CA to NY move करायच आहे, सामान move कस करायचं?

Submitted by sas on 12 September, 2008 - 22:04

मदत हवी आहे:

मला CA to NY move करायच आहे, सामान move कस करायच हा प्रश्न आहे, कुणी मदत करेल काय please?

Rent ची गाडी करुन त्यात सामन नेण, याशिवाय दुसरा काही मार्ग आहे का सामान move करण्याचा?

कार 'टो' चा खर्च, सामान move करण्या साठी Rent Truck चा खर्च आणी इतक लांब Truck Driving करण्यापेक्षा, कार मध्ये थोड फार सामान टाकुन कार Drive करायची आणी मोठ-जड सामान (Bed, Dinning Table, Futon, Microwave, Bike (Cycle), TV etc दुसर्‍या एखाद्या मार्गे move करायच हे शक्य आहे का?

माझ जड सामान तस मोजकच आहे (वरची यादि) around $1300 किमतिच, हे सामान garbage मध्ये टाकुन इतर सामान कार मध्ये घेवुन Drive करण योग्य की सामान move करण? pls. suggest

मायबोलि वर हे लिखाण कुठे post कराव हे न सुचल्याने इथे post केल...Sorry

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.. एकट्याने इतकं ड्राईव्ह करणं म्हणजे टू मच.. आम्ही ३०० माईल्सच्या प्रवासालाही कंटाळलो,तेही दोघांनी ड्राईव्ह करून.. खरंच हॅट्स ऑफ..

पण हे एकंदरीत जरा रिस्की वाटलं.. ऍडव्हेन्चरस आहे म्हणा पण तू कशी तयार झालीस? मी नसते झाले कधीच!! Happy

सास, तुला ड्रायविंग येत असतं तर नवर्‍याला इतकं नसतं ना करावं लागलं. आता शिकुन घे बघु. डिपेंडंटवर असशील तर पुढच्या वेळी भारतातुन IDP अवश्य घेऊन ये.

भा, बरोबर आहे. इतके ड्रायविंग एका पल्यात करणे रिस्की आहे.

बापरे, धन्य आहे तुझ्या नवर्‍याची. आम्ही फक्त एकदाच न्यूजर्सी ते ओहायो ११ तासांचं ड्राईव्ह केलं आणि परत कानाला खडा लावला.११ तास म्हणजे इथे काही फार नाहीत पण खूप कंटाळवाणे होतात खरे.

एवढं गाडीने जायचं म्हटलं तर दोघेही ड्रायव्हिंग करणारे हवेतच.

सास
आत्ता केलंत ते केलंत पण असं पुढे कधीही करू नका. दरवर्षी उन्हाळ्यातल्या लॉन्ग वीकेंडना एक तरी देसी गृप अशाच कारणांनी न्यूज मधे येतो. वेळ अन पैसे वाचवायला हॉटेलमधे न राहता दिवस रात्र गाडी चालवायची फार महाग पडतं शेवटी.

दररोज निदान ६-७ तास तरी नीट झोप झाली पाहिजे गाडी चालवणार्‍याची.

थोडे थोडके पैसे वाचतील अन त्याबदल्यात भलतीच किंमत द्यावी लागेल.

शोनू ला मोदक...
मी एकदाच सेंट लुईस ते शिकागो आणि बॅक अशी एक दिवसाची ट्रीप केली होती (साधारण १० तास एका दिवसात) दोन्ही मिळून आणि तरीही खूप वाट लागली होती आणि परत आल्यावर ऑफिसमधे शिव्या बसल्या होत्या.. !

हे खूप अचाट साहस होतं ३००० मैल म्हणजे.. आत्ता पार पडलं ते ठिके... पण परत करू नका.. !!

Dear Friends, Thank U for you replies

इतक लांबच Drive करायला नको हे खरय पण परिस्थीती पुढे पर्याय नसतात. आम्ही Safely पोहचलो हे आमच्या साठी खरच खुप खुप हुश्श! आहे.

