प्रवेशिका - ४९ ( devdattag - राहिला देहात आता श्वास नाही...)

Submitted by kaaryashaaLaa on 15 October, 2008 - 00:14

मित्रहो, कार्यशाळेत गझल प्रकाशित होण्याचा आज शेवटचा दिवस.
आजही तुम्ही नेहमीप्रमाणे गुणांकन करायचं आहेच.
भारतीय प्रमाणवेळेनुसार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तुम्ही गुणांकन करू शकता.

राहिला देहात आता श्वास नाही
जाणिवांनो मी कुणाचा दास नाही

येथले सारेच का निर्ढावलेले?
ठेवला घाटावरीही घास नाही

राघवेंद्रा जाण तूही अग्निदिव्या
शेवटी होणार तुजला त्रास नाही

पोचणे बोलावल्या आधी कुठेही
एवढी का रीत त्या काळास नाही?

तो असावा लागणारे पाहणारा
मागणेही फार माझे खास नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोचणे बोलावल्या आधी कुठेही
एवढी का रीत त्या काळास नाही?

तो असावा लागणारे पाहणारा
मागणेही फार माझे खास नाही

कल्पना आवडल्या...
माझे ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

जाणिवांनो मी कुणाचा दास नाही>>>मिसरा मस्त

पोचणे बोलावल्या आधी कुठेही
एवढी का रीत त्या काळास नाही?

तो असावा लागणारे पाहणारा
मागणेही फार माझे खास नाही

........आवडले

६ गुण...

मिसरा, आणि रीत मस्त!

चांगली आहे.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश

५ गुण

४ गुण

४ गुण

५ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

५ गुण.

घास, काळास हे शेर आवडले!
माझे - ५

मिसरा छान..

पोचणे बोलावल्या आधी कुठेही
एवढी का रीत त्या काळास नाही?

आवडला..
माझे ६ गुण

माझे ६

छान गझल
माझे ९