पायांची काळजी (निगा)

Submitted by निंबुडा on 9 April, 2010 - 07:59

बदलत्या ऋतु नुसार पायांची काळजी (निगा) कशी घ्यावी यासंबंधी माहिती इथे द्यावी. पावले स्वच्छ, सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी पेडीक्युअर करण्याची पद्धत यावर इथे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अजिबात काळजी घेत नाही पायांची.. २ महिन्यातून एकदा पार्लर मध्ये जाऊन पेडिक्यूअर करते.. ते ही आठवला तर... Sad
आयडीयली... आठवड्यातून एकदा गरम पाण्यात थोडा शँपू घालून त्यात १० मिनिटं पाय घालून मग नखं आणि टाचा साफ कराव्यात. (निदान इतकं तरी)
पण इथे वेळ कुणाला आहे? एकदा घरी असताना हा उदयोग सुचला.. पाय घातले रे घातले त्या साबणाच्या पाण्यात आणि केबलवाल्याने बेल वाजवली.. आणि खूप वेळ घेतला.. तोवर सगळं पाणि थंड Sad

घरच्या घरी पेडिक्युअर करण्यासाठी गरम पाण्यात शँपु, थोडंसं ग्लिसरिन ( नाहीतर खूप कोरडी होतात पावलं), हायड्रोजन पॅरॉक्साइड (बहुदा मळ सुटुन येतो लवकर म्हणून घालतात) हे घालावं. १०-१५ मिनिटं ह्या पाण्यात पाय घालून पाय, टाचा, नखं वैगरे साफ करावं.
नंतर पाय पुसून एखाद्या ऑल परपज क्रिम / फुट क्रिमनी पायाला मसाज करावा. वेळ अन हौस असेल तर पाण्यात पाय घालायच्या आधी स्वच्छ धूवून क्लिनसिंग मिल्क लावून पुसावेत अन एखादे ब्लिच क्रिम लावावे.
शेवटी मसाज केल्यावर एखादा पॅकपण लावता येतो.

ग्लिसरिन, लिंबु आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पण पाय मऊ अन छान होतात. कधीकधी लिंबाची फोड , साल वैगरे पावलांवर घासली तर राप निघून जातो. मोहरीचे तेल व मिठ यानी हलकी मसाज केली तर मऊपणा येतो.

अर्थात हे सगळं करायला जमत नाहीच. कॉलेजात असताना, हॉस्टेलवर मैत्रिणींनी सांगितलेले अन त्यावेळी केलेले उद्योग आहेत हे सगळे. आता फक्त दोनेक महिन्यात पार्लरमध्ये जावून पेडीक्युअर केरुन घेते. तेपण भाभी आपके पैर तो बुढ्ढोंजैसे दिखते है असं धाकट्या दिराने ऐकवल्यापासून. Sad

रोज आंघोळ करताना एखाद्या स्क्रब किंवा प्युमिस स्टोनने टाचा, तळपाय चोळावेत. आंघोळ झाल्यावर त्वचा ओलसर असताना बेबी ऑइल किंवा युसेरिन / निव्हिआ सारखे हेवी क्रीम लावावे.

रात्री पाय स्वच्छ धुऊन, भरपूर पेट्रोलियम जेली चोपडून त्यावर सुती मोजे चढवून झोपायचे. टाचा कोरड्या पडत असतील तर हे नियमित केल्याने खूप फरक पडतो.

खूप चाल झाली असेल, हाइकिंग वगैरे केलं असेल तर थोड्या कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय बुडवून ठेवले तर फार छान वाटतं.

मुख्य म्हण्जे पायाच्या नखांचे नेल पॉलिश नेहमी अपटु डेट ठेवावे. अर्धवट निघालेले चांगले दिसत नाही. व शक्यतो डार्क कलरचे लावावे म्हणजे भारतीय पोषाखांवर चांगले दिसते. पीपटो शूज असतील तर अजूनच.

अजून एक टीप. पायाचं वॅक्सींग करताना पावलांवरूनही (तळपाय नव्हे) थोड्या पट्ट्या ओढाव्यात. डेड स्कीन निघून येण्यास मदत होते. त्यामुळे काळवंडलेली पावले थोडी उजळायलाही मदत होते. हल्ली ते "पेडएग" म्हणून छोटं स्क्रबर मिळतं ते देखील खूप उपयोगी आहे.दोन पेडीक्युअरच्या मधे वापरायला छान.

