Submitted by Adm on 2 August, 2010 - 09:42
पुन्हा एकदा लिटल चॅम्प्स !!! सारेगमप मराठी पुन्हा एकदा त्यांचा हुकमी एक्का घेऊन येत आहे. लिटल चॅम्प्सचे दुसरे पर्व आज पासून सुरु होत आहे. हा धागा लिटल चॅम्प्स पर्वातल्या गाण्यांविषयी चर्चा करण्यासाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या पर्वातल्या लिटल
पहिल्या पर्वातल्या लिटल चॅम्प्सची मजा काही वेगळीच होती! आता पाहुयात दुसरे पर्व कसे आहे ते!!
कोणाला अजून काही माहिती असेल
कोणाला अजून काही माहिती असेल तर द्या.. मी ती वर चिकटवेन..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/18352 हा मीपण काढलेला धागा, तो उडवायचा कसा? अॅडमीनना विनंती करावी लागेल काय?
ओह !! तुम्ही पण काढला का
ओह !! तुम्ही पण काढला का तितक्यात ?
अॅडमीनना सांगावं लागेल एक धागा उडवायला..
तेच, मी काढलाय तो उडवूदेत,
तेच, मी काढलाय तो उडवूदेत, कसं सांगायच? इ-मेल का आणखीण कुठला पर्याय?
पराग.. माहिती असलेला एक
पराग.. माहिती असलेला एक खात्रीशीर स्पर्धक... शुभम खंडाळकर. पुणे. बहुतेक जाईल शेवटच्या १० मध्ये..
कार्तिकीने 'घागर घेऊन घागर घेऊन' हे गाणे गायले होते त्याचे संगीतकार रघुनाथ खंडाळकर ह्यांचा मुलगा.. ह्याच्या कडून परत नविन अभंग आणि गवळणी ऐकायला मिळायची संधी आहे.. अर्थात झीवाल्यांनी संधी दिली तरच....
रंगासेठ, अॅडमीनना विपूत
रंगासेठ, अॅडमीनना विपूत लिहा.
मागच्या पर्वात इतके अनफेअर
मागच्या पर्वात इतके अनफेअर रिझल्ट , इतकं पॉलिटिक्स पहूनही , झी टी. व्ही. चे वर्ष भर स्वतः च्या फायद्या साठी पोरांना पिळून नंतर "निकाल " लावायचा हे धोरण माहित असूनही जे पालक आपल्या पोरांना या स्पर्धेत पाठवतायेत त्यांना सा. दंडवत !
उडत उडत कानावर आलेली
उडत उडत कानावर आलेली बातमी.....
मुग्धा वैशंपायन सुत्रसंचालन करणारेय आणि आरती अंकलीकर परिक्षिकेच्या भुमिकेत असतील!
याच बरोबर स्टारवर छोटे उस्ताद
याच बरोबर स्टारवर छोटे उस्ताद दो देशों की एक आवाज सुरू होतेय ना.
छोटे उस्ताद सुरु झालय बहुदा,
छोटे उस्ताद सुरु झालय बहुदा, मी व्हिडिओ पाहिले कराचीच्या २ लहान मुलांचे सुफी गाताना... अ.... श.. क्य.. सुरेख गातात.. कमालीच्या तयारीचे आहेत..इतर कुठले लिल चँप्स, मोठे स्पर्धक सुध्दा कमी पडतील त्यांच्या पुढे.
जे रेग्युलर्ली पहातात त्यांनी नवीन बीबी सुरु करा छोटे उस्ताद चा !
खरे तर पहीली post गोड असावी,
खरे तर पहीली post गोड असावी, पण .. काल गोव्याच्या केदार डिचोलकरला ज्या पध्दतीने बाद केले त्याचा त्रिवार निषेध. या पर्वाचा मोदक (प्रथमेश लघाटे) बनु शकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. परंतु त्याला select केले नाही.
हिम्याने वर उल्लेख केलेला
हिम्याने वर उल्लेख केलेला शुभम खंडाळकर कालच्या भागात होता. पण त्याच्या बाबतीत झी वाल्यांनी ड्रामा केलाच.... त्याचा घसा कोरडा पडणं, तो गाता गाता अनपेक्षितपणे थांबणं, सगळ्यांना टेन्शन येणं, प्रत्येकाचा त्या अवस्थेचा क्लोझ अप वगैरे सगळं 'दिग्दर्शित' आहे हे व्यवस्थित जाणवलं.
केदार डिचोलकरबद्दल अनुमोदन!
केदार डिचोलकरबद्दल अनुमोदन! ते गोवन गाणे तर सुंदरच होते. मुरलीधर शाम पण बर्यापैकी चांगले म्हटले होते त्याने. इतके कठीण गाणे इतपत चांगले म्हणणे नीवड करायला नक्कीच पुरेसे होते.
मुग्धाची सूत्रसंचालनाची झलकही
मुग्धाची सूत्रसंचालनाची झलकही पाहिली. धमाल येणार!
तो जो तुषार देशपांडे होता ना
तो जो तुषार देशपांडे होता ना सिंथ वाजवून गायलेला त्याला ठेवायला पाहिजे होते.. त्यानी नंतरचे गाणे चांगले गायले होते..