खरच मला Driving यायला हव पण आल तरी, I hope आमच्या वर या पुढे असा प्रसंग येणार नाही. २००५ ला मी इथे आले, गेल्या ३-४ वर्षात FL-KS-AR-CT-NJ-IA-CA-NY, 8 States मध्ये स्थलांतर झाल सगळी कडे कार ने गेलो. आता बास. आता इथेच Settle व्हाव अस वाटतय. (CA तही असच वाटलेल पण तिथुन ही move व्हाव लागल :()

नवर्‍याच खुपच exertion झालय. सोमवारी संध्याकाळी आलो नि मंगळवारी तो कामावर रुजु झाला. काल नव्या Apartment वर आलो, सामानाचे Boxes, Bags Apt वर आणल्या ती धावपळ. आज रविवार असुन तो Office ला गेलाय product release आहे ना. I hope he will get rest on coming weekend.

CA to NY आमच्या प्रवासाची माहीती मायबोलिकर, आमचे CA तले २ शेजारी आणी नवर्‍याच्या NY च्या काही कलीगस ला होती... २००५ डिसेंबर end ला IA to CA आलो (near about 1500 Miles) कोणालाच त्याची माहीती नव्हती. भयंकर Snow Storm मध्ये आमची गाडी बर्फात अडकली. गाडितुन बाहेर आलो तर आजु बाजुला बर्फाने दाट भरलेल्या दर्‍या त्या परिस्थितित नवर्‍याच्या Driving ची एक चुक आम्हाला दरीत लोटणारी होती. निर्जन हो अर्क्षशा निर्जन रस्तावर आम्ही कोलंडलो असतो तर जगात कुलाला कळलच नसती आमच काय झाल, आम्हि कुठे गेलो?

अमेरिकेत मृत्युला ही कैक वार सामोरी गेलोय. भारतात नातलग, आप्त यांना वाटत आम्ही 'अमेरिकेत' म्हणजे किति सुखात, आम्ही सार्‍यांना विसरलो अमेरिकेत आल्यावर.. दुरुन डोंगर साजरे किति खरय. There is no one to understand the pain but everyone is ready to blame. Sad

>>>परिस्थीती पुढे पर्याय नसतात.
सर सलामत तो पगडी पचास!!!!!!
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

सास, सुखरूप पोहोचलात, त्याबद्दल अभिनंदन!
आम्ही Mt. Rushmore ला जाउन आलो. 2500 miles ची round trip पडली. पर्याय असूनही नवर्‍याने एकट्यानेच कार चालवली. तरी येतांना आणि जातांना ब्रेक घेतला होता. मज्जा आली खूप.
पण trip वेगळी आणि move करणे वेगळेच!

न्यू जर्सि ते ओहायो हा ११ तासाचा प्रवास मी गेल्या ३८ वर्षात २० वेळा तरी केला असेल. वाटेत दोनदा एक एक तास थांबायचे. चालवणारा मी एकटाच.

मागे एकदा, १९७७ साली, मिशिगनहून सकाळी ६ वा. निघालो. बरोबर आई वडील नि चार वर्षाचा मुलगा. सक्काळपासून सतत बारीक बर्फ नि गोठणारा पाऊस. हळूSS हळूSS चाललो होतो. पण न्यू जर्सी पासून २ तास उरले असता पेनसिल्व्हानियात संध्याकाळी ७ च्या सुमारास, माझे वडील अरे, अरे म्हणतायत् तोपर्यंत माझी गाडी दुसया बाजूच्या खड्ड्यात!
आम्ही बाहेर आलो, रात्रीला लागेल एव्हढे सामान एका पिशवीत घेत होतो. मी म्हंटले रस्ता अतिशय घसरडा आहे, पलीकडे जाताना माझा हात धरून सावकाश चालू या. तेव्हढ्यात् मुलगा पळत पळत पलीकडच्या बाजूला पोचला पण. आईने म्हंटले अरे जाऊ नकोस, तर परत लगेच पळत या बाजूला. या पोरांना लहानपणापासून घसरड्या रस्त्यावरून चालायची (पळायची) सवय! म्हणून त्याने आजीचा हात धरून तिला बरोब्बर सावकाश पणे पलीकडे नेले. वडील मात्र 'अरे, मी जाईन, तू नको हात धरायला,' करत तरा तरा चालत सुटले, नि पलीकडे पोचता धप्पकन आडवे पडले नि तसेच पडून राहिले! माझ्या तोंडचे पाणीच पळाले! म्हंटले काय यांचे हाड वगैरे तर मोडले नाही ना! पण सुदैवाने तसे काही झाले नव्हते.
मग दोन देवदूत भेटले. त्यांनी आम्हाला मोटेलमधे नेले, सुदैवाने एक खोली रिकामी होती. मोटेलवाला म्हणतो, तुम्हाला दोन खोल्या लागतील. मी म्हंटले मुंबईत एव्हढ्या खोलीत १५ लोक रहातात, नि आम्ही तर एकच कुटुंब!