पॉटरी करतांना सतत पाण्यात हात घातले जातात त्यामुळे संपूर्ण हाताची त्वचा कोरडी होते. क्लास मधल्या एका बाईने हा उपाय सांगीतला. मी फक्त हातानांच नाही तर कोपर, घोटा, पाऊल, गुडघा, नकल्स थोडक्यात जिथे जिथे त्वचा राठ झालेली असते त्या ठिकाणी हा उपाय करून बघीतला आणि साधारण ३ आठवड्यात मला फरक दिसू लागला.
कुठलीही गोष्ट माझाकडून सातत्याने होत नाही पण ही झाली आणि त्याचे चांगले परीणाम पण दिसू लागले.

उपाय खालील प्रमाणे :

मिनरल ऑइल (किंवा एरंडेल तेल), ग्लीसरीन, आपल्या आवडीचे बॉडी लोशन/मॉइश्चरायझर सम सम प्रमाणात एकत्र एका बाटलीत भरून ठेवायचे. आंघोळ झाली की लगेच थोडेसे हातावर घेऊन जिथे जिथे राठ त्वचा आहे तिथे लावायचे, त्वचेत चांगले जिरले पाहीजे. या उपायाचा मला आतापर्यंत सगळ्यात जास्त फायदा झाला. माझ्या कोपराची त्वचा फार म्हणजे फारच खरखरीत होती, अगदी हात लावावासा वाटत नसे, आता महिन्याभरात चांगली मऊ झाली आहे.
मिनरल ऑइल इथे कुठल्याही सुपरमार्केटमध्ये लॅक्सेटीव्ह सेक्शन मध्ये मिळते.
मिनरल ऑइल चे गुणधर्म वाचतांना लक्षात आले की एरंडेल तेलाचे आणि याचे गुणधर्म अगदी सारखे आहेत.
सुंदर मी होणार बीबी वर वाचुन केसांसाठी एरंडेल तेल आणले होतेच त्यामुळे मग मी एरंडेल तेल + सेटाफील + ग्लीसरीन असे मिश्रण करून ठेवले आहे बाथरुम मध्ये, आंघोळ झाली की लावायला सोपे जातं आणि विसरत नाही. मिश्रण थोडसच लावायचे असल्याने चिकट वगैरे काही होत नाही.

रूनी छान उपाय सांगितलास Happy

मला एक उपाय हवाय, मांडी घालून बसल्यामुळे की अजून कशामुळे माहीत नाही पण पायाच्या घोट्याच्या भोवती त्वचा गोलसर भागात काळी आणि किंचित राठ झाली आहे. तिथे टोचलं वगैरे तर दुखत नाही. पण ती डेड स्किन निघून जावी यासाठी काही उपाय आहे का? Uhoh

मी जेव्हा चेहरा ब्लिच करते तेव्हा उरलेलं ब्लिच पावलाला लावते, त्याने ही पावलं चांगली दिसतात. Happy

रुनी, तुला ग्लीसरीन कुठे मिळाले? आणि "आंघोळ झाली की लगेच थोडेसे हातावर घेऊन जिथे जिथे राठ त्वचा आहे तिथे लावायचे" म्हणजे तु चोळुन चोळुन ते त्वचेत जिरवतेस का? माझेही कोपर खुप राठ झाले आहेत हा ऊपाय करुन पाहीन!

अमया,
हो चोळून त्वचेत चांगले जिरवायचे ते मिश्रण.
ग्लीसरीन मी भारतातुन आणले होते. वॉलमार्ट मध्ये First aid, Band aid सेक्शनच्या बाजुला Humco ब्रॅन्ड्चे ग्लीसरीन (6 Oz bottle) मिळते असे मी नेटवर वाचलय, तर काही ठिकाणी केक, कुकीज इ बेकींग सामानाच्या सेक्शन मध्ये फुड कलरच्या बाजुला मिळेल असे लिहीले होते. मी स्वतः अजून घेतले नाहीये. तिथे किंवा इंडीयन ग्रोसरीतही मिळेल कदाचित.

पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे घोट्याची त्वचा तर काळवंडली आहेच पण तिकडची स्किन पण अर्धवट निघत आहे आणि जास्त जोरात घासू पण नाही शकत... अशा वेळेस काय करू???

माझी पण घोट्याची त्वचा कआळवंडली आहे आणि निबर सुद्धा झाली आहे. त्यासाठी काय करता येईल

रोज सकाळी आंघोळीच्या वेळेस दुसर्या बादलीत कोमट पाण्यात पाय ठेउन बसा...घरच्या घरी पेडी क्युअर करा.... [कोमट पाणी + शांपु (पायाचाब्रशने शेवटी मसाज)]

पायाला रात्री हलके तेल चोळा [आवडत असेल तर जरा जास्त घ्या..]

