Submitted by बेफ़िकीर on 7 August, 2010 - 01:29
मातीत खोल जावे, जमते तसे फुलावे
होईल ते बघावे, झाडापरी असावे
रस्ता नसेल तेथे रस्ता करून जावे
नाहीच साधले तर रस्ता बनून जावे
पापे धुवून देणे इतकेच काम त्यांचे
गंगेमधे नहावे, मदिरेमधे नहावे
हे मोहजाल सुचवे इच्छा घडोघडीला
कोणीतरी बनावे, काहीतरी करावे
दैवात माणसाच्या आहे शरीर होणे
केव्हातरी जगावे केव्हातरी मरावे
मिळतील पंख तेव्हा मुद्दाम सरपटावे
तुटतील पंख तेव्हा या अंबरी उडावे
असते सुदैव तेव्हा हसुनी फकीर व्हावे
नसते सुदैव तेव्हा मी 'बेफिकीर' व्हावे
गुलमोहर:
शेअर करा
मस्त ग़ज़ल. सर्व द्वीपदी
मस्त ग़ज़ल. सर्व द्वीपदी आवडल्या. फक्त 'पंख' मला पटली नाही; मुद्दाम व्यवस्थेला प्रतिरोध करावा असा ध्वनी येतो. सर्व व्यवस्थित चालले असताना बंड करणे जरुरीचे आहे का?
१,२ आणि ४ विशेष आवडले.
१,२ आणि ४ विशेष आवडले.
मिळतील पंख तेव्हा मुद्दाम
मिळतील पंख तेव्हा मुद्दाम सरपटावे
तुटतील पंख तेव्हा या अंबरी उडावे >>> हा मला जास्त आवडला.
मतला आणि मक्ता सुरेखच ! पुर्ण गझल आवडली
आवडली गझल अर्थ फार छान आहे.
आवडली गझल अर्थ फार छान आहे.
रस्ता नसेल तेथे रस्ता करून
रस्ता नसेल तेथे रस्ता करून जावे
नाहीच साधले तर रस्ता बनून जावे
हा शेर फार छान.
फारच छान बेफिकीर !!
फारच छान बेफिकीर !!
गज़लेचा टोन आवडला...
गज़लेचा टोन आवडला... एक्सप्रेशन्स तर तुमचे चांगलेच असतात ...!!!
खूप छान गझल!!! << पापे धुवून
खूप छान गझल!!!
<< पापे धुवून देणे इतकेच काम त्यांचे
गंगेमधे नहावे, मदिरेमधे नहावे >> हा शेर खूप आवडला....
मस्त गजल.
मस्त गजल.
चांगली रचना.
चांगली रचना.
रस्ता नसेल तेथे रस्ता करून
रस्ता नसेल तेथे रस्ता करून जावे
नाहीच साधले तर रस्ता बनून जावे
व्वा.... हा शेर म्हणजे .. कुर्बान..
चांगली गझल.
डॉ.कैलास
सर्वांचे मनःपुर्वक आभार!
सर्वांचे मनःपुर्वक आभार!
शरद, आपल्याला जाणवला तसा त्या शेराचा अर्थ नाही. वेगळा आहे.
-'बेफिकीर'!
मस्तच
मस्तच
ग्रेट .
ग्रेट .
जनरली गझलेत १-२ शेर अप्रतिम
जनरली गझलेत १-२ शेर अप्रतिम असतात ...ते कॉपी पेटुन "अप्रतिम" असा प्रतिसाद देतो मी .
.
.
इथे .
.
.
आख्खी गझल कॉपी पेस्टायचे कष्ट टाळतो आहे !!
जबरदस्त !!!
सर्वांचे मनःपुर्वक आभार!
सर्वांचे मनःपुर्वक आभार!
-'बेफिकीर'!
एक छान गझल आहे. रस्ता मात्र
एक छान गझल आहे.
रस्ता मात्र सॉलीड जमून आलाय. काय म्हणू ..भन्नाटच
धन्यवाद अनिलराव!
धन्यवाद अनिलराव!
मातीत खोल जावे, जमते तसे
मातीत खोल जावे, जमते तसे फुलावे
होईल ते बघावे, झाडापरी असावे
बेफिकीरजी,

प्रामाणिक आणि सरळमार्गी गझल ! ( अस म्हंटल तर चालेल का ?)
माझ्यासारख्यासाठी या पहिल्या २ ओळी 'काफी' आहेत...कौतुक करण्यासाठी !
मातीत खोल जावे, जमते तसे फुलावे
होईल ते बघावे, झाडापरी असावे
आवडली!
आवडली!
<< रस्ता नसेल तेथे रस्ता करून
<< रस्ता नसेल तेथे रस्ता करून जावे
नाहीच साधले तर रस्ता बनून जावे >>....मस्त ! हा शेर खूपच आवडला.
नवीन प्रतिसादकांचा आभारी
नवीन प्रतिसादकांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
आवडली!
आवडली!
मस्त आहे गजल ! शेर क्रं.
मस्त आहे गजल !

शेर क्रं. १,३,५ व ७ आवडले !
शेर क्रं. २,४, व ६ पण आवडले !
चांगली आहे, आवडली. गिरिजाने
चांगली आहे, आवडली.
गिरिजाने केलेल्या विडंबनाच्या निमित्ताने मूळ गझल वाचनात आली.
गजल देखिल छान
गजल देखिल छान लिहिता.
Gr8.
Accident चा खुपच परिणाम झाला आहे असच वाट्ते.
मला धन्यवाद द्यायची सोय झाली
मला धन्यवाद द्यायची सोय झाली
नेहमीप्रमाणेच.
नेहमीप्रमाणेच.
रस्ता नसेल तेथे रस्ता करून
रस्ता नसेल तेथे रस्ता करून जावे
नाहीच साधले तर रस्ता बनून जावे
पापे धुवून देणे इतकेच काम त्यांचे
गंगेमधे नहावे, मदिरेमधे नहावे
--- खास!
जयन्ता५२
मिळतील पंख तेव्हा मुद्दाम
मिळतील पंख तेव्हा मुद्दाम सरपटावे
तुटतील पंख तेव्हा या अंबरी उडावे
>>>..................
हा सोडून बाकी मस्तच!!
गिरिजाने केलेल्या विडंबनाच्या निमित्ताने मूळ गझल वाचनात आली.>>>>
होय!!........ एक नक्की ; अशा ताकतीच्याच गझलान्ची विडम्बने होतात ..............!
मलाही सुचले आहे पोस्ट करू का,...............
Pages