असो. दुसर्‍या दिवशी सर्व काही व्यवस्थित!

तसे एका दिवसात सकाळी निघून न्यू जर्सी ते पिट्सबर्ग हा प्रवास, सकाळी निघून रात्री परत हा प्रवास निदान २४ वेळा केला आहे. पण त्यात जाताना किंवा येताना तरुण रक्ताची, रात्र रात्र जागे रहाण्याची, सवय असलेला मुलगा व नंतर मुलगी असत. पण झोपेतसुद्धा स्पीड बघ हं असे पुटपुटत बसावे लागे.

वाचून मजा वाटते. पण अशी वेळ येवू शकते.
आम्ही केलेला फ्रान्स मधून रोम पर्यत केलेला रात्रीचा प्रवास आठवला.
रस्ता चुकणे, वीसा नसताना स्विस मध्ये जाण्याची चूक.
भाषा न समजणे. थण्डी. पाऊस.आल्प्स मधले रस्ते.
असो. सन्कटात पण म़जा असते.

माझं जेव्हा अरिझोना मधलं शिक्षण संपलं आणि फिनिक्सहून न्यूयॉर्कला नोकरीसाठी move करायची वेळ आली, तेव्हा मला अगणित लोकांनी क्रॉस-कंट्री drive करायचा सल्ला दिला होता..... माझी पण फार इच्छा होती तसं करायची कारण माझ्याकडे सामान (पुस्तकं आणि कपडे सोडून) काहीच नव्हतं. पण एकट्याला ३-४ दिवस drive करायला बोर होईल असं वाटून मग तो विचार सोडून दिला... माझंही लग्न झालेलं असतं तर मीही केला असता असा कोस्ट-टू-कोस्ट drive ... Proud

पोचलात ना? व्हेर्री गुड्ड! शाब्बास!
ग्रेट, सिम्पली ग्रेट! Happy
सास तुझ्या नवर्‍याला "इस्पेशल अभिनन्दन" सान्ग माझ्याकडून! अन तुझ पण अभिनन्दन! Happy अशा प्रवासाला न कुरकुरता तयार झाल्याबद्दल Proud
(तशी आमची लिम्बी पण एका पायावर तयार अस्ते असे काही प्रवासाला निघायचे म्हणले तर! मीच घाबरतो)
अन काही नाही, मी समजू शकतो, परिस्थितीला पर्याय नस्तो हेच खरे! माणुस मुद्दामहून अशी रिस्क घेणे टाळतोच! पण प्रश्ण अस्तो तो हा की आलेली परिस्थिती तुम्ही कशी शिन्गावर घेता! आणि तुम्ही ते यशस्वी पणे पार पाडलत! Happy देवाचीही कृपा! Happy (आयला, येवढा प्रवास झाल्यावर लगेच ड्युटीवर हजर होणे??? मला तर नस्ते जमले! मी दोन तीन दिवस तन्गड्या पसरुन पडलो अस्तो दमल्यामुळे. हल्ली तर मला दोन अडीचशे किलोमीटरचा टप्पा देखिल सहन होत नाही! Sad )

बायदिवे, "माईल्स" असा शब्दप्रयोग हे, म्हणजे प्रत्यक्षात किलोमीटर अजुन जास्त आहेत का?