घोट्याची त्वचा लवकर बदलत नाही ..पहीले मऊ - स्वच्छ होते मग रंग बदलतो.

मस्त धागा. पायांना रोजचा आराम देण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी रोज कोमट पाण्यात १५ मि. पाय बुडवून ठेवावेत. मग स्वच्छ कपड्याने पुसून, तेल लावून झोपावे.

तेल अथवा बॉडी लोशन, फूट क्रीम वगैरे ने रोज/एक दिवसा आड न चुकता मसाज करावा.

टाचांना भेगा पडल्या असतील, तर कोकमतेल वितळवून कोमट झाले की ते टाचांना चोळून ठेवावे. हा उपाय सलग ७ दिवस केल्यास भेगा भरून येतात व टाचा मऊ होतात. दुखत नाहीत.

अरे पायांची निगामधे कोणी 'फिश स्पा/पेडिक्युअर' बद्दल लिहिलंच नाहीए. मला वाटलं ही गोष्ट एकदम इन आहे सध्या. मी या विकेंडची अपॉइंटमेंट घेतली आहे. पहिल्यांदाच करणार आहे. कोणाला अनुभव आहे का? मला फार उत्सुकता आणि थोडीशी भीती वाटते आहे. एवढे काहीच्या काही पैसे देवुन किती इफेक्टिव आहे कोण जाणे.

कोणी केलं असेल तर मला पटकन माहिती सांगा ना, प्लीज.

ग्लिसरिन, लिंबु आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पाय मऊ होतात. लिंबाची फोड, साल वैगरे पावलांवर घासली तर राप निघून जातो.

'फिश पेडिक्युअर' चा धमाल अनुभव आहे. पहिल्यांदा केले तेव्हा जेमतेम ३० सेकंदच पाय ठेऊ शकले. हसून हसून वेड लागते. Rofl आणि पायही छान होतात Happy

VLCC चे पेडीक्युअर किट मिळते. ते पण छान असते. घरच्या घरीच छान पेडीक्युअर करता येते.
आणी पार्लर पेक्षा स्वस्त पण होते. एक किट साधारण ६ ते ७ वेळा वापरता येते.

छान धागा निंबुडा.. हे काही केलं जात नाही माझ्याकडून, फार तर झोपण्याआधी वॅसलीन क्रीम लावणे थंडीत तरी..जमेल तेव्हा मोजे घालणे, शूजचा जास्त वापर करणे इत्यादि.

भारती अनुमोदन >>

थंडीत ज्यांना पाय्/टाचा फुटण्याचा त्रास होतो त्यांनी कंपल्सरी हे केलंच पाहिजे.

अजुन एक घरगुती मलम करण्याची कृती सांगते.
एक मोठी मेणबती पातेल्यात घालून वितळवायची त्यातली वात काढून टाकायची. आणि त्यात अंदाजाने आपलं खायचं तेल घालायचं. ते मिश्रण थंड झालं की साधारण पेट्रोलियम जेली सारखं होतं. ते एका डबीत भरून ठेवायचं.
रात्री झोपण्या आगोदर (खास करून ज्यांना पाय/ टाचा फुटण्याचा त्रास आहे त्यांनी) सहन होईल इतक्या गरम पाण्यात २ चमचे मीठ घालून त्यात पाय बुडवून ठेवायचे. १०-१५ मिनिटानी बाहेर काढून स्वच्छ कोरडे करून त्यावर हे घरगुती मलम लावून वरून मोजे चढवून झोपी जावे. असे ८-१० दिवस केलं तर फरक नक्कीच पडतो.

मागे एकदा पेपरमध्ये वाचलं होतं फिश पेडीक्युअर तितकंसं सेफ नाहीय असं. सगळ्यांना एकाच टबमध्ये पाय ठेवायला सांगतात त्यामुळे जर कुणाला काही झालं असेल तर माशांमार्फत संसर्ग होऊ शकतो असं लिहिलं होतं. (मला नीट लिहायला जमत नाहीय इथे. )

मनि, फायनली ते 'फिश स्पा/पेडिक्युअर' केलेस, की फिश गट्टमच केलेस?! Happy अनुभव कळव नक्की! योडी, चांगल्या मोठया स्पाज मधे सगळ्यांसाठी एकच टब वापरत असतील असे नाही वाटत....
बाकी, घरी आल्यावर हात-पाय धुण्याव्यतिरिक्त आणि ऑकेजनली नेलपॉलिश लावण्याव्यतिरिक्त पायांकडे पाहिले जात नाही खरे.... आता जरा बघायला हवेय! ( :उत्सुकतेने धागा वाचणारी बाहुली! : )

पायांकडे बघितले जाते तेव्हाच जेव्हा चप्पलांची खरेदी केली जाते. आणि तेव्हा आपले कळकट्ट पाय बघुन लाज वाटायला लागते. सो, पेडीक्युअर मस्ट.. vlcc चा सेट मीही वापरलाय. खुप छान आहे.

