगितलं... Uhoh

मुग्धा>>>> अनुमोदन
अभिषेक श्रीनिधीपेक्षा चांगला गायला होता.
'छबीदार छबी' देखील ठीकठाक होतं, गाण्यात आवश्यक तो ठसका नव्हता असं वाटतं मला, पण तिला 'नी' मिळाला. Uhoh

कांदेपोहे ला ध बळच दिला.. ! कांदेपोहे फक्त अवंती पटेलनेच गावं.. !!

अभिषेक सराफच्या बाबतीत अन्याय झाला हे नक्की. >>>> अनुमोदन,..मलापण काहीसं तसं वाटलं..

छबीदार छबी बद्दलही प्राचीला अनुमोदन..

अरे वरची लिंक बरोबर नाहीये, बरोबर लिंका टाकत जा लोकहो.

ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे - मस्त. मला आवाज आवडला.>>> तीच ना जिने गेल्यावेळी कळीदार कपूरी पान आणि माझ्या मना ऐक जरा म्हटले होते? असेल तर ती फारच गोड गाते.

या राजकीय व्यवस्थेचं संक्रमण किमान सांस्कृतिक क्षेत्रात तरी व्हायला नको. स्पर्धेतून विजेता वा महाविजेता ठरविण्याचा सर्वाधिकार हा परीक्षकांनाच दिला जावा >>>
मयेकर अनुमोदन.

कार्तिकीच्या वेळेस ज्या दुर्दैवी घटना झाल्या, त्याच आता जोशी विरुद्ध होत आहेत. असे नको व्हायला. निदान इथे तरी जात-धर्म यायला नको.

त्या कार्तिकीला अन आता अनिरुद्धला ह्यामुळे नक्कीच त्रास झाला असणार. गाणे ऐकने वेगळे अन त्यातील तांत्रिक चुकांवर विचार करुन निर्णय करने वेगळेच ठेवावे.

कुणी लिटल चँप्स पहात नाही काय?

असो "पल्लवी जोशीचा 'झी'ला राम राम!"

मुंबई - "कुठेही जाऊ नका... आता आपण घेत आहोत छोटासा ब्रेक... पाहत राहा... आयडिया सारेगमप...' "झी मराठी' वाहिनीवरील हा कार्यक्रम घरोघरी पोचविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या पल्लवी जोशीने आता "झी'ला राम राम म्हटलेले आहे. "ई टीव्ही' मराठी वाहिनीवरील "गौरव महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ती करणार आहे. त्यामुळे "झी'च्या हुकमी सूत्रसंचालकांत फूट पडत चालली आहे का, या चर्चेला टीव्ही इंडस्ट्रीत ऊत आला आहे.

http://72.78.249.124/esakal/20100917/5460988405027840466.htm

अरे सारेगमपच्या बाबतीत सगळेच अचानकच निरुत्साही झालेले दिसतायेत... कुठे हरवले कुठे सगळे....

तसा कंटाळवाणा होतो आहे यंदाचा भाग पण काही काही गाणी चांगली होतायेत... आता शेवटचे १०च जण राहिलेत... अजून किती ताणणार आहेत काय माहित..

मी बघतो शक्य होईल तेव्हा.
(त्या स्टेजमागच्या गोष्टी कधीकधी कंटाळवाण्या आणि कालापव्यय वाटतात.)

लिटिल चँप्सचं हेही शेड्युल मस्त रंगत चाललंय. शरयू दाते, शुभम खंडाळकर, आदिती आमोणकर, वेदा नेरूरकर एकदम मस्त गाताहेत. पद्मनाभ पण चांगलाय पण त्याला डोक्यावर चढवून ठेवलाय असं वाटतंय.
लावण्यांच्या भागात शरयूचं 'एक हौस पुरवा महाराज' कसलं सह्ही झालं, त्याचा कोरस पण भारीच रंगला.

येता जाता जेवढं पाहिलं त्यात शुभमचं गाणं आवडलं.
बाकी कोणी आर्या-प्रथमेश च्या लेव्हल्चं च नाही वाटलं.
मुग्धाला काय विचार करून बनवलय होस्ट ??
कित्ती नाकात बोलते ती , काहीतरीच वाटतं ते ऐकायला Uhoh

शरयू, शुभम, आदिती, वेदा, पद्मनाभ हे फायनलमधे आहेत.
शरयूचा एकूणच आत्मविश्वास वाढलाय हे जाणवत होतं.

अप्सरा आली...चा कोरस मात्र अगदीच नीरस वाटला!

बाकी कोणी आर्या-प्रथमेश च्या लेव्हल्चं च नाही वाटलं.
अनुमोदन!! त्यामुळे मेगाफायनल बघायची फार उत्सुकता नाहिये.
म्हणजे तशी ही मुलंही गुणी आहेत, पण आधीच्या पर्वामुळे वाढलेल्या अपेक्षा या वेळी पुर्ण होणं अवघड दिसतंय.

Pages