>>>> पण झोपेतसुद्धा स्पीड बघ हं असे पुटपुटत बसावे लागे. <<< झक्की... Lol
झक्की, तुमच्याकडे बघुन अस वाटल नाही की तुम्ही पण येवढ ड्रायव्हिन्ग करण राहुदेच, मुळात तुम्हाला ड्रायव्हिन्ग येत असेल! Proud
मला आपला "लालडब्बा अन झक्की" अशीच जोडगोळी नजरेसमोर येते!

...;
आपला, लिम्बुटिम्बु

>>>झक्की, तुमच्याकडे बघुन अस वाटल नाही ... मुळात तुम्हाला ड्रायव्हिन्ग येत असेल!
लिंबु, तुला ठाउक नाही, न्यु जर्सीतच काय, पण ते फ्लोरिडात पण सुसाट गाडी हाणतात. (हाय वे वर एक्झीट चुकायची काळजी बिचार्‍या सौ. झक्की करत असाव्यात.) Happy
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

...

one word, stupidity.

thats just my opinion, or what i'll not do if i am in that condition.

माणसा, म्हणुनच मी वर 'सर सलामत तो पगडी पचास' लिहिलंय.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

<<गेल्या ३-४ वर्षात FL-KS-AR-CT-NJ-IA-CA-NY, 8 States मध्ये स्थलांतर झाल सगळी कडे कार ने गेलो. आता बास.>>

म्हणजे एव्हाना अमेरिकेतल्या ५० पैकी ४९ राज्यांना तुमची चरणधूळ लागलीये म्हणा की..... फक्त एवढाच असा abstract विचार केला तर ही गोष्ट अभिमानास्पद आहे... Happy

माझ्या प्रोफेसरच तर हे स्वप्नच होत. तिला ५० हि राज्यातला एखाद्या तरि गावि जाउन यायच होत. ती सुटि घालवायला पण नॉर्थ डकोटा (?) सारख्या ठिकाणि जायचि नवर्‍याबरोबर आणि ड्राइव्ह करुनच जायचि.

Stupidity is right. Not just that, there ought to be a law to punish such acts, just like drunk driving.
स्वतःच्या नाही तर नाही पण रस्त्यावरच्या दुसर्‍यांच्याही जीवाची पर्वा नाही असाच याचा अर्थ होतो. ड्राईव्ह करायला मिळणे हा हक्क नसून जबाबदारी आहे हे विसरु नये.

झक्की, तुमच्याकडे बघुन अस वाटल नाही की तुम्ही पण येवढ ड्रायव्हिन्ग करण राहुदेच, मुळात तुम्हाला ड्रायव्हिन्ग येत असेल!
अहो लिंबूटिंबू, आमच्या इथे driving केले नाही तर जीवन अशक्य होईल. आम्ही रहातो तेथे बस, टॅक्सी, रिक्षा असे काही नाहीये. जवळात जवळच्या दुकानात जाऊन यायला चाळीस मिनिटे लागतात. तेव्हढा वेळ कधीच नसतो. त्यापेक्षा गाडीने जाऊन येऊन दहा मिनिटात!

मुळात तुम्हाला ड्रायव्हिन्ग येत असेल
हा एक विवाद्य मुद्दा होऊ शकतो, पण जेंव्हा driving ला पर्याय नाही, तेंव्हा हा प्रश्न गौण आहे. शिवाय इथले driving अत्यंत सोपे. गाड्या बहुतेक सगळ्या automatic, power steering, power break वाल्या. मुख्य म्हणजे सगळे लोक कायदा पाळतात. उजवीकडून म्हणजे उजवीकडूनच चालवतात, एका लेन मधून एका वेळेला एकच गाडी. मधेच डावीकडून ओवरटेक करत नाहीत. नि सतत हॉर्न देऊन डो़के उठवत नाहीत. भारतात मात्र गाडी चालवणे हीच stupidity. विशेषत: शहरात, जिथे रिक्षा, टॅक्सी, बस सगळे असते.

चाफ्या, माझ्या मनातलं बोललास!!!!!
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

>>>>> one word, stupidity.