पायांची निगा घेण्यास मला फार आवडतं! "अगं या आठवड्यात पेडीक्यूअर केलेस का?" हा प्रश्न कुणी विचारला की फार मस्त वाटतं मला (हूरळून जाते म्हणा ना Wink )... आजतागायत खरे तर मी फक्त एकदा (माझ्या लग्नाच्या वेळीच) पेडी केले आहे... डेली-होमकेअर ने पाऊलं छानच दिसतात... माझ्या काही टिप्स...

१) महिन्यातून एकदा ऑक्सीब्लिच करणे (फक्त पाऊलंना) व त्यानंतरच वॅक्स
२) दररोज आंघोळीच्या वेळी प्यूमिक- स्टोनने (Pumice Stone) तळपाय घासणे (ह्यामूळे कॉर्नस होत नाहीत, पाय स्वच्छ राहिल्याने भेगाही होत नाहीत) (दक्षे हळूवार हातानी पायाच्या घोट्यालाही घास १५ दिवसात फरक दिसेल, तिथली जाड राठ त्वचाही मुलायम होते)
३) दर रविवारी आंघोळीच्या नंतर नखं नेलकटरच्या साहाय्याने आतून क्लीन करणे व नखांना शेप देणे
४) दररोज रात्री झोपतांना पाऊलं व तळपायांना मॉईश्चोराईजर लावणे"च"!!
५) फार मूख्य- घरातही सतत चप्पल्स वापरणे
६) नेलपेंट सतत लाऊन न ठेवणे...

७) जमल्यास महिन्यात एकदा कोमट पाणी व वॉल्नट स्क्रबिंग

Happy

पायांकडे बघितले जाते तेव्हाच जेव्हा चप्पलांची खरेदी केली जाते. आणि तेव्हा आपले कळकट्ट पाय बघुन लाज वाटायला लागते )) +१

पायांवर उन्हामुळे काळे चट्टे उठलेत. म्हणजे चप्पल चे बंद असतात त्या खाली उन न लागल्यामुळे तो भाग पांढरा राहिलंय आणि बाकी सगळा काळपट.
लिंबाची साल घासल्यावर जातो का काळपट पणा?

गुदगुल्या? >>> हो ना सॉलीड गुदगुल्या होतात. नवर्‍यानी माझा आणि लेकीचा वेड्यासारखे हसतानाचा फोटोपण कढला होता.

Dhanashril | 11 January, 2013 - 13:23 नवीन
माझा मुलगा १२ वर्षा चा आहे. त्याचे गुड्घे काळे पड्ले आहेत. काही उपाय आहे का. अरे कोणी उपाय सुचवा ना.

dreamgirl | 11 January, 2013 - 13:32 नवीन
Dhanashril, याच ग्रूपमध्ये पायांची निगा म्हणून धागा आहे, त्यात बघा.

Dhanashril | 11 January, 2013 - 13:34 नवीन
त्यात बघीतले काही सापड्ले नाही

प्रतिसादdreamgirl | 11 January, 2013 - 15:25 नवीन
मुलगा १२ वर्षांचा आहे म्हणजे भरपूर खेळ, मस्ती, उन्हातान्हात फिरणे आले. त्यामुळे काळे पडलेले गुड्घे रंग बदलायला थोडा वेळ घेतील.
मसूर डाळ बारीक वाटून ठेवायची. अंघोळीआधी साय व मसूरडाळीचे पीठ यांची पेस्ट हळूवारपणे गुढगे, कोपरे यांना चोळायची. कोमट पाण्याने धुवावी. रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलाने मालीश करावी. लिंबाची साल, बटाट्याचा रस हे ब्लिचिंग एजंट्स म्हणून वापरतात.

अंघोळीनंतर आयुर्वेदिक मॉईश्चरायझर क्रीमने वा ऑलिव्ह/ बदाम तेलाने मालिश करावी.

आंबेहळद, मुलतानी माती गुलाबजलात किंवा सायीत मिसळून पॅक लावावा.शक्य झाल्यास लांब पँट्स वापरल्या तर बरे.

Pages