पायांची काळजी (निगा)

Submitted by निंबुडा on 9 April, 2010 - 07:59

बदलत्या ऋतु नुसार पायांची काळजी (निगा) कशी घ्यावी यासंबंधी माहिती इथे द्यावी. पावले स्वच्छ, सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी पेडीक्युअर करण्याची पद्धत यावर इथे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>उवा काढून घेताना हललं तर माकड थोबाडीत मारतं. बघितलंय, स्वानुभव नाही. >> Proud
आम्ही लहान असताना काकीआजीची दर रवीवारी धमकी असायची. उवा झाल्या तर माकड बोलावणार. त्या भितीने फारसा आरडाओरडा न करता शिकेकाईने खसाखसा चोळून केस धुणे कार्यक्रम पार पडायचा. Happy

गेले काही दिवस पाऊलं प्रचंड दुखत आहेत.(डिलीव्हरीने वजन वाढले आहे) ऑफिसमध्ये बसलेली असताना मी सतत पाऊले उलट-सुलट दिशेने गोलाकार फिरवत असते. घरी गेल्यावरही वज्रासनात बसते झोपण्याअगोदर. तर आणखी काय उपाय करावे ज्याने हे दुखणं वाढणार नाही आणि आराम मिळेल?

हाताचे कोपरे खूप काळे झालेत
तसेच पायही खूप कोरडे पडतात
घरगुती उपाय आहे का .....
घरगुती नाही पण वापरून बघितलेला आहे.
CHERYL'S Heel Peel Eliminator ( Cracked feet Eliminator ) नावाचे एक क्रीम आहे. पाय कोरडे पडतात आणि नंतर फुटतात. हे क्रीम मिळाले तर लाव. moisture टिकून राहते, चिकट पण नाही. त्यमुळे दिवसा पण लावता येते & त्यावर धूळ पण बसत नाही

CHERYL'S Heel Peel Eliminator ( Cracked feet Eliminator ) नावाचे एक क्रीम आहे. पाय कोरडे पडतात आणि नंतर फुटतात.>>>>>> Uhoh मला हे काही कळल नाही... नंतर फुटतात म्हण्जे काय ??? टाचा फुटतात तस की वेगळ काही आहे हे ????

मला नविन चप्पल मुळे नेहमी पायाला फोड येतात. कितीही मउ किंवा चांगल्या प्रतिची घेतली तरी हा प्रॉब्लेम होतो.
यावर प्लिज उपाय माहित असतील तर सांगा.

हसरी,
चपलेचा जो भाग जास्त घासला जात असेल ( जनरली मागचा भागज, टाचेच्या वर) त्या ठीकाणी मेणबत्ती उलटी
धरुन घासायची.
चप्पल चावत नाही त्यामुळे असे म्ह्णतात Happy

वरती सगळ्यानी मौलाचे सल्ले दिले आहेत, त्यात माझे चार आणे. मैत्रिणीने दिलेल्या सा. सकाळमधल्या टिप्सवरुन साभार.

पेडीक्युअर कृती.

१) नेलपेन्ट काढुन टाकावे

२) पाय कोमट पाण्यात १५ मिनीटे बुडवुन ठेवा. क्षमतेनुसार पाण्यात टाकायची औषधे टाका. अल्पनाने वर हैड्रोजन पेरॉक्साईड लिहीले आहेच.

३) पाय बाहेर काढुन पुसुन घ्या आणी फुट स्रीपरने डेड स्किन काढुन टाका/ घासुन घ्या.

४) नखे कापुन फाईलने आकार द्या.

५) क्युटिकल सॉफ्टनर लावुन मऊ झालेले क्युटिकल्स ब्रश अथवा कटर ( क्युटिकलचे) च्या सहाय्याने काढुन टाका.

६) पाय कोरडे करा.

७) गरजेनुसार क्रीम वा लोशन लावुन मसाज करा.

८) नखाना आधी बेस कोट, मग वाळल्यावर नेहेमीचे नेलपेन्ट टॉप कोट लावा.

पेडिक्युअरसाठी पायाचे वा स्नायुचे दुखणे असल्यास कोमट पाण्यात लवेन्डर तेल, पेपरमिन्ट तेल वा निलगिरी तेल घालावे

पेपरमिन्ट तेलाने साकळलेले रक्त प्रवाही व्हायला मदत होते. ही अ‍ॅरोमाथेरेपी तेले डायरेक्ट न वापरता थोड्या तीळ तेलात मिक्स करुन वापरावीत.