हेच मत सर्वदूर लावायच ठरल तर.....
१. एव्हरेस्ट वर प्रथम पाऊल ठेवायला "कडमडत" जाणार्‍यान्ना देखिल "मूर्ख" म्हणल पाहिजे
२. चन्द्रावर पाऊल ठेवायला गेलेल्या नील आर्मस्ट्रॉन्गला तर मुर्खान्चा शिरोमणी ठरवल पाहीजे
३. येवढच काय, प्रत्येक रान्गत्या बाळाला, जेव्हा ते उभ राहून पहिल पाऊल टाकायच "धाडस करण्याचा मूर्खपणा" करेल तेव्हा त्याला तत्काळ परावृत्त केल पाहीजे! Proud
४. लिम्बीला आणायला मागे दोन हजार पाच सालात जीपने मी गेलेलो, तो तर शतशः मूर्खपणा मानला पाहिजे
५. आमचे झक्की, झक्कीबोवा हो, तर ते पुण्यात अस्ताना बिनधास्त पणे "सिक्ससीटर" अन "रिक्षा" मधून (न घाबरता, काय की!) हिकडे तिकडे प्रवास करायचे त्या "धाडसाला" काय म्हणायचे हे निश्चितच ठरवावे लागेल!

आयला, एक तर अशी वेळ कुणावर येऊ नये, आलीच, तर मग काय घरात हातावर हात ठेवुन स्वस्थ बसायला हव का? कुणी सुखासुखी हे असले प्रयोग करत नस्त! अन केले तर बिघडल काय? मानवी शरीर अन मनाच्या अमर्याद सहनशक्तीला कुणी आव्हान दिल तर आमच्या घाबरट मनाला त्यामुळे का यातना व्हाव्यात?
वरील न्यायच लावायचा झाला तर तमाम ऑलम्पिक, रेसेस वगैरे असन्ख्य क्रिडाप्रकार खेळणारे देखिल मुर्खान्च्या नन्दनवनात वावरतात असे म्हणावे लागेल. कारण वजन उचलल तर पाठीची कॉर्ड तुटू शकते.... करा बाद, शम्बर मीटर ते मॅरेथॉन पळायचय? छाती फुटू शकते... करा बाद... असे प्रत्येक खेळात धोके अस्ताना तरीही ते खेळत रहाणारे देखिल मूर्खच म्हणायला हवेत नाही का?
....;
आपला, लिम्बुटिम्बु

Limbu, CALM DOWN!! U R missing the point here Happy
करावी की धाडसं. एक ड्र्न्क किन्वा स्टीअरिंग वर झोप लागलेला ड्रायव्हर कुणा कुणाचा जीव धोक्यात घालतोय त्याची त्याला कल्पनाही नसते.
कोणीही म्हणेल च , की बाबा जीव धोक्यात घालायचा तर तुझा घाल .. आमचा, इतरांचा का म्हणून?

>>>>> एक ड्र्न्क किन्वा स्टीअरिंग वर झोप लागलेला ड्रायव्हर.....
आणि माझ एक महत्वाच वाक्य
>>>> मानवी शरीर अन मनाच्या अमर्याद सहनशक्तीला कुणी आव्हान दिल तर......
प्रश्ण असा हे की या सहनशक्ती प्रत्येकाच्या सारख्याच अस्तात का?
सहनशक्ती नसेल तर असा "प्रयोग" विचार न करता करायला कुणी धजावेल का? स्पेशीयली "भारतातून तिकडे जाऊन" एकेकट्याने किन्वा जोडीने रहाणारे (इकडच्या तुलनेत एकटेच!)?

जिथपर्यन्त ड्रिन्क्स चा किन्वा झोपेचा प्रश्ण हे, नशिब, माझे अनुभव मी इथे लिहिले नाहीहेत! ते लिहिले अस्ते तर न जाणो काय काय प्रतिक्रिया आल्या अस्त्या....! Proud
एनिवे, मी थन्डगार बर्फाच्या गोळ्यासारखा हे ग! Happy आय मीन, शान्तच हे! Happy

