देवाची वस्त्रे

Submitted by मिनी on 4 August, 2010 - 10:11

माझ्या आजीची देवावर खुप श्रद्धा. तिचा देव्हारा बघणं म्हणजे घरी आलेल्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय असायचा. तिचं नेहमी म्हणणं असायाचं आपल्याला कसे चांगले चांगले कपडे, दागिने घालायला आवडतं तसचं देवालाही ते आवडतं. म्हणुन ती तिच्या देव्हार्‍यातल्या सगळ्या देवांच्या मूर्तींना वस्त्रे आणि दागिने घालायची. त्यावरुनच मला एकदा सुचलं की तू इतके महागाची वस्त्रे विकत आणण्यापेक्षा मी तुला शिवुन देईन. तेव्हापासुन मी दर सुट्टीत मामाकडे गेले कि आजीला वर्षभर पूरतील इतकी वस्त्रे शिवुन घ्यायचे. त्यातही सणासुदीला वेगळे, रोजचे वेगळे असे प्रकार होते.
इथे माझ्याकडे ४-५च देवांच्या मूर्ती आहेत. म्हणुन माझ्याकडे काही मोजकीच आणि मोजक्याच टाईपची वस्त्रे आहेत. ही सगळी वस्त्रे मी रेशमी किंवा काठाच्या साड्याच्या ब्लॉऊजच्या उरलेल्या कापडातुन शिवलेली आहेत.
ही बैठक, देवांखाली अंथरायला. हे आधी शिवुन घेतलं आणि मग त्याला टिकल्या चिटकवल्या.
IMG_4266.JPGIMG_4267.JPGIMG_4268.JPG
आणि हि काही वस्रे.
IMG_4269.JPGIMG_4270.JPGIMG_4271.JPG
शेवटी माझ्या देव्हार्‍यातला बाळकृष्ण.
IMG_4265.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त. देवळात सगळ्या देवींना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवतात, दागिणे घालतात ते बघायला एकदम सही वाटते.

छान आहेत एकदम.
ती कशी शिवली आहेत त्याचा एखादा छोटा व्हिडीओ किंवा पद्धत सांगणार का? मोजमाप अंदाजे घेतलेय का?

खुप सुंदर आहेत हि वस्त्र. कृष्णाची जी हवेली मंदीरे असतात. तिथे कृष्णाला अशी वेगवेगळी वस्त्रे घालत असतात. धुतलेली वस्त्रे खास शेगडीवर सुकवून घालतात. या देवळात कृष्णाचे लहान बाळाप्रमाणे लाड करतात. त्याच्या झोपण्याच्या, जेवणाच्या वेळा पाळल्या जातात.

मस्त. ! माझी आज्जी पण शिवते अशी वस्त्र. ती देवळातल्या मुर्तींसाठी देते एकादशी, चतुर्थी, सण वगैरे सारख्या विशेष दिवसांसाठी... फोटो मिळाले तर झब्बू देईन.. Happy

मिनी , मस्त शिवली आहेस वस्त्र. आवडली एकदम. गणपती येतोय, मस्त उपरण कर आता बाप्पांसाठी.

सुरेख एकदम. फोटो मधे बाजूला एखादं नाणं , स्टॅम्प, किंवा छोटी पट्टी ठेवली तर आकाराचा अंदाज येईल. देवाचे कपडे कसे केले त्याचे स्टेप बाय स्टेप फोटो पण टाकशील का प्लीज ?

छान आहेत सगळी Happy

मेघाला अनुमोदन Happy (मला ओ की ठो येत नाही तरिही ज्यांना येतय त्यांच्यासाठी अनुमोदन :P)

मस्त ग मिने, छोटी छोटी वस्त्र शिवायची आयडिया एकदम भारी आहे. तु बाळकृष्ण। चा फोटो टाकलास ते बरं केलस. कारण ती वस्त्र कशी घालायची हे समजत न्व्हत. ती मधली छोटि वस्त्र ( ज्याच्या डोक्यावर एक भोक आहे) ती कशी आणि कुठ्ल्या मुर्तीला घालतेस?

कित्ती गोड Happy
सुंदर दिसतात देव असे छान छान कपडे लेवून Happy

माझ्या आईला ही अशीच हौस आहे घरातल्या बाळकृष्णाला सजवायची. Happy
त्याच्या साठी नेहेमी बरीचशी वस्त्रे आणि अलंकार आणत असते. मिनी यांनी दाखवलेल्या फोटोंसारखेच बरेचसे कपडे + बासरी + मुकुट + गळ्यात हार + कानात डूल + मुकुटात खोचायला छोटेसे मोरपीस असे साजिरे रूप असलेला बाळकृष्ण आईने सजवला होता माझ्या डोहाळजेवणाच्या वेळी. मी पण टाकेन त्याचा झब्बु Happy

या बाळोबाच्या मागे उभी करायला पितळेची गाय पण आणलीये तिने हौसेने.

मिनी, कसली गोड शिवली आहेस वस्त्रं.. मला ते मोठ्या काठाचं जांभळं वस्त्र भारी आवडलं. ते छोट्या छोट्या वस्त्रांचे फोटो जामच आवडले.

Pages