भेगा घालवायला.
हळद व गोडेतेलाने पायाला मसाज करुन त्यावर चन्दन+ रक्तचन्दन+ अर्जून+ लोध्रा यान्चा एकत्र जाडसर लेप लावावा. यात त्वचारोग बरे करणार्या कडुलिम्बाचा पण वापर करता येईल.

लेप तयार करताना कोरफड गर वापरल्यास उत्तम. मृत पेशी काढणे, आद्रता पुरवणे, सुरकुत्या, डाग कमी करणे, उष्णतेने व थन्डीने होणार्‍या जखमा बर्‍या करण्याचे गुण कोरफडीत आहेत.

पायाला जास्त घाम येत असल्यास नागमोथ्याचा लेप लावावा. पायाना भेगा नसल्यास पाण्यात रीठे व शिककाई पावडर घातली तरी चालेल.

तेल व गुणधर्म

तीळ तेल- त्वचेत उत्तम शोषले जाते, चरबी कमी करते, स्नायुना बळकटी आणते.

साजूक तुप- मसाजाने वात दोष कमी होतात.

मोहरी तेल- मृत त्वचा काढायला मदत.

बदाम तेल- त्वचेला पोषक.

शतधौत घृत- जळवाता च्या भेगान्करता उत्तम.( काशाच्या वाटीने तळपाय चोळावेत)

बाकी खोबरेल तेल, एरन्डेल, अम्सुल तेल ही तेले व्रण म्हणजे जखमा बर्‍या करणारी आहेत, भरणारी आहेत.

इथे मि आधि लिहिला आहे की माहित नाही :

चपलामुळे पायाला काळे डाग पडले असतील तर समई मध्ये उरलेले तेल डागावर लावावे . हमखास डाग कमी होतात .

( कालच गणपती गेले , समयामध्ये उरलेले तेल डबीत भरून ठेवले , तेन्व्हा आठवले Happy )

Scholl Velvet Smooth Express Pedi Electronic Foot File कोणी वापरले आहे का ?

हाताच्या बोटांची नखं जशी फटाफट वाढतात तशी पायाच्या बोटांची वाढत नाहीत का? माझ्या तर नाहीच. अगदीच मंद मंद वाढ होते. त्यातही माझ्या बिग टो वर अगदीच असायला हवं तेवढ्च नख होतं....म्हणजे नॉर्मली नख कापल्यावर जसं जेमतेम असतं तसं आणि तेवढच. ते वाढतही नव्हतं. त्याने माझं पाउल फार छान दिसत नाही असं वाटायचं.

मग एकदा मी H2O मधे रेट कार्ड चाळताना Big Toe Gel extension - Rs200 असं वाचल्यावर प्रचंड टेम्पटेशन झालं. किंमत पण प्रयोग करायला हरकत नाही अशीच होती. मला सांगण्यात आलं कि नेल घरी कापता येणार नाही. रिमुवलसाठी सुद्धा (विथ चार्जेस) परत पार्लर मधेच जावं लागेल. नख वाढल्यावर ओरिजिनल नख आणि जेल extension मधली गॅप फिल करायला परत पार्लर आणि परत एकदा चार्जेस पडतील. तरी प्रयोग म्हणुन २०० रुपये घालवले.
फक्त एका नेलच्या वाढीने आणि छान नेलकलरने पावलाच्या appearance मधे drastic फरक पडला. आता मी माझ्या पावलांच्या प्रेमात पडले आहे. लकीली नखाची वाढ मंद असल्यामुळे ३ महिने झाले तरी गॅप फिल करायला लागेल एवढी मोठी नाही. नख अजुन एकदाही तुटलेलं नाही, ज्याची मला सुरुवातीला नेहमी भिती वाटायची. अर्थात घरी कापता येणार नाही सांगितलं ते पण खोटं होतं. मी घरातच नेल कटरने जी किंचीतशी वाढ होती ती कट करुन पाहिली, म्हणजे फार मोठं नख असल्यामुळे तुटायला किंवा अडकायला नको. इझीली कापलं गेलं. Happy

जर तुम्हा कोणाला माझ्या सारखंच स्वतःचं पाउल आवडत नसेल तर असा छोटासा प्रयोग करुन appearance मधे बदल करायला आवडेल. छोट्याशा बदलाने पण स्वतःलाच छान वाटतं.

Pages