मंजू.. झी वाले ड्रामा करण्यात पटाईत आहेतच... पण दुर्दैवाने तिथे काहीच ड्रामा नव्हता... कारण त्याला खरच घशाला कोरड पडली होती... एपिसोडचे शूटींग झाल्यावर तो घरी येऊन गेलाय माझ्या..
काल बघितल मी कितीतरी लहान
काल बघितल मी कितीतरी लहान मुले आली होती अगदी ५ च्या आसपासची सुद्धा. पालकांना किती हौस असते स्वतःच्या बछ्ड्यांना अस ताटकळत ठेवायच मग २-३ तासानंतर नंबर, मग ऑडिशन आणि त्यातुनही सिलेक्ट नाही झाले तर त्यांचे केविलवाणे चेहरे.
मला ही निवड प्रक्रिया अन त्यासाठी कुठेही जायची तयारी असलेले पालक धन्य आहेत अगदी.
ओह... त्या शुभमचं असं खरंच
ओह... त्या शुभमचं असं खरंच झालं का?
आता मन बाजूला ठेवून पुढचे भाग बघायला हवेत नाहीतर प्रत्येक गोष्टीत झीचा ड्रामा दिसत राहील.
हो, तो सिंथवाला मुलगा खरंच चांगला होता.
तो मुरलीधर गाणारा मुलगा नेझल
तो मुरलीधर गाणारा मुलगा नेझल गात होता पण सुर पक्के होते त्याचे. पद्मजा फेणाणी ज्या पद्धतिने मुलांना न दुखवता नकार देत होती ते आवडले.
मुग्धा ची झलक छान
काही पालक मुंबई, पुणे आणि
काही पालक मुंबई, पुणे आणि नागपुर अशा ३ ठिकाणी मुलांना ऑडीशन्स करता घेउन जातात.... काय तो आचरटपणा
केदार डिचोलकरला करतील बहुतेक
केदार डिचोलकरला करतील बहुतेक सिलेक्ट.... त्याला रिजेक्ट करणं हा झीचा ड्रामा असु शकतो!
शेवटचे बारा सिलेक्ट झाले की
शेवटचे बारा सिलेक्ट झाले की इथले मायबोलीकर विजेता बरोब्बर ओळखतील.
गेल्या वेळचा अंदाज काय परफेक्ट होता
लहान मुलं होस्ट झाल्यावर अगाउ
लहान मुलं होस्ट झाल्यावर अगाउ पणा करतानाच जास्त पाहिलय पण काहीही असो पल्लवी पेक्षा नक्कीच चांगली वाटेल मुग्धा, शुध्द बोलते आणि गातेही ठिक
प्रत्येक गोष्टीत झीचा ड्रामा
प्रत्येक गोष्टीत झीचा ड्रामा दिसत राहील.>>> प्रत्येक गोष्टीत ड्रामा आसतोच पण शेवटी फायनलला तर पैसे मागितले जात असंही ऐकुन आहे. मागच्या पर्वात आर्या,मुग्धा आणि मोदक फारच उजवे असताना अचानक वेगळाच निकाल दिसला होता.
अगदी उर्मिला धनगरच्याही बाबतीत हेच केलं होत ... तो निकालच अनपेक्षीत होता... अंतीम फेरीचे एसएमेस दाखवत नाहीत यात फारपारदर्शकता नाही
यावेळी निराशा करतोय लिटील
यावेळी निराशा करतोय लिटील चॅम्प्सचा कार्यक्रम.. लहान मुलांमुळे नाही तर परिक्षकांच्या निर्णयामुळे...
त्या ढोलकी वाजवुन गाणार्या त्या सौरभला (नाव नक्की आठवत नाही) का डावलले तेच कळत नाही.. झेंड्याचे गाणेपण बर्यापैंकी म्हटले होते.. इतरांना जशी संधी दिली तशी ह्या मुलाला तरी द्यायची होती असे खुप राहुन राहुन वाटले.. इथेपण सेटींग करतात की काय !!
पद्मनाभ गुरु ठाकूरचा मुलगा
पद्मनाभ गुरु ठाकूरचा मुलगा आहे का? प्रोमो दाखवतात तो कोणत्या एपिसोडचा ?
हेच जज्ज कायम रहाणार का
हेच जज्ज कायम रहाणार का बदलणारेत?

देवकी आली पाहिजेल यार परत.... ती उगा कौतुक करत बसत नाही.... आणि नेमका सल्ला देते
आणि जोडीला सलील.... मजा येइल
अरे कुणीतरी लिंका टाका.
अरे कुणीतरी लिंका टाका.
ज्ञाती.. युट्यूब वर झी
ज्ञाती.. युट्यूब वर झी मराठीचा चॅनेल आहे. त्यावर आहेत व्हिडीयो. अजून मुख्य स्पर्धा सुरू व्हायची आहे. सध्या निवडीच्या वेळेचे भाग दाखवत आहेत.
हो काल मी ऑडीशनचे भाग
हो काल मी ऑडीशनचे भाग पाहिले.
गाणे सोडून इतर बघायला जरा बोर झाले जसे अपुर्वा की कोणीतरी होती तिचा अतिआगाउपणा.
Pages