"दोन शब्दान्च्या" एखाद्या प्रतिक्रियेला उत्तर देताना (बाजुने किन्वा विरुद्ध) मी किती किती प्रकारे शब्दच्छल करीत युक्तिवाद करू शकतो ते आजमावणे म्हणजे माझी आधीची पोस्ट होती! Happy अन होता होईतो, वाचकाच्या चेहर्‍यावर थोडबहुत स्मित फुलाव ही अपेक्षा! (अन माझ्या बहुतेक सगळ्या पोस्ट्स अशाच अस्तात..... त्यामुळेच त्या फारश्या कुणी गम्भिरपणे घेत नसावेत)
आता माणुस ची प्रतिक्रिया, अन त्यावर केलेल भाष्य पहिल्या दोन चार उदाहरणात मी कुठल्या कुठे नेवुन भिडवल हे ते बघ! काल मी त्याची प्रतिक्रिया वाचली होती, तत्काळ उत्तर सुचलेच नव्हते, आज सकाळी ऑफिसला येता येता वरली तीन उदाहरणे सुचली, शेवटचे रान्गत्या बाळाचे उदाहरण सुचल्यावर तर मी चक्क स्कुटरचा ऍक्सिलेटर अत्यानन्दाने जोरात पिळला! Proud
जाऊद्या, फारच विषयान्तर होतय!
तुम्हा सर्वान्ना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मैत्रेयी, शब्द न् शब्द पटला!!!!!!!!!

आता ही दुर्दैवी घटना वाचा. गेल्या आठवड्यात भारतातून कॅलिफोर्नियात आमच्या ओळखीतल्या एक बाई मुलाला भेटायला आल्या. वय वर्षे फक्त ५१. रस्त्यावर पादचार्‍यांसाठी सिग्नल लागलेला होता. म्हणजे वाहन्चालकांसाठी लाल!!!!!!! पण अश्याच 'दमून्-थकून' गाडी चालवणार्‍यानी त्यांना उडवलं. (वेळेत ब्रेक मारता आला नाही.) त्या गेल्या!!!!!!!!!!!!!!!!!
अश्या गोष्टींवर वाद्-विवाद होऊ शकतो?

मी किती किती प्रकारे शब्दच्छल करीत युक्तिवाद करू शकतो ते आजमावणे म्हणजे माझी आधीची पोस्ट होती! >>>>>
लिम्बू, वा वा, कौतुक च करायला पाहिजे रे तुझं !! किती हा पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह ऍटिटयूड!! Uhoh
उपरोध सोड, उगीच खूष होऊ नकोस, तुझं एकही उदाहरण इथे लागू पडत नाही!

परवा कुणालातरी सांगत होतो... "Ignorance is bliss"...

माणसा बरोबर आहे. म्हणूनच अमेरिकेतील सर्व लोक अत्यंत आनंदी आहेत. झोकात दारू पिऊन गाडी चालवतात, नि चालवता चालवता सेल फोनवरून इतरांशी बोलतात, किंवा गाणी ऐकतात.

म्हाणूनच त्यांना ओबामा नको. बुश, पेलिन ही मंडळी बरी. W. हा सिनेमा जरूर पहा.

माणसा, फारच अशक्त स्मरणशक्ती आहे बॉ तुझी. मला सांगत होतास. सास आणि तीच्या नवर्‍याने जे वेडे धाडस केले ते मला पण फारसे आवडले नाही. सासला गाडी चालवता येत असती तर नवर्‍याला थोडी विश्रांती मिळाली असती. तरीदेखील हे असे अचाट साहस नकोच करायला. इथेच अनेक जणांनी तीव्र शब्दात सासला समजावले आहे. जे केले ते चूक हे सांगण्याचे वेगळे मार्ग असतातच. पण म्हणून सार्वजनीक ठीकाणी कुणाला असे stupid म्हणणे मला पटत नाही.

तसे, हे देखील मला नाही पटले.
परिस्थीती पुढे पर्याय नसतात>>>> अशी काय परीस्थिती होती की एका जीवावर बेतलेल्या प्रसंगानंतरही त्यातुन काही शिकवण नाही घेतली ?

I hope आमच्या वर या पुढे असा प्रसंग येणार नाही>>>>तुमच्यावर पुन्हा असा प्रसंग खरेच येणार नाही जर तुम्हीच ठरवले तर.

Pages